Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

विषबाधा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विषबाधा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, मे १२, २०१८

नागपूरात लग्नाच्या जेवणातून विषबाधा

नागपूरात लग्नाच्या जेवणातून विषबाधा

Poisoning from the wedding dinner at Kondhali in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथे लग्नाच्या जेवणातून विषबाधानागपूर/प्रतिनिधी:
  नागपुरात एका लग्न समारंभ कार्यक्रमाच्या जेवणातून तब्बल ३८ जणांना विषबाधा झाली,मासोद (ता. काटोल) येथील कृष्णाजी ढोबळे यांच्या मुलीचा विवाह सोहळा बुधवारी (दि. ९) कोंढाळी येथील एका मंगल कार्यालयात पार पडला. या सोहळ्याला मासोद येथील बहुतांश नागरिकांनी हजेरी लावली होती. शिवाय, त्यांनी लग्नात जेवणही केले होते. मात्र, यातील काहींना गुरुवारी (दि. १०) ओकारी व हगवणीचा त्रास जाणवायला सुरुवात झाली. त्यामुळे मासोद येथील आरोग्य उपकेंद्रात डॉ. वर्षा बोरकर यांनी उपचाराला सुरुवातही केली. शिवाय, कृष्णाजी अटलवार (७०, रा. मासोद) यांना कोंढाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले.
दुसरीकडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील येरमल व चमू मासोद येथे दाखल झाली. शुक्रवार (दि. ११) दुपारपर्यंत मासोद येथील उपकेंद्रात १८ जणांवर उपचार करण्यात आल्याची तसेच विषबाधेचे एकूण ३८ रुग्ण आढळून आल्याची माहिती डॉ. येरमल यांनी दिली. गजानन धारपुरे (७०), मीराबाई चोपडे (५४), मंगला ढोले (३४) व अथर्व संजय धारपुरे (१२) सर्व रा. मासोद यांच्यावर मासोद येथे उपचार करण्यात आले.
माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशांक व्यवहारे, वैद्यकीय अधिकारी (साथरोग) डॉ. जयश्री वाळके, यू.आर. निकम यांनी शुक्रवारी मासोद उपकेंद्राला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. विषबाधेच्या सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर व स्थिर असल्याची माहिती डॉ. सुनील येरमल यांनी दिली.
लग्नात जेवण केल्यानंतर काही वेळाने पाहुणे मंडळींपैकी ३८ जणांना हगवण व ओकारीचा त्रास जाणवायला लागला. त्यात नववधू व वराचाही समावेश आहे. या सर्वांवर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करून त्यांना सुटीही देण्यात आली. त्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. 
-----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध) 

सोमवार, एप्रिल २३, २०१८

कार्यक्रमातील जेवणातून शेकडो लोकांना विषबाधा

कार्यक्रमातील जेवणातून शेकडो लोकांना विषबाधा

चंद्रपूर/प्रतिनिधी:
राजुरा तालुक्यातील चिंचोली येथील एका देवादेवीच्या समारंभातील जेवणातून जवळपास १०० लोकांना विषबाधा झाल्याचे उघडकीस आले आहे.
तालुक्यातील चिंचोली येथील सुधाकर चौधरी यांचे घरी रविवारी रात्री देवादेवीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी गावातील नागरिक तसेच अन्य नातेवाईक देखील उपस्थित होते,या कार्यक्रमात नागरिकांनी भोजनाचा आस्वाद घेतला मात्र अवघ्या काही वेळातच त्यांच्या प्रकृतीत बिघाड होत डोकं दुखी व पोट दुखी सुरु झाली,अश्या पद्धतीचा त्रास हा संपूर्ण जेवणाऱ्या मंडळींना झाल्याने अशे शेकडो लोक वेगवेगड्या ठिकाणी डोके-पोट धरून बसले होते,त्या नंतर अनेकांना उलट्या देखील झाल्या हा संपूर्ण प्रकार लक्षात येताच तत्काळ काही लोकांनी स्थानिक आरोग्यकेंद्रात भरती करण्यात आले. मात्र रुग्णांची संख्या वाढतच जात असल्याने इतर रुग्णांना राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले,मात्र हा संपूर्ण प्रकार कशामुळे घडला याचा शोध घेणे सुरु आहे .या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉ.कुलमेथे यांनी सांगितले.