Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, नोव्हेंबर ०७, २०१७

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्यावतीने राज्यभर जनजागृती रथयात्रा काढणार - ईश्वर बाळबुधे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसापासून सुरु होणार जनजागृती रथयात्रा...

नागपूर/प्रतिनिधी
ओबीसी समाजाला भाजप सरकारनं फक्त आश्वासनांची गाजरंच दाखवली आहेत. भाजप सरकारला त्यांची जागा दाखवण्यासाठी आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्यावतीने राज्यभर जनजागृती रथयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष Ishwar Balbudhe यांनी दिली. आज राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या प्रमुख पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये पार पडली.

ही जनजागृती रथयात्रा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसापासून सुरु करण्यात येणार आहे. या जनजागृती रथयात्रेमध्ये ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. ही रथयात्रा नागपूरहून सुरु करण्यात येणार आहे.

त्यामध्ये ओबीसींची जातनिहाय जनगणना जाहीर करा, राज्यमागासवर्ग आयोगावर ओबीसी समाजाचा अध्यक्ष असावा, ओबीसी विदयार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर वसतीगृह, ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला ४ हजार कोटी भागभांडवल दया, ओबीसी दाखले सुलभरित्या मिळावेत, क्रिमीलेअरची अट रद्द करा, शेतमालाला खर्चावर आधारीत भाव दया, स्वामीनाथन समितीच्या शिफारशी अमलात आणा, मंडल कमिशनची शंभर टक्के अंमलबजावणी करा, विधानपरिषद,विधानसभा,लोकसभेमध्ये ओबीसी आरक्षण दया, शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी, महिलांना सबलीकरण अशा मागण्यांचा समावेश असणार आहे.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष भगवान कोळेकर, दत्तात्रय घाडगे, नानासाहेब राऊत, राज राजापूरकर, सचिन आवटे उपस्थित होते.

#NCP #OBCCell #RathYatra


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.