Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, नोव्हेंबर १८, २०१७

१८ नोव्हेंबर दिनविशेष

  • व्ही.शांताराम - शांताराम राजाराम वणकुद्रे (१६ मे, इ.स. १९२६ - १८ नोव्हेंबर, इ.स. १९९६) हे चित्रपट अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक, पटकथाकार होते.

    घटना/घडामोडी
  • १२१० : पोप इनोसंट तिसर्‍याने रोमन पवित्र सम्राट ऑट्टो चौथ्याला वाळीत टाकले.
  • १३०२ : पोप बॉनिफेस आठव्याने उनम सँक्टम हा पोपचा फतवा काढला.
  • १४२१ : नेदरलँड्सच्या झुइडर झीमधील समुद्री भिंत कोसळून ७२ गावे उद्ध्वस्त. १०,०००पेक्षा अधिक ठार.
  • १४९३ : क्रिस्टोफर कोलंबसला पहिल्यांदाच पोर्तो रिकोचा किनारा दिसला.
  • १७७२ : थोरले माधवराव पेशवे यांचे निधन. त्यांच्या पत्नी रमाबाई सती गेल्या.
  • १८०३ : हैतीमधील क्रांती-व्हेर्तियेरेसची लढाई.
  • १८०९ : फ्रांसच्या आरमाराने मॉरिशियसजवळ ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या आरमाराचा पराभव केला.
  • १८८३ : अमेरिका आणि कॅनडामधील रेल्वे कंपन्यांनी उत्तर अमेरिकेतील पाच प्रमाणवेळी ठरवल्या. याने तोपर्यंत अंमलात असलेल्या हजारो स्थानिक प्रमाणवेळींमुळे होणारा गोंधळ थांबला.
  • १९०३ : हे-बुनौ-व्हेरियाचा तह - पनामाने अमेरिकेला पनामा कालव्यावरील हक्क दिले.
  • १९०४ : आपण उठाव करीत असल्याचे नाकारून पनामाच्या जनरल एस्तेबान हुएर्तासने सरसेनापतीपदाचा राजीनामा दिला.
  • १९०५ : डेन्मार्कचा राजकुमार कार्ल हाकोन सातवा, नॉर्वे या नावाने नॉर्वेचा राजा झाला.
  • १९१६ : पहिले महायुद्ध - सॉमची पहिली लढाई संपली.
  • १९१८ : लात्व्हियाने स्वतःला रशिया पासून स्वतंत्र घोषित केले.
  • १९४३ : दुसरे महायुद्ध-बर्लिनची लढाई - रॉयल एर फोर्सच्या ४४० लढाऊ विमानांनी बर्लिनवर बॉम्बफेक केली. किंचित नासधूस व १३१ जर्मन ठार. आर.ए.एफ.ची ९ विमाने व ५३ सैनिक मृत्युमुखी पडले.
  • १९४७ : न्यू झीलँडच्या क्राइस्टचर्च शहरातील बॅलेन्टाईन्स डिपार्टमेंट स्टोरला लागलेल्या आगीत ४१ ठार.
  • १९६३ : बटण असलेला पहिला दूरध्वनी संच वापरात आला.
  • १९७८ : जोन्सटाउन दुर्घटना - गयानाच्या जोन्सटाउन शहरात जिम जोन्सने आपल्या पीपल्स टेम्पल या पंथाच्या लोकांना विष पिउन आत्महत्या करण्यास सांगितले. नकार दिलेल्यांना जबरदस्तीने विष पाजण्यात आले. २७० मुलांसह ९१८ व्यक्ती ठार. या आधी जोन्सच्या गुंडांनी अमेरिकेच्या काँग्रेसमन लियो जे. रायनचा खून केला.
  • १९८७ : किंग्स क्रॉस दुर्घटना - लंडनच्या किंग्स क्रॉस या भुयारी रेल्वे स्थानकात लागलेल्या आगीत ३१ ठार.
  • १९९९ : टेक्सास ए अँड एम दुर्घटना - कॉलेज स्टेशन गावातील टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटीत टेक्सास युनिव्हर्सिटी विरुद्धच्या फुटबॉल सामन्यानंतर लावण्यासाठी रचलेली होळी कोसळली. १२ ठार, २७ जखमी.

    जन्म/वाढदिवस
  • १९०१ : शांताराम वणकुद्रे उर्फ व्ही. शांताराम, चित्रपट अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, पटकथाकार
  • मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
  • १७७२ : थोरले माधवराव पेशवे, मराठी राज्याचे पेशवे.
  • १७७२ : रमाबाई पेशवे, थोरले माधवराव पेशवे यांच्या पत्नी.
  • १८२७ : विल्हेल्म हाउफ, जर्मन कवी.
  • १९६२ : नील्स बोर, डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.