नक्षलवादी कार्यवाहीस जबरदस्त हादरा
चंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई
चंद्रपूर/प्रतिनिधी:
गडचिरोली जिल्ह्यातील लाहेरी पोलिसांना वॉन्टेड असलेल्या दोन जहाल नक्सवाद्यांना चंद्रपुर नक्सल सेलच्या पथकाने बल्लारपुर रेल्वे स्थानक परिसरातुन आज सकाळच्या सुमारास अटक केली आहे.
रमैया आणि पदमा अशी अटक कण्यात आलेल्या दोन नक्षलवाद्यांची नावे आहे. रामन्ना हा दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा मेम्बर असून त्याच्यावर २५ लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. पदमा ही एरिया कमिटी मेंबर आहे व तिच्यावर सहा लाखांचे बक्षीस होते . रामन्ना हा मुळचा हैद्राबाद येथील असून त्याच्यावर तो छत्तीसगढ़, मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्यातील नक्सली चडवलित सक्रिय होता. हे दोन्ही नक्सली बल्लारपुर रेल्वे स्थानक परिसरात असल्याची गुप्त माहिती आज पोउपनि धर्मेद्र मडावी नक्षल सेल, व चंद्रपुर सि-60 पथक यांना मिळाली व ते खात्रीसाठी व कार्यवाहीसाठी बल्लारशाह येथे रावण झाले .त्या आधारे सर्च मोहिम राबवत या दोन्ही नक्सलवाद्यांना अटक केली आहे.