Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल ०९, २०१८

कॉंग्रेसच्या दोन्ही गटाच्या वतीने एक दिवसीय उपवास व धरणे आंदोलन

चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर शहरात कॉंग्रेसमध्ये गटबाजीचे राजकारण असतांना पक्ष श्रेष्ठीच्या आदेशानुसार जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या दोन्ही गटाने एक दिवसिय उपवास व धरणे आंदोलन करण्यात आले.दररोज वाढणारे डिझेल, गॅस दरवाढ, विविध स्तरावर अपयशी ठरलेल्‍या सरकार विरोधात  शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेस वतीने आज सकाळी १० वाजता पासून  शहराच्या २ मुख्य ठिकाणी कॉंग्रेसकार्यकर्ते उपोषणाला बसले. 
 देशातील आणि राज्यातील जातीय सलोखा आणि शांतता धोक्यात आली असून राज्यातील व देशातील विविध ठिकाणी जातीय तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडत आहे. पर्यायाने राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आली आहे. देशातील या घटना लक्षात घेता भाजप सरकार जातीयवादी शक्तीच्या खतपाणी घालत असल्याचे लक्षात येत आहे.यासाठी विदर्भ किसान मजदूर कॉंग्रेस जिल्हा चंद्रपूर तर्फे  शहरातील राजीव गांधी क्रीडा संकुल महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात  तर जटपुरा गेट येथे चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी तर्फे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. हे आंदोलन सकाळी १० वाजता पासून संद्याकाळी ६ वाजता परियंत चालले .
या धरणे आंदोलनात विदर्भ किसान मजदूर कॉंग्रेस जिल्हा चंद्रपूर तर्फे माजी खासदार नरेश पुगलिया,राहुल पुगलिया,गजानन गावंडे,देवेंद्र बेले,यासह कॉंग्रेसच्या ईतर सेलचेआजी माजी पधादिकारी उपस्थित होते तर चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी तर्फे काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर अध्यक्ष नंदू नगरकर, माजी आमदार सुभाष धोटे,सुनिता लोधीया ,यासह कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलनादरम्यान कोसळला स्टेज 
आंदोलन सुरु असतांना जटपुरा गेट येथे चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या स्टेज कोसाल्याची घटना घडली.  या स्टेजवर अनेक पदाधिकारी बसले होते,तीतक्यातच स्टेजचा काही भाग कोसळल्याने सर्वत्र एकाच खळबळ उडाली. या प्रकारामुळे सभेच्या ठिकाणी एकच गोंधळ निर्माण झाला होता . मात्र आयोजकांनी शांततेचे आवाहन केल्याने सभा सुरळीत सुरु झाली.आंदोलना दरम्यान कॉंग्रेसच्या सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी स्टेजवर जाऊन बसल्याने या बांधलेल्या स्टेजच्या क्षमतेपेक्षा जास्त वजन झाले व स्टेज  कोसळला.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.