Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

कॉंग्रेस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कॉंग्रेस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ऑक्टोबर २७, २०१८

कांग्रेस के प्रोजेक्ट शक्ति से जुड़े कई युवा

कांग्रेस के प्रोजेक्ट शक्ति से जुड़े कई युवा

कांग्रेस के प्रोजेक्ट शक्ति से जुड़े कई युवाचंद्रपुर/संवाददाता:
 जिला शहर कांग्रेस कमेटी की ओर से शहर के 17 प्रभागों में नए मतदाता पंजीयन व प्रोजेक्ट शक्ति पंजीयन अभियान चलाया गया. अभियान के दौरान प्रभारी किशोर गजभिये ने प्रभाग में लगाए गए बूथ को भेंट देकर पंजीयन अभियान का जायजा लिया. अभियान के दौरान 2,000 से अधिक मतदाताओं ने पंजीयन किया. सैकड़ों युवाओं शक्ति एप द्वारा कांग्रेस से जुड़े.

कांग्रेस पार्षद सुनीता लोढिया, अमजद अली इराणी, संगीता भोयर, अनिल सुरपाम, हरिदास लांडे, राजू दास, गौतम चिकाटे, नितिन नंदिगमवार, अजय खंडेलवार, विकास टिकेदार, दीपक काटकोजवर, प्रकाश अधिकारी, सुरेश आत्राम, बंडू लांजेवार, मनोज वासेकर, अशपक शेख, राजेंद्र वाघाड़े, विट्ठल धांदरे आदि ने प्रयास किया. प्रभारी गजभिये ने रेस्ट हाउस में सभी कांग्रेस पदाधिकारियों के साथ नए मतदाता पंजीयन व प्रोजेक्ट शक्ति पंजीकर को लेकर समीक्षा बैठक ली. इस अवसर पर सुभाषसिंह गौर, महिला कांग्रेस जिलाध्यक्ष चित्रा डांगे, महिला शहराध्यक्ष सुनीता अग्रवाल, शिवाराव, राजू रेड्डी, हरीष कोत्तावार, राजेश अड्डूर, विनोद दत्तात्रय, महेश मेंढे, शालिनी भगत, संजय रत्नपारखी, रूचित दवे, बंडोपंथ तातावार, वंदना भागवत, अरविंद मडावी, एजाज, युसूफ, केशव रामटेके, श्याम राजुरकर, अनिता चवरे आदि उपस्थित थे.

सोमवार, एप्रिल ०९, २०१८

कॉंग्रेसच्या दोन्ही गटाच्या वतीने एक दिवसीय उपवास व धरणे आंदोलन

कॉंग्रेसच्या दोन्ही गटाच्या वतीने एक दिवसीय उपवास व धरणे आंदोलन

चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर शहरात कॉंग्रेसमध्ये गटबाजीचे राजकारण असतांना पक्ष श्रेष्ठीच्या आदेशानुसार जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या दोन्ही गटाने एक दिवसिय उपवास व धरणे आंदोलन करण्यात आले.दररोज वाढणारे डिझेल, गॅस दरवाढ, विविध स्तरावर अपयशी ठरलेल्‍या सरकार विरोधात  शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेस वतीने आज सकाळी १० वाजता पासून  शहराच्या २ मुख्य ठिकाणी कॉंग्रेसकार्यकर्ते उपोषणाला बसले. 
 देशातील आणि राज्यातील जातीय सलोखा आणि शांतता धोक्यात आली असून राज्यातील व देशातील विविध ठिकाणी जातीय तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडत आहे. पर्यायाने राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आली आहे. देशातील या घटना लक्षात घेता भाजप सरकार जातीयवादी शक्तीच्या खतपाणी घालत असल्याचे लक्षात येत आहे.यासाठी विदर्भ किसान मजदूर कॉंग्रेस जिल्हा चंद्रपूर तर्फे  शहरातील राजीव गांधी क्रीडा संकुल महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात  तर जटपुरा गेट येथे चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी तर्फे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. हे आंदोलन सकाळी १० वाजता पासून संद्याकाळी ६ वाजता परियंत चालले .
या धरणे आंदोलनात विदर्भ किसान मजदूर कॉंग्रेस जिल्हा चंद्रपूर तर्फे माजी खासदार नरेश पुगलिया,राहुल पुगलिया,गजानन गावंडे,देवेंद्र बेले,यासह कॉंग्रेसच्या ईतर सेलचेआजी माजी पधादिकारी उपस्थित होते तर चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी तर्फे काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर अध्यक्ष नंदू नगरकर, माजी आमदार सुभाष धोटे,सुनिता लोधीया ,यासह कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलनादरम्यान कोसळला स्टेज 
आंदोलन सुरु असतांना जटपुरा गेट येथे चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या स्टेज कोसाल्याची घटना घडली.  या स्टेजवर अनेक पदाधिकारी बसले होते,तीतक्यातच स्टेजचा काही भाग कोसळल्याने सर्वत्र एकाच खळबळ उडाली. या प्रकारामुळे सभेच्या ठिकाणी एकच गोंधळ निर्माण झाला होता . मात्र आयोजकांनी शांततेचे आवाहन केल्याने सभा सुरळीत सुरु झाली.आंदोलना दरम्यान कॉंग्रेसच्या सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी स्टेजवर जाऊन बसल्याने या बांधलेल्या स्टेजच्या क्षमतेपेक्षा जास्त वजन झाले व स्टेज  कोसळला.
कॉंग्रेसच्या आंदोलनादरम्यान स्टेज कोसळला

कॉंग्रेसच्या आंदोलनादरम्यान स्टेज कोसळला


चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपुरात काँग्रेसतर्फे सुरु असलेल्या उपोषण आंदोलन दरम्यान स्टेजवर कार्यकर्त्यांची संख्या जास्त झाल्याने अचानक पने स्टेज कोसळला.यात कोणालाही दुखापत झाली नसून काही वेळातच स्टेजला पुनर्स्थितीत आनण्यात आले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्याकडून प्राप्त झालेल्या सूचनेनुसार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विधिमंडळ गटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या  नेतृत्वात सामाजिक समता बंधुत्व आणि शांतता यासाठी एक दिवसाचे उपोषण जटपुरा गेट येथे गांधी पुतळ्या  जवळ सुरु आहे.
         हे आंदोलन सुरु असतांना स्टेजवर अनेक पदाधिकारी बसले होते,तीतक्यातच स्टेजचा काही भाग कोसळल्याने सर्वत्र एकाच खळबळ उडाली.
 या प्रकारामुळे सभेच्या ठिकाणी एकच गोंधळ निर्माण झाला. मात्र आयोजकांनी शांततेचे आवाहन केल्याने सभा सुरळीत सुरु झाली.आंदोलना दरम्यान कॉंग्रेसच्या सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी स्टेजवर जाऊन बसल्याने या बांधलेल्या स्टेजच्या क्षमतेपेक्षा जास्त वजन झाले व स्टेज  कोसळल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
                 यावेळी काँग्रेसचे आजी-माजी खासदार आमदार प्रदेश पदाधिकारी ज्येष्ठ नेते जिल्हा परिषद महानगरपालिका नगर परिषद सदस्य महिला काँग्रेस युवक काँग्रेस सेवा दल व काँग्रेसचे सर्व सेलच्या पदाधिकारी कार्यकर्ते व समर्थकांनी उपस्थित होते.


शनिवार, फेब्रुवारी १७, २०१८

युवक काँग्रेसचे 'पकोडा' आंदोलन

युवक काँग्रेसचे 'पकोडा' आंदोलन

चंद्रपूर/प्रतिनिधी:   पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अमित शहा यांच्या बेरोजगारांना पकोडे विकण्याच्या सल्ल्याचे पडसाद चंद्रपुरात देखील बघायला मिळाले आहे. पोलिस भरतीसाठी हजारो युवक-युवतींनी तयारी केली. मात्र, या जिल्ह्यासाठी अवघ्या ५१ जागांची जाहिरात निघाली. पोलिस भरतीचा आजवरचा हा निच्चांक़ आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या बेरोजगारांनी येथिल गांधी चौक येथ माजी खासदार नरेश पुगलीया व युवा नेता राहूल पूगलीया यांचा मार्गदर्शनात एन एस यु आय ( NSUI ) चा वतीने भाजप चा पकोडे तळून निषेध केला. 

निवडणुकीदरम्यान युवकांना विशेष करून सुशिक्षीत बेरोजगारांसाठी वर्षाकाठी २ कोटी रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन भाजपाचे नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्याच अन्य नेत्यांनीही युवकांना देत त्यांना प्रभावीत केले. मात्र, साडेतीन वर्षाच्यावर केंद्रात आणी राज्यात भाजप सरकारच्या सत्तेचा कार्यकाळ उलटला आहे. तरीही देशात रोजगार निर्मितीत वाढ होणे दुरच, प्रत्यक्षात रोजगार निर्मिती घटून बेरोजगारांची फौज तयार झाली आहे. मेहनत करून विद्यापीठाच्या उच्च पदव्या मिळविणाऱ्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याऐवजी त्यांना पकोडे विकण्याचा सल्ला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देऊन बेरोजगाराच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. यामुळे भाजप सरकारच निषेध करण्यासाठी शनिवारी संतप्त झालेल्या बेरोजगारांनी येथिल गांधी चौक येथ माजी खासदार नरेश पुगलीया व युवा नेता राहूल पूगलीया यांचा मार्गदर्शनात एन.एस.यु आय.( NSUI ) चा वतीने भाजपचा पकोडे तळून विद्यमान सरकारचा प्रतिकात्मक निषेध करण्यात आला. 
 या आंदोलनाला एन.एस.यु आय.( NSUI ) चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात उपस्थित  होते. सोबत उच्चशिक्षित असलेल्या बेरोजगार युवक-युवतींची मोठी गर्दी होती. बेरोजगारीची मोठी समस्या आहे. अनेक शिक्षित युवकांच्या हाताला काम नाही. सरकारच्या धोरणामुळे युवकांवर ही वेळ आल्याचा आरोप कुशल पुगलीया यांनी यावेळी केला.

रविवार, जानेवारी २८, २०१८

शहरात सर्वपक्षीय संविधान बचाव रॅली

शहरात सर्वपक्षीय संविधान बचाव रॅली

चंद्रपूर/प्रतिनिधी:
देश आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून संविधान बदलण्याच्या प्रयत्नात असून याविरोधात चंद्र्पुर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस विधिमंडळ उपगटनेते आ.विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात  २६ जानेवारीला लोकतंत्र बचाव-संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले.

  दुपारी २ वाजता जटपुरा गेट येथून, कस्तुरबा मार्गे गिरनार चौक, गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आली .यावेळी शहरातील जटपुरा गेट समोरील गांधी पुतळ्याजवळ लोकतंत्र बचाव-संविधान बचाव चे नारे लावण्यात आले.दरम्यान, याप्रसंगी माजी आमदार अविनाश वारजूरकर, राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, आर.पी.आय.चे व्ही.डी. मेश्राम, शफिक अहमद, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, नगरसेविका सुनिता लोढीया, युवक काँग्रेस अध्यक्ष शिवा राव, सचीन कत्याल, बाजार समिती सभापती दिनेश चोखारे, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, महिला जिल्हाध्यक्ष सुनंदा जीवतोडे, महेश मेंढे, घनश्याम मुलचंदानी, डॉ. अशोक जीवतोडे, चंद्रपूर अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. मलक शाकीर, अनुसूचित जाती विभाग प्रदेश उपाध्यक्ष संजय रत्नपारखी, असंघटीत कामगार विभाग जिल्हाध्यक्ष विनोद संकत, जिल्हाध्यक्ष समाजवादी पार्टी अन्वर आलम मिर्झा, हिराचंद बोरकुटे, किशोर पोतनवार, डी.के. आरीकर, अंकुश वाघमारे, अय्युब कच्छी, बल्लू गोहकार, संतोष लहामगे, फारूख सिद्धीकी आदी उपस्थित होते.