Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, नोव्हेंबर १४, २०१७

आ.धानोरकरांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे


वरोरा/प्रतिनिधी :
गेल्या सहा दिवसापासून साई वर्धा पॉवर जनरेशन कंपनी विरोधात पूर्व व्रत कामावर घेण्याच्या मागणी साठी ५० कामगार अन्नत्याग आंदोलनाला बसले होते . मात्र सहा दिवस लोटूनही कंपनी व्यवस्थापना पाझर न फुटल्याने आ .बाळू धानोरकर यांनी उपोषण स्थळ भेट कामगारांना उपोषण सोडण्यास सांगितले व कामगारांना न्याय मिळवून देण्याचे आश्वसन दिले त्या नंतर कामगारांनी उपोषण सोडले .

 साई वर्धा पॉवर जनरेशन या विद्युत तयार करणारया कंपनीतील १५० कामगारांना कुठलीही पूर्व सूचना न देता कामगारांना कमी केल्याचा प्रकार ३ महिन्यापूर्वी घडला त्या वरून दीडशे हि कामगारांनी संघटित होऊन कंपनी च्या विरोधात आंदोलन पुकारले ३ महिन्यापासून शासन दरबारी न्यासाठी चकरा मारूनही कुठलाही तोडगा न निघाल्याने ७ नोव्हेंबर पासून कामगारांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले होते एक दिवसीय साखळी उपोषण करून ८ नोव्हेंबर पासून अन्नत्याग आंदोलनाला सुरवात केली होती .मात्र सहा दिवस लोटूनही कंपनी व प्रशासनाला पाझर न फुटल्याने व अर्ध्यापेक्षा जास्त उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावल्याने अखेर आज त्यांनी उपोषण सोडले . यावेळी आ . बाळू धानोरकर यांनी उपोषण स्थळ भेट देऊन आपण लढवय्ये आहोत .उपाशी राहून आंदोलन करायचे नाही मी सदैव तुमच्या पाठीशी आहो असे म्हणत बुधवारला उपविभागीय अधिकारी यांच्या सोबत बैठक लावणार असल्याचे सांगितले ..त्यांनतर कामगारांनाही उपोषण सोडले यावेळी वरोरा येथील तहसीलदार सचिन गोसावी उपस्थित होते .तर प्रहार संघटनेचे संस्थापक आ बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर व उपविभागीय अधिकारी यांचेशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून चर्चा केली असता कंपनी प्रशासन आमचा आदेश पाळत नसल्याचे खळबळ जनक उत्तर त्यांनी दिल्याने हा प्रश्न कामगार मंत्री यांच्याशी बैठक लावून सोडवणार असल्याचे आ कडू यांनी उपोषण कर्त्यांना सांगितले .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.