Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, एप्रिल २९, २०१८

पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे व किसन नवघरे यांना महासंचालकाचे सन्मानचिन्ह


चंद्रपूर/ विशेष प्रतिनिधी:
राज्य पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या 571 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी पोलीस महासंचालक सन्मानचिन्हे जाहीर करण्यात आली आहेत. येत्या 1 मे रोजी पोलीस मुख्यालयाच्या संचलन मैदानावर होणार्‍या समारंभावेळी ही पदके प्रदान करण्याचे आदेश पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी बुधवारी दिले.
राजुरा येथे कार्यरत पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांना 1 मे रोजी पोलीस मुख्यालयात महासंचालकाचे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे सन्मानचिन्ह मिळविणारे जिल्ह्यातील एकमेव पोलीस अधिकारी ठरले आहेत.
राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी 13 एप्रिल 2017 चा निर्णयानुसार सन 2017 या वर्षकरिता सन्मानचिन्ह प्राप्त करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. राज्यातील 571 पोलीस अधीक्षक,पोलीस उपायुक्त,सहाययक पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राखीव पोलीस निरीक्षक,पोलीस शिपाई, असे विविध कर्मचारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
ओमप्रकाश कोकाटे यांच्या 25 वर्षाच्या सेवेत त्यांच्या विरोधात एकही तक्रार नाही तसेच त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहुन विविध केसेस चा निपटारा केला.सामान्य जनतेच्या मधोमध जाऊन संवाद केला व जनतेच्या मनात आपली छाप सोडली.
मागील 3 वर्षांपासून कोकाटे हे राजुरा पोलीस ठाण्यात आपली सेवा देत आहेत.जिल्ह्यातील एकमेव अधिकाऱ्याला सन्मानचिन्ह मिळाल्याने कोकाटे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

किसन नत्थूजी नवघरे यांना देखील उल्लेखनीय सेवेसाठी
 पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह
तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील पोहा गावचे मुळचे रहिवासी असलेल्या किसन नत्थूजी नवघरे यांना देखील उल्लेखनीय सेवेसाठी पोलीस महासंचालक सन्मानचिन्हे जाहीर करण्यात आल आहे. किसन नत्थूजी नवघरे हे सध्या अकोला येथे कार्यरत आहेत,१६/०५/१९८९  रोजी ते पोलीस दलात शिपाई म्हणून भरती झाले,गडचिरोली गोंदिया या नक्षलग्रस्त भागात वेळोवेळी बंदोबस्त केले आहे. नागपूर जिल्ह्यातील मोहोळ गावात 1991साली  धरणाचे बांधकाम झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेकांचे प्राण वाचविले व जखमींना तात्काळ रुग्णालयात भरती केले.२९/०९/१९९३  रोजी किल्लारी लातूर येथील भूकंप झालेल्या मनुष्यहानी अनेक लोकांच्या जमिनी दबल्या गेलेल्या मृतदेह बाहेर काढून त्यांनी विल्हेवाट लावली व जखमींना योग्यवेळी दवाखान्यात पाठविले सन 2003 नाशिक कुंभमेळा येथील रामकुंडावर चेंगराचेंगरी होऊन 56 लोकांचे प्राण गेले अनेक जण जखमी झाले होते तसेच जखमींना दवाखान्यात नेण्याची मोलाचे कार्य व वर्तकांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले नागपुर शहरातील मुस्तफा बाबाच्या निधनानंतर मोमीनपुरा या भागात तणावाची परिस्थिती कठोर बंदोबस्तात पार पाडली पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे जानेवारी 1999 ते नोव्हेंबर 2010 पर्यंत पोलीस खात्यात भरती नव्याने भरती झालेल्या प्रशिक्षणार्थी यांना उत्कृष्ट प्रकारे मोलाचे प्रशिक्षण देणे आतापर्यंत अमरावती पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर,चंद्रपूर,नागपूर शहर पोलीस, प्रशिक्षण केंद्र अकोला येथे त्यांनी कार्य केले असून राष्ट्रपती पोलीस पदकासाठी त्यांच्या नावाची शिफारस झालेली आहे, २०११  मध्ये राखीव पोलीस उपनिरीक्षकपदी त्यांना पहिली पदोन्नती मिळालेली होती तर २०१६  मध्ये राखीव पोलिस निरीक्षकपदी त्यांना दुसरी पदोन्नती मिळालेली आहे सध्या ते अकोला येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रावर राखीव पोलिस निरीक्षक म्हणून काम बघत आहेत.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.