अतिक्रमण विभाग झोपेत;पार्किंगची उद्भवत आहे समस्या
चंद्रपूर/ललित लांजेवार:
सदर परीसर हा झोन क्रमांक 1 मध्ये येत असून याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने हा फेरीवाले व ठेलवाल्यांचा उच्छाद जास्तच दिसून येत आहे.यांच्या अतिक्रमणामुळे दुचाकीस्वार पालिका प्रशासनावर चांगलेच नाराज आहे.
चंद्रपूर येथील मुख्य बसस्थानकावर पुन्हा एकदा ठेलवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. सद्या चंद्रपूर बस स्थानकाचे नूतनीकरनाचे काम सुरू आहे.त्यामुळे बसस्थानकात जागा अतिशय कमी जागा आहे,बसची संख्या बघता बऱ्याचदा बस ह्या बसस्थानकात न जाता बाहेर रस्त्यावरच थांबत आहे .अश्यातच अगोदर असलेल्या दुचाकी पार्किंगच्या ठिकाणी अवैधपणे ठेलेवाल्यांनी अतिक्रमण केल्याने बसस्थानकावर आप्तेष्टांना सोडण्यास किव्हा घेण्यास येणाऱ्या नागरिकांना वाहनतळ नसल्याने पार्किंगची समस्या निर्माण होत आहे .
सदर परीसर हा झोन क्रमांक 1 मध्ये येत असून याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने हा फेरीवाले व ठेलवाल्यांचा उच्छाद जास्तच दिसून येत आहे.यांच्या अतिक्रमणामुळे दुचाकीस्वार पालिका प्रशासनावर चांगलेच नाराज आहे.
सदर अतिक्रमण परिसर हा मेनरोडला लागून असल्याने या फेरीवाल्यांच्या मुजोरील चंद्रपुर मनपा अतिक्रमण विभागाने कारवाई करणे गरजेचे आहे.त्यामुळे मनपाचे अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे ते यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.
*तक्रार प्राप्त झाल्यास करू कारवाई*
संपूर्ण बसस्टँड परिसर हा झोन 1 मध्ये येत असून याकडे अतिक्रमण विभागाने दररोज पेट्रोलिंग करून अतिक्रमण होत असल्याच्या जागेची माहिती ठेवणे आवश्यक असते मात्र झालेल्या अतिक्रमनाबाबद झोन 1 च्या अधिकारी सहाय्यक आयुक्त शीतल वाकडे यांच्या कडून माहिती घेतली असता आजूनपरियंत तक्रार आली नसल्याचे सांगितले. यातूनच अधिकारी व कर्मचाऱ्यांची वयक्तिक जबाबदारी संपली का?असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे.
;
.