Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

ट्रॅक्टर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ट्रॅक्टर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, मे १८, २०१८

मामाच्या घरी आलेल्या भाच्याचा शेतात ट्रॅक्टर खाली येऊन मृत्यू

मामाच्या घरी आलेल्या भाच्याचा शेतात ट्रॅक्टर खाली येऊन मृत्यू

चंद्रपूर/प्रतिनिधी:
उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावी आलेल्या उज्वल निलेश महाकुलकर (१२ वर्षे) रा. निमणी याचा ट्रॅक्टरखाली येऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास कोरपना तालुक्यातील कढोली खु. येथील विलासराव पिंपळशेंडे यांचे शेतात घडली.
कढोली येथील रहिवासी नितेश परागे हे ट्रॅक्टरने शेतात रोटावेटर करत होते,व  उज्वल व मामाचा मुलगा वैभव याला या ट्रॅक्टरवर बसून या रोटावेटरचे काम बघायचे होते.काम सुरु असतांना हे दोघेही ट्रॅक्टरच्या इंजींनवर बसले होते व बसल्यावर थोड्या वेळातच ट्रॅक्टर पलटी झाला. ट्रॅक्टर पलटी होताच  ट्रॅक्टरच्या मागील चाकाला लागून असेलेल्या रोटावेटर मध्ये उज्वल सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर मुलाचा मामा वैभव आस्वले व शंकर कोटनाके हे जखमी झाल्याने त्यांना गडचांदूर सामान्य रुग्णालयात तत्काळ दाखल करण्यात आले. मात्र वैभव यांची प्रकृती गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे भारती करण्यात आले.
उज्वल हा निमणी येथील जिल्हा परिषद शाळेतील पाचवीचा विद्यार्थी होता. या घटनेने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे .पुढील तपास कोरपना पोलीस करीत असून कढोलीच्या पोलीस पाटील यांच्या तक्रारीवरून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आल आहे.
 -----------------------------------------------------------------------         
    जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 

कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

मंगळवार, नोव्हेंबर ०७, २०१७

धानासह ट्रॅक्टर जळून खाक लाखोचे नुकसान

धानासह ट्रॅक्टर जळून खाक लाखोचे नुकसान

 ब्रम्हपुरी/प्रतिनिधी :-
 धानाची मळणी सुरु असतांना अचानक ट्रॅक्टरच्या सायलेन्सरमधून आगीच्या ठिणग्या येऊ लागल्या या टिंग्या हलके असल्यामुळे हवेत वर वर जात मळणी सुरू असलेल्या धानावर पडल्या आणि अख्खेच्या अख्खे धान पूजने आगीच्या विळख्यात सापडले.
 हा प्रकार ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगाव(भोसले)येथे घडला आहे. पिंपळगाव (भोसले) येथील शेतकरी संजय भूते यांच्या शेतावरील धानाची मळणीचे काम सुरु असतांना  काही वेळातच धानाची मळणी सुरू असतांना ट्रॅक्टरच्या सायलेंसर मधून आगीची ठिंगणी धानाच्या कुटशिवर पडली आणि काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केल्याने येथील शेक-याचे तीन धानपिकाच्या ढिगाराला आणि ट्रॅक्टरला आग लागल्याने झाल्यामुळे शेतकरी आणि ट्रॅक्टर मालक यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे




यंदाच्या खरीप शेती हंगामात शेक-याला अनेक संकटातून समोरील जावे लागले आहे.विशेष म्हणजे विदर्भातील शेतकरी हा हवालदिल झाला असुन या हगांमात धान पिकांवर तुडतुडा,अडी,अशा अनेक रोगांचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांना रडवत आहे. त्यातच धांनपीकाची कापनी करुन मळणी साठी जमा करुन ठेवलेल्या धानाच्या ढिगाराला आग लागल्याने तोंडात आलेला घास नियतिने हीसकावून घेतला  आणि त्यामुळे सदर शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे.

सदर घटना घडली असताना विझविण्यासाठी मोटोरपंप सुरु करण्याचा प्रयत्न घटनास्थळी उपस्थित शेतमजुर लोंकानी केला होता.माञ लोडशेडिंगमुळे विद्युत प्रवाह बंद करण्यात आला असल्याने विद्युत पुरवठा सुरु करण्यासाठी ब्रम्हपुरी येथील विधुत महावितरण कार्यालयात भ्रमनध्वनी करून विद्युत पुरवठा पुर्ववत सुरु करण्याची विनंती हवालदिल शेक-याकडुन करण्यांत आली. परंतु विद्युत महावितंरण कार्यालयातील मग्रूर अधिकाऱ्यांनी टाळाटाळ करून वेळ मारुन घेत वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या परवांनगी शिवाय विद्युत पुरवठा पुर्ववत सुरु करण्यात येत नाही.असे उडवा - ऊडविचे उत्तर अधीका-याचे मिळाल्याने शेतकरी हवालदिल होऊन धान पिकांचे ढिग जळत असताना आपल्या निरागस उघड्या डोळ्यांनी पाहत होता.पंरतु जर वेळीच विद्युत पुरवठा पुर्ववत सुरू करण्यांत आले.असते तर आगीवर नियंत्रण मिळवता आले असते. आणि होणारी शेक-याची नुकसान टाळता आली असती.
म्हणून या दरम्यान विद्युत पुरवठा सुरु न करणाऱ्या अधिकाऱ्यावर कार्यवाही करून तात्काळ निलंबीत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असुन शासना कळुन झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाईची मागणी सदर पिडीत शेक-यांनी केली आहे.