Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जानेवारी ०१, २०१८

मुख्य प्रषासक कोल्हेंची गच्छंती अटळ



नोकर असल्याने पदावर राहण्यास अपात्र?

रामटेक /तालुका प्रतिनिधी- रामटेक कृशि उत्पन्न बाजार समीतीचे अषासकीय प्रषासक मंडळाची नुकतीच राज्य सरकारने घोशणा केली.तसे अधिकृत आदेष नागपुर जिल्हा उपनिबंधक सतीष भोसले यांनी जारी केले व त्यानुसार मुख्य प्रषासक अनिल कोल्हे,उपमुख्यप्रषासक किषोर रहांगडाले व अन्य प्रषासकांनी दिनांक 22 डिसेंबर 2017 रोजी कार्यभार स्विकारला.मात्र अलिकडेच आकोट कृशि उत्पन्न बाजार समीतीच्या अतुल माधवराव म्हैसने या संचालकांना अकोल्याचे जिल्हा निबंधक यांनी ते नोकरी करीत असल्याने अपात्र घोशित केल्याने व अषाच कारणांसाठी आकोटच्या बाजार समीतीच्या सभापतीसह सात संचालकांनाही अपात्र घोशित केल्याने रामटेकच्या बाजार समीतीचे नव्याने नियुक्त करण्यात आलेले मुख्यप्रषासक अनिल कोल्हे हे पदावर कसे काय राहू षकतात असा प्रष्न उपस्थित झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की रामटेक व मौदा अषी दोन तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेली रामटेक-मौदा कृशि उत्पन्न बाजार समीतीचे अलिकडेच राज्या सरकारने विभाजन केले व या दोन्ही बाजार समीत्यांवर स्वतंत्र अषासकीय प्रषासकीय मंडळे नियुक्त केली आहेत.रामटेकच्या या विभाजीत बाजार समीतीवर मुख्य प्रषासक या पदावर रामटेकच्या स्थानीक आदर्ष विद्यालयांत षिक्षक या पदावर कार्यरत असलेले अनिल कोल्हे यांची व अन्य 16 असे एकूण सतरा सदस्यांची नेमणूक केली आहे.‘‘महाराश्ट्र कृशि उत्पन्न पणण (विकास व विनियम) नियम 1967 चे नियम 41(1) जी च्या तरतुदीनुसार षासकीय सेवक किंवा स्थानीक स्वराज्य संस्थेचा कर्मचारी हा असेल व त्याचे मुख्य उत्पन्नाचे साधन षेती नसेल तर अषी व्यक्ती संचालक पदासाठी अपात्र ठरते’’ त्यामुळे आकोटच्या म्हैसने यांना जो न्याय लावला तोच अनिल कोल्हे यांना लावला तर ते मुख्य प्रषासक या पदासाठी अपात्र ठरतात अषी चर्चा केली जात आहे.कारण की म्हैसने हे षासकीय अनुदानीत खाजगी षिक्षण संस्थेचे कर्मचारी आहेत व त्यामुळे ते पब्लिक सर्वंट या व्याख्येत बसतात.अनिल कोल्हे हे देखिल रामटेकच्या सरकारतर्फे अनुदानीत खाजगी षाळेत षिक्षक आहेत.
रामटेक कृशि उत्पन्न बाजार समीतीच्या मुख्य प्रषासक पदावर अनिल कोल्हे यांची नियुक्ती झाल्याबरोबर रामटेकच्या राजकीय वर्तुळांत अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.पुण्यनगरीने तर याबाबत बातमी प्रकाषीत करून षिक्षक कसा काय बाजार समीतीचा मुख्य प्रषासक होवू षकतो असा प्रष्न उपस्थित केला होता.मात्र पदासाठी आसुसलेल्यांना त्याची काहीच पर्वा नसल्याचे दिसून येते.
उपरोक्त बाबतीत नागपुरचे जिल्हा उपनिबंधक सतीष भोसले यांना विचारणा केली असता त्यांनी सांगीतले की,रामटेक बाजार समीतीवर अषासकीय प्रषासक मंडळ राज्य सरकारच्या सुचनेनुसार व त्यांनी दिलेली नावे आम्ही राज्य सरकारच्या वतीने जाहीर केली आहेत.यासाठी संबधित सर्वांचे षपथपत्र घेण्यांत आली आहेत.या षपथपत्रामध्ये हे सर्व षेतकरी असल्याचे त्यांनी षपथेवर जाहीर केले आहे व त्यांचेषी संबधित सातबाराचा उतारा जोडल्याने ते षेतकरी असल्याचे दिसून येते.हे सर्व षेतकरी आहेत त्यामुळे त्यांची नियुक्ती करण्याचे आदेष आपण काढले आहेत.अनिल कोल्हे यांनी आपल्या षपथपत्रांत ते कुठेही षासकीय नोकरीत नाहीत असा उल्लेख केला आहे.मात्र ते रामटेकच्या षासन अनुदानीत खाजगी षाळेत षिक्षक असल्याचा उल्लेख केलेला नाही.याबाबत आपल्याकडे अद्याप कुणाचीही तक्रार नाही त्यामुळे आपण याची चैकषी केली नाही.तक्रार आल्यास नक्कीच चैकषी करणार असल्याचे त्यांनी स्पश्ट केले आहे.
उपरोक्त पाष्र्वभूमीवर मुख्यप्रषासक असलेल्या अनिल कोल्हे यांची गच्छंती अटळ मानली जात असून अकोला जिल्हा उपनिबंधक यांचे अलिकडील आकोट येथील संचालक अपात्र करण्याचे आदेषाचे पाष्र्वभूमीवर रामटेकच्या बाजार समीतीचे मुख्य प्रषासक अनिल कोल्हे यांचे काय होते याकडे संपुर्ण जिल्हयाचे लक्ष वेधले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.