पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन
चंद्रपूर -जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील 8 ते 10 वर्षांपासून काम करणाऱ्या 137 कंत्राटी कामगारांना अचानक कामावरून काढण्यात आले.अपंग प्रमाणपत्र,जन्म-मृत्यू नोंदणी,जननी शिशू सुरक्षा योजना,स्वयंपाकी ,सुरक्षा रक्षक अशा विविध व संवेदनशील ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून काढल्याने दवाखान्यातील अत्यावश्यक सेवा प्रभावित झालेल्या आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयात काम करणार्या कंत्राटदाराच्या कंत्राटाची मुदत मागील मार्च 2017 मध्ये संपलेली होती. त्यानंतर कंत्राटदारास मुदतवाढ देण्यात आली. मध्यंतरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता श्री मोरे यांनी नव्याने निविदा काढून 236 कामगारांना कंत्राटी पध्दतीने कामावर घेतले.विशेष म्हणूजे जुन्याच कंत्राटदाराला नविन काम देण्यात आले.मात्र 8-10 वर्षांपासून काम करणाऱ्या जुन्या कंत्राटी कामगारांच्या समायोजनाचा विचार करण्यात आला नाही.जिल्हा सामान्य रुग्णालय हे आधी शासनाच्या आरोग्य विभागा अंतर्गत काम करीत होते.आता रूग्णालय मेडिकल कॉलेज म्हणजेच वैद्यकीय शिक्षण मंत्रालय अंतर्गत अस्थायी स्वरूपात म्हणजे तिन वर्षांसाठी काम करणार आहे.सध्या या रूग्णालयातील परमनंट कर्मचारी- अधिकारी हे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निधीतून पगार घेतात व वैद्यकीय शिक्षण मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या मेडिकल कॉलेज ला सेवा देतात.अशाच प्रकारे जुन्या कंत्राटी कामगारांचे समायोजन करणे शक्य होते.परंतु शासकीय वैद्यकीयाचे डीन व सामान्य रुग्णालयाचे जिल्
हा शल्यचिकित्सक यांच्या चुकीमुळे 137 कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.त्यांच्या समायोजनाचा प्रश्न निकाली निघल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा प्रहार चे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी दिला आहे.