वरोरा : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज देऊन सातबारा कोरा करण्यासोबतच इतर काही मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवारी उपविभागीय कार्यालयावर प्रहार जनशक्ती पक्षाच्याच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी धडक दिली.
शासनाने संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली. परंतु अंमलबजावणी केली नाही. त्यातच परतीचा पाऊस, गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन व तूर पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण कपाशीचे पीक नष्ट झाले आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून सातबारा कोरा करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या कपाशीवरील बोंडअळीची पाहणी करून नुकसान भरपाई देण्यात यावी. दिवसभर १२ तास तीन फेज वीज पुरवठा देण्यात यावा, स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा.आदी मागण्या लावून धरण्यात आल्या. मोर्चाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व अ औषध फवारणीत मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. त्यानंतर शिष्टमंडळाद्वारे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे महादेव ताठे, शेतकरी माधव जीवतोडे प्रहारचे गणेश उराडे, प्रशांत चौखे, संदीप वासेकर, निलेश ढवस, संदीप झाडे, रवी झाडे, विनोद वाटेकर, रामू डांगे, राजू वर्मा, गुड्डू एकरे, कन्हेैया सालोरकर, नितीन नागरकर, सुशील पिंपळकर व परिसरात बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.