Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मार्च ०१, २०१८

दारूविक्री करणाऱ्या एकाच कुटुंबातील ५ सदस्यांना चंद्रपूर पोलिसांनी केले हद्दपार

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी झाल्या नंतर जिल्ह्यात दारू विकणे किव्हा खरेदी करेन हा गुन्हा आहे, तरी मात्र जिल्ह्यात अवैधपने दारू विक्री केली जात आहे, अश्या विक्रेत्यावर चंद्रपूर पोलीस यांनी अनेक अवैध दारू विक्रेत्यांना पोलिसांनी बेळ्यां घातल्या तर अनेक जन आजही दारू विकतच आहे अश्यांवर जरी पोलीस पाळत ठेवून असले तरी मात्र चंद्रपूर पोलिसांनी होळी सणाच्या पार्ष्वभुमीवर सुध्दा चंद्रपुर पोलीसांनी प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही केली आहे. होळी सण साजरा करतांना कोणताही अनुचित प्रकार घडु नये या करीता रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचे विरूध्द प्रतिबंधक कार्यवाही करणे गरजेचे असते.  त्या दृश्टीकोनातुन पोलीस दलाकडुन वेगवेगळया मोहिम राबविल्या जातात.याचाच एक भाग म्हणुन पोलीस स्टेशन दुर्गापुर हद्दीतील उर्जानगर येथील  गंगुबाई राजम बुध्दार्थीवार वय 60 वर्षे, सागर राजम बुध्दार्थीवार वय 31 वर्षे,शाम उर्फ शामा राजम बुध्दार्थीवार वय 28, राजेश्वरी अंजया मंत्रीवार वय 35, रामबाई नरसया ईरगुल्ला वय 50 सर्व राहणार, मेजरगेट उर्जानगर चंद्रपुर, यांचे बेकायदेशीर पासुन समाजास सुरक्षित करण्याकरीता व भविष्यात सामाजीक शांततेला धोका होवुनये याकरीता अशा धोकादायक टोळीप्रमुख व त्या टोळीतील सदस्यांना महाराष्ट्र पोलीसअधिनियम कलम 55 प्रमाणे चंद्रपुर जिल्हयातुन दिनांक 28/02/2018 रोजी पासुन 1 वर्षाकरिता पोलीस विभागाकडुन हदद्पारीची कार्यवाही करण्यात आली आहे. गंगुबाई हिच्यावर गंभीर स्वरूपाचे 05 गुन्हयांसह एकुण 229  गुन्हयांची नोंद आहे.
अशा प्रकारे समाजात बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या टोळीवर हदद्पारीची करण्यात आलेली चंद्रपुर जिल्हयातील ही पहिलीच कार्यवाही असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांविरूध्द यापुढे सुध्दा अशा कार्यवाही करणे सुरूच राहील. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी आपल्या बेकायदेशीर कृत्यापासुन परावृत्त व्हावे या कार्यवाहीमुळे नक्कीच गुन्हेगारी प्रवृत्तीस प्रतिबंध होईल.दारू बंदीनंतर अंमलबजावणीतील मोठे पाऊल मानले जात आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.