Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रामदेव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रामदेव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, फेब्रुवारी २३, २०१८

चंद्रपूरच्या वनौषधी व खाद्यान्नाला पतंजलीची बाजारपेठ

चंद्रपूरच्या वनौषधी व खाद्यान्नाला पतंजलीची बाजारपेठ

Image may contain: 1 person, smiling, standing
त्रिदिवसीय योग शिबिरात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला योग 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
                            चंद्रपूरच्या वनौषधी व खाद्यान्नाला पतंजलीची बाजारपेठ देणार असल्याचे रामदेव बाबा यांनी सांगितले.  चंद्रपुरात अतिशय उत्तम तांदळाचे पीक घेतल्या जाते. त्यामुळे हा दर्जा बघता  पतंजलीच्या विविध विक्री केंद्रांतून चंद्रपूर जिल्ह्यातील दर्जेदार तांदूळ विकल्या जाईल. तसेच पतंजलीला आवश्यक विविध वनौषधींचे शेतकऱ्यांनी उत्पादन घेतल्या चंद्रपूर जिल्हा व परिसरातील वनौषधी व खाद्यान्नाला शाश्वत बाजारपेठ उपलब्ध केली जाईल, असे आश्वासन योगगुरू रामदेवबाबा यांनी चंद्रपूर येथे दिले. 
               शेतकरी मेळाव्यापूर्वी रामदेवबाबा यांच्यासोबत जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची चर्चा झाली. पुढील महिन्यात २ मार्च रोजी यासंदर्भात पंतजलीच्या मुख्यालयात चर्चा होणार आहे. आपल्या पुढील तीन दिवसांच्या वास्तव्यात हे खाद्यान्न व वनौषधींची तपासणीही बाबा रामदेव यांच्या नेतृत्वातील चमू करणार आहे. या बैठकीमुळे शाश्वत बाजारपेठेच्या मुद्यावर यशस्वी तोडगा निघण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 
                            या बैठकीला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यासह वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अशोक नेते, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक तथा मुख्य वनसंरक्षक मुकूल त्रिवेदी, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, उपसंचालक (बफर) गजेंद्र नरवणे, उपवनसंक्षक गजेंद्र हिरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. अण्णासाहेब हसनाबादे, आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एस. एस. किरवे, उपविभागीय कृषी अधिकारी नंदकुमार घोडमारे यांची उपस्थिती. मूल येथील अजय गोगुलवार यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. 
                                  बैठकीमध्ये अधिकाऱ्यांनी वनपरिसरात व शेतीमध्ये होणाऱ्या पिकांची व वनऔषधीची माहिती दिली. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हजारो शेतकरी सेंद्रीय पद्धतीने धानाचे उत्पादन घेतात. सेंद्रीय तांदूळ विषमुक्त तांदूळ म्हणून प्रयोगशाळेने मान्यता दिली आहे. त्यामुळे या तांदळाची विक्री पतजंलीमार्फत करण्यात यावी, अशी मागणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी केली होती . पतंजलीद्वारे किमान आधारभूत किंमत ठरवावी. शेतकऱ्यांना सेंद्रीय धानाचे उत्पादन घेण्याबाबत सांगण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यावेळी वनविभागाच्या अधिका-यांनी अर्जूनसाल, मोहाफूल, कोरफळ (अॅलोवेरा), सेंद्रीय हळद, मोहा सरबत, मोहा जाम, सफेद मुसळी आदी वनऔषधीपासून तयार केलेल्या उत्पन्नाबाबत माहिती दिली. यावेळी पूजेच्या साहित्यामध्ये अगरबत्तीसाठी चंद्रपूर व गडचिरोली परिसरातील बांबूला प्राधान्य देण्याचा प्रस्तावही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेवला आहे. रामदेवबाबा यांनी यावेळी अधिकाऱ्यांच्या प्रस्तावाचे स्वागत केले. कोरफळ व मध याबाबतच्या कराराला तत्काळ मूर्तरूप दिले जाईल, असे आश्वासन दिले. तथापि, पुढील दोन दिवसांत रामदेवबाबा यांच्यासोबत आलेल्या तज्ज्ञांच्या चमू व स्वत: रामदेव महाराज सर्व वनऔषधी व वनापासून बनविलेल्या खाद्यांची स्वत: तपासणी करणार आहेत. त्यांनी यावेळी मध खरेदीसाठी आपण आजच तयार असून याबाबतची यंत्रणा जिल्ह्यात उभी करण्याची सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. या बैठकीमध्ये आलेल्या विविध प्रस्तावांवर पुढील २ मार्च रोजी पतंजलीच्या मुख्य कार्यालयात होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतले जाणार आहेत.
'विकते ते पिकवायला शिका...
चंद्रपूर व विदर्भ परिसरातील शेतकऱ्यांनी एका पिकावर न राहता आता वनौषधी आणि दुग्ध उत्पादनाकडे वळावे. मला वनौषधींची गरज आहे. मी खरेदी करायला तयार आहे. त्यामुळे जे विकल्या जाते ते पिकवायला सुरूवात करून स्वत:ला व देशाला बळकट करा, असे आवाहन योगगुरू बाबा रामदेव महाराज यांनी मंगळवारी येथे केले. चंद्रपूर तालुक्यातील मूल येथे मंगळवारपासून आयोजित तीन दिवसीय बाबा रामदेव महाराज यांच्या योगाभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने मंगळवारी दुपारच्या सत्रात आयोजीत शेतकरी मेळाव्याला ते संबोधीत करीत होते. या मेळाव्याला चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मेळाव्याच्या व्यासपीठावर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, खासदार अशोक नेते, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, माजी आमदार अतुल देशकर यांची उपस्थिती होती. यावेळी रामदेव महाराज यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला
Image may contain: 1 person, crowd, beard and outdoor
(छायाचित्र:गोलू बाराहाते)

गुरुवार, फेब्रुवारी २२, २०१८

कॉंग्रेसने दुसऱ्या दिवशीही रामदेवबाबांना दाखविले काळे झेंडे

कॉंग्रेसने दुसऱ्या दिवशीही रामदेवबाबांना दाखविले काळे झेंडे

वरोरा/प्रतिनिधी:
बुधवारी चंद्रपूर येथे रामदेव बाबांचे आगमन होताच त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले.  याची पुनरावृत्ती पुन्हा चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे घडली आहे,गुरवारी देखील चंद्रपुर जिल्ह्यातील वरोरा येथे कृषी मेळाव्यासाठी आलेल्या योग गुरू रामदेव बाबा यांना वरोरा येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी रत्नमाला चौकात काळे झेंडे दाखवून "रामदेव बाबा चले जाव"च्या  घोषणा देण्यात आल्या.व भाजप सरकारचा निषेध नोंदवला. 
रामदेवबाबा हे चंद्रपूर जिल्ह्यात ३ दिवसीय योग दौऱ्यावर आहेत,काल चंद्रपूर येथे महिलांचा संमेलन कार्यक्रमात येत असतांनाच चंद्रपुरात युवक कॉंग्रेसच्या वतीने रामदेव बाबा यांना काळे झेंडे दाखविण्यात आले होते. हि काळेझेंडे दाखविण्याची पुनरावृत्ती कॉग्रेसने पुन्हा वरोऱ्यात दुसऱ्या दिवशीही केली.त्यामुळे रामदेवबाबा यांना सलग दुसऱ्यादा चंद्रपूर जिल्ह्यात काळे झेंड्याना मुकावे लागले आहे. यावेळी काँग्रेचे नेते  डाॅ.विजय देवतळे व डाॅ.आसावरी देवतळे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. "रामदेव बाबा चले जाव" "रामदेव बाबा कालेधन का क्या हुआ" , "रामदेव बाबा लोकपाल बिल का क्या हुआ" अश्या प्रकरे हातात ब्याणार घेऊन रामदेव बाबांच्या ताफ्यासमोर निदर्शेने करत घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात  माजी नगराध्यक्ष विलास टिपले,वरोरा तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद भोयर,भगतसिंग मालुसरे,नगरसेवक विठ्ठल टाले,दुर्गा ठाकरे, सोमदेव कोहाडे,मनोहर स्वामी,मंगेश मसाडे,विनोद लांबट संजीवनी भोयर,शिरोमणी स्वामी,गिरीधर कष्टी,मनिष जयस्वाल,अंजु भोयर,जयश्री सरोदे, गंगाधर कारेकार, यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मिळालेल्या माहितीवरून  वरोरा पोलिसांनी याप्रकरणी 100  कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात येत असून वृत्त लिहीस्तोवर गुन्हे दाखल झाले नसल्याचे समजते आहे.


बुधवार, फेब्रुवारी २१, २०१८

चंद्रपुरात काँग्रेसने रामदेवबाबांना दाखविले काळे झेंडे

चंद्रपुरात काँग्रेसने रामदेवबाबांना दाखविले काळे झेंडे

चंद्रपूर/प्रतिनिधी: 
चंद्रपूरात काँग्रेसच्या वतीने योगगुरू रामदेवबाबा यांना काळे झेंडे दाखवत निषेध करण्यात आला आहे.  रामदेवबाबा यांचा जिल्ह्यातील ३ ठिकाणी योगाचा प्रचार करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात येत आहे. चंद्रपुरात शासकीय बांधकाम विभागाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर युवक कॉंग्रेस जिल्हा कमिटीच्या शिवा राव यांच्या नेतृवतात  कार्यकर्त्यांनी बाबांचा ताफा येताच हातातील काळे झेंडे दाखवले.                                       
मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी या सर्वाना ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.नेहमी  काळ्या धनावर बोलणारे बाबा आज गप्प का ? असा कॉंग्रेसने सवाल करत योगगुरू रामदेव बाबा यांना  काळे झेंडे दाखविण्यात आले असल्याचे वृत्त आहे. पतंजली योग समितीच्या वतीने संध्याकाळी चांद क्लब ग्राउंडवर महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर,राज्याच्या महिला व बालविकास तसेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे,आमदार नानाजी शामकुळे,महापौर अंजली घोटेकर,जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे उपस्थित होते.रामदेव बाबा याठिकाणी येत असतांनाच त्यांचा ताफा हा चांदाक्लब ग्राउंडवर पोहोचताच त्यांना कॉंग्रेसच्या वतीने काळे झंडे दाखवण्यात आले.

सोमवार, फेब्रुवारी १९, २०१८

एक मोदी पैसा जमा करतो दुसरा मोदी तो पळवितो:रामदेव बाबा

एक मोदी पैसा जमा करतो दुसरा मोदी तो पळवितो:रामदेव बाबा

चंद्रपूर(ललित लांजेवार): 
एक मोदी पैसा बँकेत जमा करतो आहे. आणि दुसरा मोदी जमा केलेला पैसा पळवितो आहे अशी स्तुतीसुमन बोल रामदेव बाबा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल चंद्रपुरात बोलतांना म्हणाले .
काळे धन कमविणाऱ्यावर कारवाई करणे हि जबाबदारी सरकारची आहे,आणि सरकार याविरोधात कारवाई करत आली आहे. देशाला ११५०० कोटीचा फटका देत परदेशात पसार झालेल्या निरव मोदी बद्दल रामदेव बाबा बोलतांना म्हणाले एक मोदी पैसा बँकेत जमा करतो आहे आणि दुसरा मोदी जमा केलेला पैसा पळवितो आहे.अश्या पैसे पळवून घेऊन जाणारे एक प्रकारचे देशद्रोही आहे, मी फक्त एकाच मोदीला ओळखतो, ते म्हणजे नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदींच्या व्यतिरिक्त जे पण मोदी आहेत जे, घोटाळे करतात त्यांच्यामुळे देशाचे नाव खराब होते. नीरव मोदीला त्याच्या पापाचे फळ मिळेल. मोदी सरकार त्याला त्याच्या योग्य जागी धाडेल, असा विश्वास योग गुरु रामदेव बाबांनी व्यक्त केला.
तर आतापरीयंत विदेशात लपविलेला काळा पैसा देशात परत आणायचे माझे प्रयत्न सुरु आहे असे मत योगगुरू रामदेव बाबा यांनी चंद्रपूर येथील श्रमिक पत्रकार भवनात आयोजीत पत्रपरिषदेत बोलतांना म्हणाले. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे राज्याचे अर्थ, नियोजन, वने मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून २० ते २२ पर्यंत नि:शुल्क योग चिकित्सा व ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त योगगुरु रामदेवबाबा चंद्रपुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.याप्रसंगी सुधीर मुनगंटीवारही उपस्थित होते.यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद काकड़े,कोषाध्यक्ष- मजहर अली जिल्हापरिषद अध्यक्ष देवराव भोन्गडे आदी उपस्थित होते. 

 योगा केल्याने अच्छे दिन येऊ शकतात, नेहरू देखील योग करायचे ,सोनिया गांधी,राहुल गांधी,हे सर्व योग करतात योगा केल्याने अच्छे दिन येऊ शकतात असा टोला देत रामदेव बाबा यांनी गाधीं परिवाराची खिल्ली उडविली. तर ते पुढे बोलतांना म्हणाले पंतप्रधान पद हे देशाचे महत्त्वाचे पद आहे. या पदाची विश्वासार्हता जोपासण्यासाठी हे पद लोकपालच्या कक्षेत आणू नये, समाजसेवक अण्णा हजारे यांचे वय आता वाढलेले आहेत मात्र ते भ्रष्टाचार विरोधात आंदोलनाच्या तयारीत लागले आहे. जर देशाचा कारभारच पारदर्शक असेल, तर आंदोलन करण्यात अर्थ काय? अश्या अन्ना हजारेंच्या आंदोलनाचा फायदा राजकीय मंडळी घेतात. या सर्वातून जेव्हा हजारे बाहेर पडतील तेव्हाच त्यांच्यासोबत राहीन, असेही रामदेवबाबा म्हणाले.
रामदेव बाबांनी मुनगंटीवारांची थोपटली पाठ 

मी गेल्या १० वर्षा आधी चंद्रपूर येथे योग शिबिराविषयी कार्यक्रासाठी आलो होतो तेव्हाही भव्यदिव्य आयोजन हे मुनगंटीवार यांनी केले होते.मुनगंटीवार हे हुशार व चलाख राजकारणी असून गेल्या २५ वर्षांपासून सत्तेत किव्हा सत्तेच्या बाहेर राहून राजकारणात विजय प्राप्त केले आहे. सुधीर मुनगंटीवार हे जनतेच्या मनात दिवसेंदिवस राज करीत आहेत. राजकारणात राहुन जनतेसाठी आरोग्य, व्यसनमुक्ती ,शिक्षण आणि अनेक बाबींसाठी ते झटत आहेत. सर्वांना झिरो टक्के बजेटमध्ये आरोग्य लाभावे, अशी त्यांची संकल्पना आहे. आणि म्हणूनच त्यांच्या पुढाकारातून मूल येथे तीन दिवसीय योगचिकित्सा व ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचेही रामदेवबाबा यावेळी म्हणाले.