चंद्रपूर/प्रतिनिधी:
भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेला 38 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चा, चंद्रपूर हानगरच्या वतीने दि. 6 एप्रिल रोजीहा स्थापना दिन वर्धापन सोहळा उत्सासपुर्ण वातावरणात व जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी लोकांना बुंदीचे लाडु व आईसक्रिम वाटून भाजपा, भाजयुमो तसेच भाजपा महिला आघाडी व अन्य मोर्चाच्या पदाधिकारी कार्यकत्र्यांनी शेकडोच्या संख्येत उपस्थित राहुन हा स्थापना दिन साजरा
केला. याप्रसंगी चंद्रपूर शहर महानगर पालीकेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ. अनुराधा हजारे, झोन सभापती सौ. आशा आबोजवार, नगरसेवक संजय कंचर्लावार, भाजयुमो महानगरचे प्रभारी अध्यक्ष मोहन चैधरी, नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, नगरसेवक तथा माजी उपमहापौर संदीप आवारी, जेष्ठ नेते सुरेश तिवारी, राजु घरोटे, नगरसेवक रवि आसवानी, नगरसेविका सौ. ज्योती गेडाम, नगरसेविका निलम आक्केवार, तुकूम प्रभागचे मंडळ अध्यक्ष प्रमोद शास्त्राकार, मंडळ अध्यक्ष राजेंद्र तिवारी, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे महानगर अध्यक्ष आमीन शेख, राजेंद्र कागदेलवार, रामलू भंडारी, माजी नगरसेवक राजु कामपेल्ली, इंजी. श्रीकांत भोयर, विकास खटी, मुन्ना इलटम, तेजा सिंह, राहुल बोरकर, जितू शर्मा, शेखर पेरकर, स्नेहदीप जोप, तुषार मोहुर्ले, रंजना नाकतोडे, ओ.बी.सी. महिला अध्यक्ष किरण भडके, मयुर झाडे, सुरज पेद्दूलवार, विपीन मेंढे, धनंजय मुफकलवार, इस्राईल खान, अभिनव लिंगोजवार, राहुल ताकधट, महेश अहीर, मयंक अडपेवार, वैभव मेश्राम, रोहन वानखेडे, कृपेश बडकेलवार, मिलींद पुट्टेवार, बंटी बनकर, गणेश जांभुळकर, जगदीश दंडेले, ललीत गुलानी, नरेश पुजारी, तिरूपती बुरडे, समिर सय्यद, सुरेश गोरलावार, राजेश वाकोडे, स्वप्नील मुन, ख्वाजा भाई यांचेसह बहुसंख्य कार्यकर्ता या स्थापना दिन वर्धापन कार्यक्रमास उपस्थित होते.
यावेळी भाजपाच्या 38 वर्षांच्या कार्यकाळाचा व यशाच्या कारकीर्दीचा आलेख मांडतांना प्रमुख कार्यकत्र्यांनी भाजपाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधुन पक्षकार्यास समाजाभिमुखतेची जोड देत भाजपाची संघटन शक्ती अधिक मजबुत करण्याचा निर्धार याप्रसंगी व्यक्त केला.