Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी २२, २०१८

मेट्रोच्या अत्यावश्यक कामांमुळे रविवारी वीज नाही

नागपूर -  नागपूर मेट्रोला करावयाच्या अत्यावश्यक कामांमुळे महावितरणतर्फ़े रविवार दि. 25 फ़ेब्रुवारी 2018 रोजी कॉग्रेसनगर विभागांतर्गत असलेल्या शनि मंदीर, कुंभारटोली, विद्यापीठ परिसर, अंबाझरी, झिरो माईल, शासकीय मुद्रणालय आणि त्यासभोवतालच्या परिसरातील वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महावितरणतफ़े देण्यात आली आहे.

मेट्रोच्या कामांमुळे रविवारी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत 11 केव्ही आनंद टॉकीज वाहिनीवरील शनि मंदीर, हरदेव हॉटेल, कुंभारटोली, तेलीपुरा, कोष्टीपुरा या भागात याशिवाय 11 केव्ही शंकर नगर (विद्यापीठ परिसर) या वाहिनीवरील विद्यापीठ परिसर, रीद्धी-सिद्धी अपार्टमेंट, हिल टॉवर, माऊंट कॅसल, अंबाझरी उद्यान, देवतळे लेआऊट, वर्मा लेआऊट, उत्तर अंबाझरी मार्ग, पांढराबोडीचा काही भाग आणि अंबाझरी टेकडी या भागात तर  सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत 11 केव्ही झिरो माईल वाहीनीवरील सीटीओ कंपाउंड, बीएसएनएल कार्यालय आणि शासकीय मुद्रणालय या भागातील वीजपुरवठा बंद राहील

महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या या भागातील वीज ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातून पुर्वसुचनाही देण्यात येईल, ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.