चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूरात काँग्रेसच्या वतीने योगगुरू रामदेवबाबा यांना काळे झेंडे दाखवत निषेध करण्यात आला आहे. रामदेवबाबा यांचा जिल्ह्यातील ३ ठिकाणी योगाचा प्रचार करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात येत आहे. चंद्रपुरात शासकीय बांधकाम विभागाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर युवक कॉंग्रेस जिल्हा कमिटीच्या शिवा राव यांच्या नेतृवतात कार्यकर्त्यांनी बाबांचा ताफा येताच हातातील काळे झेंडे दाखवले.
मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी या सर्वाना ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.नेहमी काळ्या धनावर बोलणारे बाबा आज गप्प का ? असा कॉंग्रेसने सवाल करत योगगुरू रामदेव बाबा यांना काळे झेंडे दाखविण्यात आले असल्याचे वृत्त आहे. पतंजली योग समितीच्या वतीने संध्याकाळी चांद क्लब ग्राउंडवर महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर,राज्याच्या महिला व बालविकास तसेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे,आमदार नानाजी शामकुळे,महापौर अंजली घोटेकर,जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे उपस्थित होते.रामदेव बाबा याठिकाणी येत असतांनाच त्यांचा ताफा हा चांदाक्लब ग्राउंडवर पोहोचताच त्यांना कॉंग्रेसच्या वतीने काळे झंडे दाखवण्यात आले.