मद्यविक्री केंद्रांवरील फ्लेक्सवर वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या जाहिराती झळकत होत्या. मात्र आता मद्याची कुठलीही जाहिरात मद्यालयावर लावता येणार नाही. केवळ परवानाधारकाचे नाव आणि परवाना क्रमांकच मद्यविक्री केंद्रांवर टाकता येईल. येत्या आठ दिवसांत मद्याच्या जाहिरातीचे साइन बोर्ड काढून टाका असे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिले.
मद्यालयावरील मद्याच्या आकर्षक फ्लेक्समुळे मद्य पिण्याकडे अनेकजण आकर्षित होऊ शकतात. लहान मुलांवर, विद्यार्थ्यांवर त्याचे दुष्परिणाम होण्याची भीती राज्य शासनाने वर्तविली. त्यामुळे कोणत्याही दुकानांवर आता मद्याचे छायाचित्र किंवा जाहिरात करता येणार नसल्याच्या सूचना राज्य उत्पादन शुल्क विभागाने सर्व मद्य विक्रेत्यांना दिल्या आहेत. मद्य विक्रीला प्रोत्साहन देता येणार नाही. आठ दिवसांत फ्लेक्स काढले नाही तर परवाना रद्द करणे किंवा ५० हजार रुपयांचा दंड अशी कारवाई करण्याचा इशारा उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे. नागपूर जिल्ह्यात ५९६ बिअरबार, ११८ वाइनशॉप, २६८ देशी दारूचे दुकान, ८२ बिअरशॉपी आहेत.
बोर्डवर झाकले कापड
मद्य विक्रीकेंद्रांवर करण्यात आलेल्या जाहिराती मद्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी केल्या आहेत. या जाहिराती आम्ही काढू शकत नाही. यासाठी संबंधित कंपनीकडे आम्ही सूचना दिली आहेत. त्या कंपनीचे प्रतिनिधी येऊन या जाहिराती काढतील, असे मद्य विक्रेत्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळविले आहे. फ्लेक्स काढेपर्यंत त्यावर मद्यविक्रेत्यांनी कापड झाकले आहेत. येत्या आठ दिवसांत फ्लेक्स काढण्यात येईल, असे मद्य विक्रेत्यांनी सांगितले.
असे लावा साइन बोर्ड
दुकानाच्या प्रवेशद्वाराजवळ साइन बोर्ड असावे. ६० बाय ९० सेंटीमीटरच्या साइन बोर्डवर परवानाधारकाचे नाव, परवाना क्रमांक, दुकानाचा पत्ता, दुकान सुरू करण्याची आणि बंद करण्याची वेळ. चटकन लक्षात येईल अशा ठिकाणी परवाना लटकविणे आवश्यक असल्याच्या सूचना राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिल्या आहेत.
-----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध)