Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

हत्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
हत्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, जुलै २१, २०१८

कुऱ्हाडीने वार करून सख्या भावानेच केली भावाची हत्या

कुऱ्हाडीने वार करून सख्या भावानेच केली भावाची हत्या

 ललित लांजेवार:
वारंवार होणाऱ्या भांडणातून चिडलेल्या लहान भावानेच सख्या मोठ्या भावाची कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथील नकोडा येथे शुक्रवारी घडली. 
बिसु शिवानंद शर्मा असे मृत व्यक्तीचे नाव असून आरोपी लहान भाऊ दिपक शिवानंद शर्मा याला घुग्गुस पोलिसांनी अटक केली आहे. मोठा भाऊ हा तापट,उर्मट,व गुंड प्रवृत्तीचा असल्याने मोठा भाऊ बिसु व लहान भाऊ दीपक यांच्यात नेहमी वाद व्हायचे,हा वाद जास्तच विकोपाला जात असे,शुक्रवारी देखील बिसुने दिपकशी भांडण केले व झोपी गेला.अश्यातच राग धरून असलेल्या लहान भाऊ दीपकने त्याला जीवनेशी मारण्याचा मनात कट रचला व बिसू गाढ झोपेत असतांना घरातील कुऱ्हाडीने त्याच्या डोक्यावर व मानेवर सपासप वार केले.
या हल्ल्यात बिसुचा जागीच मृत्यू झाला व दिपकने घरातून पळ काढला.घरचे इतर व्यक्ती कामानिमित्य बाहेर गेले होते ते घरात येताच बिसू रक्ताने माखलेला दिसताच आरडा ओरड करण्यात आली व यांची माहिती घुग्गुस पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सत्यजित आमले हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला. तसेच आरोपीवर गुन्हा दाखल करुन आरोपीच्या शोधात पथक रवाना करण्यात आले.शेवटी रात्री उशिरापरीयंत दिपकला नकोडा परिसरातुन अटक करण्यात आली.सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात PSI राहुल थांगणे,संतोष धांडेवार,गोपाल अतकुलवार,सचिन बोरकर,विनोद वनकर,सुधीर मत्ते करीत आहेत.





बुधवार, जुलै ०४, २०१८

चंद्रपुरात हत्येचा थरार;एकाची धारदार शस्त्राने हत्या

चंद्रपुरात हत्येचा थरार;एकाची धारदार शस्त्राने हत्या

हत्या साठी इमेज परिणाम
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चंद्रपूर-मूल मार्गावरील लोहारा गावाजवळील ढाब्या जवळ एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली आहे.  प्रवीण पेंडाने राहणार नेहरू नगर  असे मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार ५ ते ६ युवक लोहारा गावातील एका धाब्यावर पार्टी करण्याकरिता आले होते.हे सर्व दारूच्या नशेत होते आणि काही क्षुल्लक कारणांवरून त्यांच्यामध्ये जोरदार भांडण झाले.व त्यात एकावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली, वृत्तलिहित परियंत मृतकाचे नाव कळू शकले नसून पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून शव आपल्या ताब्यात घेऊन शव शवविच्छेदन करण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले असून या घटनेचा पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशनचे पो.निरीक्षक दीपक गोतमारे करीत आहेत.


सोमवार, जून ११, २०१८

नागपूर हादरलं! भाजपा कार्यकर्त्यासह कुटुंबातील 5 जणांची निर्घृण हत्या

नागपूर हादरलं! भाजपा कार्यकर्त्यासह कुटुंबातील 5 जणांची निर्घृण हत्या


नागपूर/प्रतिनिधी:
नागपूरकरांची आजची पहाट हादरा उडवणारी ठरली आहे. कारण एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्या आहे. ही थरकाप उडवणारी घटना नागपुरातील दिघोरी येथील आहे.
कमलाकर पोहनकर यांच्यासहीत कुटुंबातील पाच जणांना जीवे ठार मारण्यात आले आहे. मृतांमध्ये लहान मुलगा-मुलगी आणि वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे.
दरम्यान, कमलाकर पोहनकर हे भाजपाचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे. कमलाकर पोहनकर आणि त्यांचे कुटुंबीय झोपेत असताना त्यांची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली. ओळखीच्या व्यक्तीनेच हत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

शनिवार, मे १९, २०१८

तरुणाची दगडाने ठेचून हत्या

तरुणाची दगडाने ठेचून हत्या

ठेचून खून साठी इमेज परिणामनागपूर/प्रातिनिधी:
उमरेड मार्गावरील नरसाळ्याच्या सुदामनगरीत एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. विशाल दिलीप मानकर (वय २१) असे मृताचे नाव आहे. तो तुळजाईनगर, गारगोटी परिसरात राहत होता.
शनिवारी सकाळी विशाल मानकरचा मृतदेह नरसाळा परिसरात रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली. काहींनी सकाळी ७ वाजता ही माहिती हुडकेश्वर पोलिसांना कळवली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठले. विशालच्या मृतदेहाशेजारी दगड आणि दारूची बाटली पडून होती. त्यामुळे आरोपीने दारूच्या नशेत वाद झाल्यानंतर विशालला दगडाने ठेचून मारले असावे, असा पोलिसांनी प्राथमिक अंदाज काढला. विशाल कॅटरर्सचे काम करायचा. फावल्या वेळेत तो जुने फर्निचर विकत घेणे आणि ते चांगले करून विकण्याचे काम करायचा. त्याची हत्या करणारे कोण, ते वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट झाले नव्हते.
   -----------------------------------------------------------------------             
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 

कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

सोमवार, एप्रिल १६, २०१८

मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या

मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या

गोंडपिपरी (चंद्रपूर) :
हत्या साठी इमेज परिणाम
 चार दिवसापुर्वी मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केल्याची घटना चंद्पूर जिल्हातील गोंडपिपरी तालूक्यातील हिवरा गावात समोर आली होती. दुर्घटना असल्याचा बनाव केल्याचे आता समोर आले असून, ही मोठ्या भावानेच लहान भावाला मारल्याचे समोर आले आहे.आनंदराव मशाखेत्री असे मृत्यू झालेल्या लहान भावाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी आरोपी खुशालराव मशाखेत्री (मोठा भाऊ) व त्याची पत्नी अर्चना विरोधात काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. 
याप्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी शेखर देशमुख करित असल्याची माहिती धाबा पोलिस ठाण्याचे ठाणेदार जिवन लाकडे यांनी दिली.आंतरजातीय विवाह केलेल्या नातेवाइकाच्या कार्यक्रमात खुशालराव आपल्या कुटूंबियासह आनंदरावांच्या मुलीला घेऊन गेला होता. ''दुसऱ्या समाजातील तरूणासोबत विवाह करणाऱ्याच्या कार्यक्रमाला माझ्या मुलीला का नेले''? यावरून दोन्ही भावात वाद झाला. दरम्यान, रागच्या खुशालराव याने आनंदरावच्या डोक्यावर उभारीने वार केले.यात तो गंभीर जखमी झाला. चंद्रपूरात उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. या घटनेची चर्चा तालूक्यात जोर धरू लागल्यानंतर आरोपीच्या पत्नीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तसेच आनंदराव मांडवावरून कोसळ्याल्यामुळे त्याचा मृत्यू खुशालराव आणि अर्चना यांनी बनाव केला. यानंतर पोलिस तपासात ही हत्या असल्याचे समोर आले.