Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, नोव्हेंबर २३, २०१७

तीन नगरसेवक हरविले


*नगरसेवकांच्या निष्क्रियतेवर असाही टोला.
*विंजासन परिसरात लावले बॅनर.

     *शिरीष उगे*
*वरोरा/ भद्रावती (प्रतिनिधी)*: भद्रावती शहरातील विंजासन,नेताजी नगर या प्रभागात एकूण चार नगरसेवकां पैकी तीन नगरसेवक हरविले आहेत. ज्यांना मिळाल्यास त्यांनी संपर्क साधावा असा अशयाने दोन बॅनर अनोळखी व्यक्तीने त्यांच्या प्रभागात लावले आहेत.
     निवडून आल्यानंतर आपल्या प्रभागात कधीही फिरकले नाही, अश्या निष्क्रिय नगरसेवकांवर या  बॅनरच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीने चांगलाच टोला हाणला आहे. विंजासन प्रभागात संजय आसेकर, सुधीर सातपुते, माधुरी कळमकर आणि अर्चना आरेकर असे चार नगरसेवक आहेत. यापैकी सुधीर सातपुते वगळता इतर तिनही नगरसेवकांनी प्रभागाकडे पाठफिरविली आहे. त्यामुळे या तीनही नगरसेवकांवर प्रभागातील नागरिक नाराज आहेत. बॅनरच्या माध्यमातून त्यांच्याकडे अप्रत्यक्ष इशारा करून त्यातून या नगरसेवकांवर निष्क्रियतेचा आरोप करण्यात आला. संजय आसेकर हे राष्ट्रवादीकडून निवडून आले. त्यानंतर त्यांनी सेनेत प्रवेश केला. ते चंद्रपूर ला राहतात. माधुरी कळमकर या या सेने कडून निवडून आल्या. काही दिवसातच त्यांनी प्रभाग सोडला त्या आयुधनिर्मनीत राहतात. त्यांचाही संपर्क तुटला आहे. अर्चना आरेकर कांग्रेसकडून निवडून आल्या. त्या प्रभागात राहत असल्या, तरी त्यांच्या विशिष्ट भाग वगळता अन्य भागात त्यांचा संपर्क नाही. बुधलेणीच्या प्रवेशद्वारा समोर आणि विंजासन येथील गांधी चौकातील मंदिरावर नगरसेवक हरविल्याचे बॅनर लावले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.