Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, नोव्हेंबर ०७, २०१७

धानासह ट्रॅक्टर जळून खाक लाखोचे नुकसान

 ब्रम्हपुरी/प्रतिनिधी :-
 धानाची मळणी सुरु असतांना अचानक ट्रॅक्टरच्या सायलेन्सरमधून आगीच्या ठिणग्या येऊ लागल्या या टिंग्या हलके असल्यामुळे हवेत वर वर जात मळणी सुरू असलेल्या धानावर पडल्या आणि अख्खेच्या अख्खे धान पूजने आगीच्या विळख्यात सापडले.
 हा प्रकार ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगाव(भोसले)येथे घडला आहे. पिंपळगाव (भोसले) येथील शेतकरी संजय भूते यांच्या शेतावरील धानाची मळणीचे काम सुरु असतांना  काही वेळातच धानाची मळणी सुरू असतांना ट्रॅक्टरच्या सायलेंसर मधून आगीची ठिंगणी धानाच्या कुटशिवर पडली आणि काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केल्याने येथील शेक-याचे तीन धानपिकाच्या ढिगाराला आणि ट्रॅक्टरला आग लागल्याने झाल्यामुळे शेतकरी आणि ट्रॅक्टर मालक यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे




यंदाच्या खरीप शेती हंगामात शेक-याला अनेक संकटातून समोरील जावे लागले आहे.विशेष म्हणजे विदर्भातील शेतकरी हा हवालदिल झाला असुन या हगांमात धान पिकांवर तुडतुडा,अडी,अशा अनेक रोगांचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांना रडवत आहे. त्यातच धांनपीकाची कापनी करुन मळणी साठी जमा करुन ठेवलेल्या धानाच्या ढिगाराला आग लागल्याने तोंडात आलेला घास नियतिने हीसकावून घेतला  आणि त्यामुळे सदर शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे.

सदर घटना घडली असताना विझविण्यासाठी मोटोरपंप सुरु करण्याचा प्रयत्न घटनास्थळी उपस्थित शेतमजुर लोंकानी केला होता.माञ लोडशेडिंगमुळे विद्युत प्रवाह बंद करण्यात आला असल्याने विद्युत पुरवठा सुरु करण्यासाठी ब्रम्हपुरी येथील विधुत महावितरण कार्यालयात भ्रमनध्वनी करून विद्युत पुरवठा पुर्ववत सुरु करण्याची विनंती हवालदिल शेक-याकडुन करण्यांत आली. परंतु विद्युत महावितंरण कार्यालयातील मग्रूर अधिकाऱ्यांनी टाळाटाळ करून वेळ मारुन घेत वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या परवांनगी शिवाय विद्युत पुरवठा पुर्ववत सुरु करण्यात येत नाही.असे उडवा - ऊडविचे उत्तर अधीका-याचे मिळाल्याने शेतकरी हवालदिल होऊन धान पिकांचे ढिग जळत असताना आपल्या निरागस उघड्या डोळ्यांनी पाहत होता.पंरतु जर वेळीच विद्युत पुरवठा पुर्ववत सुरू करण्यांत आले.असते तर आगीवर नियंत्रण मिळवता आले असते. आणि होणारी शेक-याची नुकसान टाळता आली असती.
म्हणून या दरम्यान विद्युत पुरवठा सुरु न करणाऱ्या अधिकाऱ्यावर कार्यवाही करून तात्काळ निलंबीत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असुन शासना कळुन झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाईची मागणी सदर पिडीत शेक-यांनी केली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.