यवतमाळ / प्रतिनिधी :- उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील प्राथ.उच्च माध्यमिक अनुदानित आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थी प्रदीप शेळके (७) रा.पार्डी याचा दिनांक १३ नोव्हेंबर रोजी अज्ञात व्यक्तीने गळा आवळून खून केला व आश्रमशाळा परिसरात असलेल्या शेततळ्यात त्याचा मृतदेह फेकून दिला होता. प्रकरणी बिटगाव पोलीस ठाण्यात अप.क्र. १८४/२०१७ भादंवि ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रदीप चा खून करणा:या विधीसंघर्षग्रस्त बालकाला आज अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. मयत प्रदीप हा विधीसंर्घषग्रस्त बालकास वारंवार मुलींच्या नावाने चिडवत असे याचा राग मनात धरुन त्याने हे कृत्य केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
प्रदीपच्या खूनामुळे ढाणकी शहरात व परिसरात तसेच आश्रम शाळेतील विद्याथ्र्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. सर्वसामान्य जनतेतून व सोशल मिडीयामधून वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या प्रसिध्द होत असल्यामुळे पोलीसांसमोर सदर गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. यवतमाळ जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राज कुमार यांनी सदर गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्यासाठी अपर पोलीस अधिक्षक अमरसिंह जाधव यांचे नेतृत्वाखाली युध्द पातळीवर तपास करण्याचे आदेश दिले होते.
गुन्ह्याच्या तपासात पोलीस पथक गुन्हा घडले पासून आश्रम शाळा परिसरात तळ ठोकून होते. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आज सकाळी शाळेतील एका विद्याथ्र्यास शौचास गेल्यावर एक चिठ्ठी मिळून आली. सदर चिठ्ठी मध्ये चिठ्ठी लिहीणा:याने एका विद्याथ्र्यांचा फोटो चिटकवून हा गुन्हा मी केला आहे असा मजकूर लिहीला होता. त्यावरुन पोलीसांनी तपास केला असात सदर चिठ्ठी लिहीणा:या मुलानेच मयत प्रदीप याचा रविारी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन त्यास शेततळे परीसरात घेवून गेला व त्या ठिकाणी प्रथम त्यांचे डोक्यावर फरशीच्या दगडाने मारुन त्यानंतर स्वत:चे करदोळ्याने त्याचा गळा आवळून खून केला.
सदर खूनाचा आळ हा दुस:यावर यावा या उद्देशाने त्याने चिठ्ठी लिहीली होती. यातच तो फसला. पोलीसांनी त्याला विश्वासात घेवून अधिक चौकशी केली असता त्याने रविारी केलेल्या कृत्याबाबत पोलीसांना सविस्तर सांगितले. मयत प्रदीप हा विधीसंर्घषग्रस्त बालकास वारंवार मुलींच्या नावाने चिडवत असे याचा राग मनात धरुन त्याने हे कृत्य केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
शनिवार, नोव्हेंबर १८, २०१७
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments