चिमुर/प्रतिनिधी:
कोणत्याही सामाजिक ऊपक्रमाची सुरुवात स्वत: पासुन करायची या भावनेने प्रेरित होउन पर्यावरण संवर्धन समीती भिसी तर्फे भिसी प्लास्टिक मुक्तीची सुरुवात प्राथमिक आरोग्य केंद्र भीसी पासुन करण्यातआली. प्लास्टिक हा पर्यावरणाला धोका पोहचविणारा घटक आहे . प्लास्टिकमुळे पर्यावरण प्रदूषण दिवसेदीवस वाढत आहे .त्यातच भीसी येथील प्राथमीक आरोग्य केंद्र प्लास्टिकच्या साम्राज्यात फसले होते. प्लास्टिक कूजत नसल्यामुळे प्लास्टिकचे प्रमाण वाढतच आहे. भीसी येथिल आरोग्य केंद्रामध्ये सलाईन, ईन्जेक्शन , विघटन न होणारे पदार्थ असल्यामुळे सर्व परिसर प्लास्टिकमय झाला होता.
पर्यावरण संवर्धन समीती भीसी कडुन प्राथमीक आरोग्य केद्र प्लास्टिक मुक्त करण्यात आले यावेळी पर्यावरण संवर्धन समीतीचे अध्यक्ष कवडू लोहकरे, प्रा. गजानन माडवे ,पंकज वर्मा, सुरेशजी बैनलवार, श्रीकांत ठोबरे ऊमाकांत कामडी, कुणाल खवसे, कैलास रामटेके , सचीन खडके ,प्रविन लोहकरे , मोहन केडझरकर, आशिष पडोडे , अक्षय खवसे, रमेश हीवरे , आबीद शेख, चंद्रशेखर रेवतकर, आदि सदस्य उपस्थित होते . तथा आरोग्य केद्रा तील कर्मचारी वृंद उपस्थित राहून प्लास्टिक मुक्तीसाठी सहकार्य केले . पर्यावरण समीतीच्या सामाजिक उपक्रमाचे जीकडे - तीकडे कौतुक होत आहे.