Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जानेवारी ०१, २०१८

लोकविध्यालय तथा उच्च माध्य. विध्यलयात स्नेह संमेलन

ब्रम्हपुरी/ प्रतिनिधी :- गुलाब ठाकरे

ब्रम्हपुरी दक्षिण परिसराअंतर्गत येणाऱ्या गांगलवाडी येथील लोक विध्यालयात आज दिनांक :-१/१/२0१८ ला नूतन वर्षाच्या शुभपर्वावर स्नेह संमेलन व  पालक मेळावा संपन्न झाला.
   या मेळाव्यांना मा.श्री.ज्ञानेश्वर भोयर यानी स्नेह संमेलन सोहळ्याच  उद्घाटन  पार पाडण्यात आला.उद्घाटन महोदयानी मार्गदर्शन करताना  शाळेतील  विध्यार्थाना व त्यांच्या पालकांन सोबत संवाद साधताना   सांगितल की शिक्षक आणि पालकांचा एकत्र ताळमेळ होत राहिला तर  त्या विद्यार्थ्यातील सुप्त  कलागुणाना  चांगल्या प्रकारे वाव मिळेल.  शाळांमध्ये प्रत्येक वर्गात पालक-शिक्षक संघ स्थापन करून पालक सभा आपण दर महिन्याला घेत असतो. पालक संघ व्यवस्थापण यांची कामे कोणती हे सुद्धा सांगितले की विध्यार्थी घरून शाळेत येतो की नाही ,  अभ्यासक्रम पूर्ण व्हावा, अभ्यासात कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी योग्य त्या उपाययोजना सुचविणे, अभ्यासाशी पूरक असलेल्या अभ्यासक्रमाचे नियोजन करण्यास सहाय्य मिळविणे, सहशालेय उपक्रमांना मान्यता देणे, शाळेतील शैक्षणिक शुल्क, सत्र फी व शालेय उपक्रमांसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कांसंबंधी माहिती घेऊन पालक-शिक्षक संघाच्या समितीपुढे ते मांडणे अशी पालक-शिक्षक संघाची कर्तव्ये ठरवून देण्यात आली आहेत.स्नेह संमेलन आपण आज ठेवला विध्यार्थ्याच्या अंगी चौदा विधा चौसष्ट कला यांच्या पैकी एक ना एक कला घेऊन येत असतो ती कला सांस्कृतिक कार्यक्रमातून दिसली "भूक " या नाटकातील अप्रतिम अशी कलापथनाट्य विध्यार्थ्यानी सादर करून पालकांचे विध्यार्थ्याँचे तसेच प्रेक्षकांच लक्ष वेधून घेतल.न्रुत्य सुद्धा खूप सुंदर या विध्यार्थ्यानी सादर केला.असे मा.श्री .भोयर सरपंच साहेब यानी व्यक्त केले.तसेच स्नेह संमेलनाचे अध्यक्ष मा .श्री .विष्णुजी तोंडरे यानी अध्यक्षीय संभाषण करताना सांगितले की शिक्षक पालक संघाच्या सभेत
 पालकांची उपस्थिती अशीच ठेवत राहिला तर  विध्यार्थ्याच्या  शिक्षण गुणवत्तावाढीसाठी मदत होईल असे सांस्कृतिक कार्यक्रम राबवून मोठा कलाकार किंवा उच्च शिक्षित व्यक्ती होण्यासाठी  अडचणी येणार नाही. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाची चांगले मिळाव व वीध्यार्थ्याना चांगल्या दिशने प्रगती करने याचे संस्कार शिक्षकच घडवू शकतो पण पालकांची साथ लाभली तर हे शक्य होणार असे मा.श्री.तोंडरे सर दी.रु.ए.सो.ब्रम्हपुरी यानी व्यक्त केले.
त्याच प्रमाणे प्रमुख उपस्थितीत मा.कुथे सर माजी शिक्षक, श्री.धारने सर माजी शिक्षक , श्री.सेलोकर साहेब गुरुकृपा क्लॉथ सेंटर गांगलवाडी , ठाकरे साहेब डोर्ली, तसेच शाळेतील शिक्षक शिक्षकोत्तर विध्यार्थी बहूसंख्य प्रेक्षक यांच्या उपस्थितीत स्नेह संमेलन व पालक मेळावा संपन्न झाला.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.