Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, एप्रिल ०७, २०१८

राज्यभरातील१० लाख नादुरुस्त वीजमीटर महिन्याभरात बदला: संजीव कुमार

नागपूर/प्रतिनिधी: 
विदर्भातील २ लाख मीटर सह राज्यातील सुमारे १० लाख ३७ हजार सिंगल फेजचे नादुरुस्त वीजमीटर येत्या महिन्याभरात बदलावेत व हे मीटर बदलताना त्याची जागेवरच मीटर क्रमांकासह मोबाईल अ‍ॅपद्वारे संगणकीय प्रणालीत नोंद करण्यात यावी असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिले आहेत. राज्यातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी मुंबई मुख्यालयात आयोजित मुख्य अभियंत्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
नागपूर परिमंडलात येणाऱ्या वर्धा जिल्ह्यात २१, १९३ तर नागपूर शहर आणि ग्रामीण मंडल कार्यालय अंतर्गत २१,७६४ वीज मीटर्स बदलण्यात येणार आहेत.संजीव कुमार म्हणाले, अचूक बिलींगसाठी विशेषत्वाने प्रयत्न सुरु आहेत. नवीन वीजजोडणीसह नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना पुरेसे नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सिंगल फेजचे आणखी ३० लाख नवीन वीजमीटर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नादुरुस्त आढळून आलेले १० लाख ३७ हजार सिंगल फेजचे वीजमीटर सर्वप्रथम एक महिन्याच्या कालावधीत बदलण्यात यावेत. त्यानंतर नादुरुस्त असलेले सिंगल फेजचे एकही वीजमीटर ग्राहकाकडे राहणार नाही याप्रमाणे कार्यवाही करावी. तसेच यापुढे ग्राहकांच्या तक्रारीनुसार किंवा महावितरणच्या पर्यवेक्षणात नादुरुस्त आढळून येणारे वीजमीटर त्वरीत बदलण्याची काळजी घ्यावी अशी सूचनाही त्यांनी केली.
महावितरणकडून मीटर रिडींग मोबाईल अ‍ॅपद्वारे सुरु असल्याने बिलिंग प्रणालीत पारदर्शकता आलेली आहे. गतीमानता आली आहे. परंतु मीटर रिडींग एजन्सीजकडून अद्यापही सदोष मीटर रिडींग घेण्याचे प्रकार दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांना वीजबिल दुरुस्तीचा त्रास होत आहे. मनस्ताप सहन करावा लागत आहे. सोबतच महावितरणच्या महसुलाचे सुद्धा नुकसान होत आहे. असे सदोष रिडींगचे प्रकार टाळण्यासाठी व बिलींगमध्ये अचूकता आणण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी स्थानिक उपाययोजना कराव्यात असेही अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यावेळी म्हणाले.
महावितरणच्या राज्यभरातील १६ परिमंडलात सद्यस्थितीत नादुरुस्त असल्याचे आढळून आलेल्या एकूण १० लाख ३७ हजार सिंगल फेज नादुरुस्त वीजमीटरमध्ये औरंगाबाद प्रादेशिक विभागातील १ लाख ८५ हजार, नागपूर प्रादेशिक विभाग - २ लाख, कोकण प्रादेशिक विभाग -४ लाख ५३ हजार तसेच पुणे प्रादेशिक विभागातील १ लाख ९८ हजार मीटरचा समावेश आहे. हे सर्व नादुरुस्त वीजमीटर तातडीने बदलण्यासाठी येत्या महिन्याभरात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
या बैठकीला संचालक (प्रकल्प) दिनेशचंद्ग साबू, संचालक (वित्त) जयकुमार श्रीनिवासन, संचालक (संचालन) अभिजित देशपांडे, संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण यांच्यासह प्रादेशिक व कार्यकारी संचालक तसेच मुख्य अभियंता, वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.