Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, एप्रिल ०७, २०१८

महावितरणच्या टोल फ्री क्रमांकात बदल



नागपूर/प्रतिनिधी:
     महावितरणच्या ग्राहकांना विविध सेवांची माहिती मिळावी तसेच त्यांच्या तक्रारींचे निराकरण आठवडयातील सातही दिवस व 24 तासकरण्यासाठी महावितरणने टोलफ्री क्रमांक उपलब्ध करुन दिले आहेत. या क्रमांकापैकी 1800-200-3435 या क्रमांकात बदल करण्यात आलाअसून या क्रमांकाऐवजी आता ग्राहकांना 1800-102-3435 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
महावितरणच्या वतीने ग्राहकांना 19120, 1800-102-3435 व 1800-233-3435 असे तीन टोलफ्री क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आलेआहेत. ग्राहकांना या टोलफ्री क्रमांकाद्वारे महावितरणच्या विविध योजनांची माहिती मिळवता येईल व तक्रारींचे निराकरणही करता येईल.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.