Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, नोव्हेंबर १३, २०१७

अंधार पाहीलेला माणुस

चंद्रपूर- केंद्रावर 57 वी महाराष्‍ट्र राज्‍य नाटय स्‍पर्धेत पहिले नाटय पुष्‍प सादर झाले. नाटक “अंधार पा‍हीलेला माणुस” लेखक सतिश पावडे, दिग्‍दर्शक राजीव बावणे होते. गाडगेबाबांच्‍या तरुण पणापासुनचा प्रवास या नाटकाव्‍दारे मांडला गेला. गाडगेबाबांच्‍या आयुष्‍यावर चित्रपट निघाले किंवा पुस्‍तके वाचन्‍यात आली. पण डेबुचा गाडगेबाबा पर्यंतचा प्रवास नाटकातुन मांडला गेला आणि त्‍यांच्‍या आयुष्‍यात घडणा-या प्रसंगातुन कसे गाडगेबाबा झाले हे पहिल्‍या अंकात मांडण्‍यात आले. दुस-या अंकात गाडगेबाबांच्‍या बायकोनी त्‍यांच्‍या प्रत्‍येक गोष्टी स्‍वीकारत त्‍यांना दिलेली साथ व त्‍यांच्‍या सोबत असल्‍याचा समाधान हे एका वाक्‍यातन येतं त्‍या म्‍हणतात कि तुमच्‍याशी लग्‍न करुन तुमच्‍या मुलांची आई झाली. पण तुम्‍ही लोकांचे बाबा झाल्‍यामुळे मी पण आपसुकच सगळया लोकांची आई होवु शकली. त्‍या सोबतच एका प्रसंगात बाबासाहेब आंबेडकर जेव्‍हा गाडगेबाबांना भेटायला येतात. तेव्‍हा बाबासाहेब आपल्‍या अस्‍वस्‍थताचे कारण गाडगेबाबांना सांगतात की मला धर्मांतर करायचा आहे आणि त्‍यासाठी मला बौध्‍द धर्म योग्‍य वाटतो. याबाबतीत तुम्‍हाला काय वाटतं. यावर गाडगेबाबा म्‍हणतात तुम्‍ही योग्‍य विचार करत आहात. असा विषय नाटकातुन मांडण्‍यात आलेला आहे. कबीर आणि तुकाराम यांच्‍या विचारांचा पगडा व अंधश्रध्‍दे विरुध्‍दच बंड या नाटकातुन पाहायला मिळातो. त्‍यांच्‍या आयुष्‍यात आलेले अंधार आणि त्‍या अंधारातुन प्रकाशाकडे चाललेली वाटचाल हा या नाटकाचा गाभा आहे. एक मोठी टिम घेवुन हे नाटक करणं हे कौतुकास्‍पद आहे. कलाकारांनी चांगली कामे केलेली आहे. परंतु काही वेळा संवाद ओव्‍हरलॅप होत होते. लाईट घेतांना काही चुका झाल्‍या. नेपथ्‍य चांगल होतं. दिग्‍दर्शकांनी लोक नाटयाचाही वापर करण्‍याचा प्रयत्‍न केला. एकंदरीत नाटक प्रेक्षकांना गाडगेबाबांचा विषय भावला. राज्‍य नाटय स्‍पर्धेच्‍या निकालात अंधार पाहीलेला माणुस निकालात किती प्रकाश पाडु शकेल. हे निकालाअंतीच कळेल.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.