Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जून ०६, २०१८

रामटेकच्या शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

वसतिगृह साठी इमेज परिणाम
संग्रहित 
नागपूर/प्रतिनिधी:
 शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह रामटेक येथे सन 2018-19 करीता विद्यालयीन व महाविद्यालयीन तसेच प्रवर्गनिहाय मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.शासनाच्या वतीने शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह रामटेक येथे प्रवेशित विद्यार्थिनींना निवास, दूध, नाश्ता, जेवन, बिछाना साहित्य, पुस्तके व स्टेशनरी साहित्य, गणवेश, दरमहा निर्वाह भत्ता रुपये 500 व स्वच्छता प्रसाधन रुपये 100 व इतर सवलत प्रदान करण्यात येणार आहे.इच्छूक विद्यार्थिनींनी शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह, टक्कामोरे कॉम्प्लेक्स टिळक वार्ड, रामटेक येथे प्रत्यक्ष संपर्क साधण्याचे आवाहन वसतीगृहाच्या वतीने करण्यात आले आहे.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.