Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मे १२, २०१८

नागपूरात लग्नाच्या जेवणातून विषबाधा

Poisoning from the wedding dinner at Kondhali in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथे लग्नाच्या जेवणातून विषबाधानागपूर/प्रतिनिधी:
  नागपुरात एका लग्न समारंभ कार्यक्रमाच्या जेवणातून तब्बल ३८ जणांना विषबाधा झाली,मासोद (ता. काटोल) येथील कृष्णाजी ढोबळे यांच्या मुलीचा विवाह सोहळा बुधवारी (दि. ९) कोंढाळी येथील एका मंगल कार्यालयात पार पडला. या सोहळ्याला मासोद येथील बहुतांश नागरिकांनी हजेरी लावली होती. शिवाय, त्यांनी लग्नात जेवणही केले होते. मात्र, यातील काहींना गुरुवारी (दि. १०) ओकारी व हगवणीचा त्रास जाणवायला सुरुवात झाली. त्यामुळे मासोद येथील आरोग्य उपकेंद्रात डॉ. वर्षा बोरकर यांनी उपचाराला सुरुवातही केली. शिवाय, कृष्णाजी अटलवार (७०, रा. मासोद) यांना कोंढाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले.
दुसरीकडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील येरमल व चमू मासोद येथे दाखल झाली. शुक्रवार (दि. ११) दुपारपर्यंत मासोद येथील उपकेंद्रात १८ जणांवर उपचार करण्यात आल्याची तसेच विषबाधेचे एकूण ३८ रुग्ण आढळून आल्याची माहिती डॉ. येरमल यांनी दिली. गजानन धारपुरे (७०), मीराबाई चोपडे (५४), मंगला ढोले (३४) व अथर्व संजय धारपुरे (१२) सर्व रा. मासोद यांच्यावर मासोद येथे उपचार करण्यात आले.
माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशांक व्यवहारे, वैद्यकीय अधिकारी (साथरोग) डॉ. जयश्री वाळके, यू.आर. निकम यांनी शुक्रवारी मासोद उपकेंद्राला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. विषबाधेच्या सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर व स्थिर असल्याची माहिती डॉ. सुनील येरमल यांनी दिली.
लग्नात जेवण केल्यानंतर काही वेळाने पाहुणे मंडळींपैकी ३८ जणांना हगवण व ओकारीचा त्रास जाणवायला लागला. त्यात नववधू व वराचाही समावेश आहे. या सर्वांवर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करून त्यांना सुटीही देण्यात आली. त्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. 
-----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध) 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.