Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
शनिवार, फेब्रुवारी १०, २०१८
शुक्रवार, फेब्रुवारी ०९, २०१८
लाखोंचे बक्षीस असणारे नक्षलवाद्यांना चंद्रपूरातून अटक
चंद्रपूर/प्रतिनिधी:
गडचिरोली जिल्ह्यातील लाहेरी पोलिसांना वॉन्टेड असलेल्या दोन जहाल नक्सवाद्यांना चंद्रपुर नक्सल सेलच्या पथकाने बल्लारपुर रेल्वे स्थानक परिसरातुन आज सकाळच्या सुमारास अटक केली आहे.बुधवार, डिसेंबर ०६, २०१७
गडचिरोलीत 7 नक्षलवाद्यांचा खात्मा
गडचिरोली – जिल्ह्यातील अहेरीच्या कल्लेड जंगलात आज पहाटे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यात पोलिसांनी 7 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. मृतांमध्ये पाच पुरुष आणि दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. घटनास्थळावरुन शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला असल्याचे सुत्रांनी सांगितले. 2 डिसेंबर ते 8 डिसेंबर नक्षलवादी पीएलजी सप्ताह सुरु केला होता. या पार्श्वभूमिवर राज्यातील अधिकारी गडचिरोलीत गेल्या 8 दिवसांपासून तळ ठोकून होते. त्यांचे नक्षलींच्या हालचालींवर बारीक लक्ष होते. त्यातूनच ही कारवाई करण्यात आली आहे.सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर उपपोलिस ठाण्यांतर्गत कल्लेड येथील जंगलात आज भल्या सकाळी झालेल्या चकमकीत पोलिसांच्या सी-६० पथकाच्या जवानांनी ७ नक्षल्यांचा खात्मा केला. यात ५ महिला, तर २ पुरुष नक्षल्यांचा समावेश आहे. या घटनेमुळे मागील महिन्यात ५ निरपराध नागरिकांचे हत्यासत्र चालविणाऱ्या नक्षल्यांना जबर फटका बसला आहे.
कल्लेड जंगलात नक्षल्यांचे शिबिर सुरु असल्याची विश्वसनीय माहिती मिळाल्यानंतर सी-६० पथकाचे कमांडर मोतीराम मडावी यांच्या नेतृत्वातील पथक त्या भागात नक्षलविरोधी अभियान राबवीत होते. आज सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार केलाच नक्षलवादी जंगलात पसार झाले. घटनास्थळाची पाहणी केली असता त्यात ५ महिला व २ पुरुष नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले. पोलिसांनी नक्षल्यांची शस्त्रे व अन्य साहित्यही ताब्यात घेतल्याची माहिती आहे. घटनास्थळी हेलिकॉप्टर पाठविण्यात आले असून, मृतदेह दुपारपर्यंत पोलिस मुख्यालयी आणण्यात येणार आहेत. घटनास्थळी वरिष्ठ कॅडरचे नक्षलवादी असावेत, असा अंदाज आहे.
२ डिसेंबरपासून नक्षल्यांनी स्थापन केलेल्या पीपल्स लिबरेशन गुर्रिला आर्मीचा १७ वा स्थापना सप्ताह सुरु झाला आहे. या सप्ताहापूर्वीच नक्षल्यांनी संपूर्ण जिल्हाभरात उच्छाद मांडून पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन ५ नागरिकांची हत्या केली. शिवाय कोटगूल येथील भूसुरुंगस्फोटात हवालदार सुरेश गावडे, तर टवे येथील जंगलात झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे जवान मंजुनाथ शिवलिंगप्पा हे शहीद झाले. त्यानंतर पीएलजीए सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलिस महासंचालक डी.कनकरत्नम व पोलिस महानिरीक्षक शरद शेलार हे जिल्ह्यात तळ ठोकून बसले असून, नक्षल्यांची हालचालीवर बारिक लक्ष ठेवून पोलिसांना मार्गदर्शन करीत आहेत. आज त्यांच्या मार्गदर्शनात ७ नक्षल्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. अलिकडच्या काळातील सी-६० पथकाने केलेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे.
मंगळवार, नोव्हेंबर २८, २०१७

नक्षलवाद्यांकडून युवकाची गळा चिरून हत्या
पोलीस आणि नक्षलवाद्यांचा वाद काही संपता संपेना मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी एटापल्ली तालुक्यातील गट्टा - जांभिया पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या झारेवाडा येथील जंगलात सशस्त्र नक्षल्यांनी एका युवकाची गळा चिरुन हत्या केल्याची घटना घडली. मनोज राजू नरोटे रा. झारेवाडा, असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार गट्टा -जांभिया पोलिस ठाण्यापासून १० किमी अंतरावरील झारेवाडा गावानजीकच्या जंगल परिसरात आज मनोज नरोटे याचा मृतदेह आढळून आला. ३ वर्षापूर्वी झारेवाडा येथील रमनी आत्राम या महिलेचा खून झाला होता. तेव्हापासून मनोज नरोटे फरार होता. २ महिन्यांपूर्वीच तो गावात परत आला असल्याची माहिती नक्षलवाद्यांना मिळाली. मात्र, आज त्याचा मृतदेह आढळून आला. रमनी आत्रामच्या खुनात मनोज नरोटे याचा सहभाग असल्याचा काही जणांचा संशय होता. त्यामुळे मनोजची हत्या नक्षल्यांनी केली की अन्य कुणी, याबाबत साशंकता आहे.
चालू आठवड्यात नक्षल्यांनी पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन धानोरा तालुक्यातील ३ युवकांची हत्या केली. शिवाय कोटगूल येथील भू-सुरुंगस्फोटात हवालदार सुरेश गावडे, तर पडियलमेट्टा जंगलात झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे जवान मंजुनाथ शिवलिंगप्पा हे शहीद झाले. या दोन घटनांमध्ये चार पोलिसही जखमी झाले आहेत. या घटनांवरून झारेवाडा येथील मनोज नरोटेच्या हत्येत नक्षल्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, घटनास्थळी नक्षल्यांनी कुठल्याही प्रकारचे पत्रक न टाकल्याने साशंकता आहे.
गुरुवार, नोव्हेंबर २३, २०१७
गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यात एकाची नक्षलवाद्याकडून हत्या
गडचिरोली ,-/पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी मंगळवारी(ता.२१) रात्री धानोरा तालुक्यातील रानवाही येथील इसमाची गळा चिरुन हत्या केली. जाधव जांगी(४८), असे मृत इसमाचे नाव आहे.
मंगळवारी रात्री २० ते २५ नक्षलवादी जाधव जांगीच्या घरी गेले. त्यांनी जाधवला झोपेतून उठवून बाहेर नेले. दुसऱ्या दिवशी(ता.२२) सकाळी त्याचा मृतदेह राजनांदगाव जिल्ह्यातील औंधी पोलिस ठाण्यांतर्गत रायमनोरा येथील जंगलात आढळून आला. मात्र, जाधव जांगीच्या शरीरावर बंदुकीच्या गोळीच्या किंवा शस्त्राच्या खुणा आढळल्या नाहीत. त्यामुळे त्याची हत्या नक्षल्यांनी केली की अन्य कुणी, याबाबत पोलिस साशंक आहेत. दुसरीकडे, घटनास्थळी आढळलेल्या पत्रकावरुन ही हत्या नक्षल्यांनीच केल्याचा अंदाज आहे. १० व ११ जुलै २०१७ रोजी पेंढरी उपपोलिस ठाण्यांतर्गत रानवाही व मुंगनेर-येनगावच्या हद्दीत पोलिसांशी झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षली ठार झाल्या होत्या. नक्षल्यांची माहिती जाधव जांगी यानेच पोलिसांना देऊन चकमक घडवून आणली, जाधव हा पोलिसांचा खबऱ्या आहे, असे या पत्रकात म्हटले आहे.
एकाच दिवशी नक्षल्यांनी दोन हत्या केल्या आहेत. २१ नोव्हेंबरच्या दुपारी पेंढरी उपपोलिस ठाण्यांतर्गत झाडापापडा येथे कोंबडा बाजारात सुनील तिलकबापू पवार या युवकाची गोळ्या घालून हत्या केली. या घटनेत दोन युवक जखमी झाले. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून नक्षल्यांच्या कारवाया थंडावल्या होत्या. परंतु आता त्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.



