चंद्रपूर/प्रतिनिधी:
मूल येथे पोलिस अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी झालेल्या घरफोडीचा तसेच जिल्ह्यातील विविध घरफोडी प्रकरणात सहभागी असलेल्या घरफोडी टोळीचा सूत्रधार याला गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे आरोपीकडून घरफोडीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे संगमसिंग जगदिशसिंग बावरी असे अटकेतील आरोपी चे नाव हे तर मुकेश गाभा कुमरे व करण सिंग भादा हे दोघे फरार आहे. या घरफोडी टोळीत संगम सिंग बावरी सर्व गुजरखेडे पांडूरणा यांचा समावेश आहे संगम सिन्हा छिंदवाडा कारागृहात बंदिस्त होता पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी करिता चंद्रपूर जिल्ह्यातील मूल,गोंडपिपरी पोलीस ठाण्याच्या हदीतील ६ गुण्यांची कबुली दिली. आरोपीने दिलेल्या माहितीनंतर चोरीस गेलेले २ लाख 54 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आल्या टोळीवर नागपूर गोंदिया भंडारा नागपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत पोलीस अधीक्षक नियती ठाकर अपर पोलिस अधीक्षक हेमराज सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सुनील उईके सहाय्यक फौजदार दौलत चालखुरे, पद्माकर भोयर,नितीन जाधव.महेंद्र भुजाडे कुंदन बावरी,प्रांजल झीलपे आदींच्या पथकाने ही कारवाई केली