Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, नोव्हेंबर २१, २०१७

बर्वेची एकतर्फी निवड; सरपंचपदावर पडोळे

 
पारशिवणी : सतीश घारड
 तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत असलेली कांद्री ग्राम पंचायत येथील उपसरपंच निवडणूक दि.20 नोव्हे ला ग्राम पंचायत कार्यालय कांद्री येथे  झाली. ज्यात कांद्री ग्राम पंचायत वर कॉग्रेस पक्षाचे श्यामकुमार (बबलू) बर्वे यांनी १३ वोट घेऊन एकतर्फी विजय मिळविला. सरपंच व उपसरपंच निवडी मुळे काँग्रेस च्या हातात बहुमताने कांद्री ग्राम पंचायत ची सत्ता आली.कांद्री ग्राम पंचायत मध्ये काँग्रेस कडून श्यामकुमार (बबलू) बर्वे आणि भाजपा मधून शिवाजी चकोले यांनी उपसरपंच पदा करिता आपले नामांकन निवडणूक अधिकारी नवनिर्वाचित सरपंच बलवंत पडोले आणि ग्रा.प. सचिव दिनकर इंगळे यांच्या सुपूर्द करण्यात आलेली होती.

ज्या नंतर लगेच १७ सदस्यांन कडून उपसरपंच पदाच्या उमेदवारी साठी मतदान प्रक्रियेला सुरवात झाली.काँग्रेस चे श्याम बर्वे यांच्या समक्ष कुठल्याही प्रकारचे मोठे आव्हान भाजप च्या प्रतिद्वंदी उमेदवार शिवाजी चकोले यांच्या कडून नव्हते कारण काँग्रेस पक्षाकडून सरपंच पदा सह १३ सदस्य जिंकून आणत श्याम बर्वे यांनी आधीच आपल्या उपसरपंच पदाची वाट मोकळी केलेली होती.
मतमोजणी ला सुरवात होताच शिवाजी चकोले यांना भाजप चे नवनिर्वाचित सदस्यांची ४ मते तर श्याम बर्वे यांना इकुं १३ मते गेलीत ज्यामुळे एकतर्फी विजय कांद्री ग्राम पंचायत च्या उपसरपंच पदावर बर्वे यांनी मिळवीला.काँग्रेस गटा कडून अभिर गुलाल उडवत समर्थकांची तोंड गोड करून आनंदाचा उत्सव काँग्रेस पक्षा कडून साजरा करण्यात आला. बर्वे यांना शुभेच्छा देण्यासाठी काँग्रेस पक्षाचे समस्त पदाधिकाऱ्यांनी कांद्री ची वाट धरली  या वेळी तालुका अध्यक्ष दयाराम भोयर,नरेश बर्वे,राजेश यादव, सरपंच बलवंत पडोले, युवक कांग्रेस चे युवा नेतृत्व सतीश भसारकर,आकिब सिद्दिक्की, धनराज कारेमोरे, बैशाखू जनबंधु, दुर्गा सरोदे, रेखा शिंगने, प्रकाश चाफले, चंद्रशेखर बावनकुलेे, वर्षा खडसे, सिंधु वाघमारे ,राहुल टेकाम, महेश झोड़ावणे, मोनाली वरले, आशा कनोजे यांची उपस्थिती होती.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.