Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल ११, २०१८

मेळघाटात वाघाचा मृत्यू

प्रतिनिधी/अमरावती 
आठ ते १० वर्ष वयोगटातील नर वाघाचा अर्धवट सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला़ मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मध्यभागापासून जवळच्या कापूरखेडा नाला कंपार्टमेंट नं. ८५२, बीट-भांडम, रांग ढक्कना येथे नऊ एप्रिल रोजी फॉरेस्ट गार्ड चंद्रकिरण पेंढारकर यांना सकाळच्या वेळी पायी गस्त घालत असताना दुर्गंधी आली़  त्यांनी ताबडतोब संबंधित अधिकाºयांना माहिती दिली़ सायंकाळी पुराव्यासाठी प्राथमिक तपासणी घेण्यात आली. दुसºया दिवशी म्हणजेच १० रोजी सकाळीच्या सुमारास प्रशासकीय अधिकाºयांची टीम आणि  पशूवैद्यकीय अधिकारी दाखल झाले़ त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले़ मेळघाट व्याघ्रप्रकल्प सीसीएफ एम़ एस़ रेड्डी, गुगमाल विभागाचे अधिकारी विनोद शिवकुमार, डीएफओ विशाल माली, एसीएफ यशवंत बहली, एनटीसीए प्रतिनिधी विशाल बनसोड, डॉ. सावन देशमुख, डॉ. एन. व्ही. शिंदे, आर. पी. अवेयर, हिरलाल चौधरी, बिट वनरक्षक ज्योती हिरमकर,  चंद्रकिरण पेंढारकर उपस्थित होते़ अधिकाºयांनी पुढील तपासणीसाठी नमुने गोळा केले़ क्षेत्र संचालक आणि इतर अधिकाºयांच्या उपस्थितीत दुपारनंतर मृत वाघाच्या शरीरावर अग्नी देऊन अंत्यविधी करण्यात आले़ मागील गेल्या दहा दिवसांत सुमारे पाच कि.मी. किंवा त्याहीपेक्षा जास्त परिसरात विषबाधाचे चिन्ह दिसत नव्हते. पोटात आढळलेले अन्न नमुने जंगली डुक्कराचे असल्याचे दिसून आले़

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.