Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, नोव्हेंबर ०९, २०१७

शेतकरी संघटनेचे रास्ता रोको

कोरपना : विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी शेतकरी संघटनेच्या वतीने  कोरपना येथे माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी कोरपना-आदिलाबाद महामार्गावर ठिय्या मांडल्याने सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली होती.
शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्या सोडविण्याकरिता ८ नोव्हेंबरला रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आंदोलनात सहभाग घेतला होता. भाऊराव पा. चटप आश्रमशाळा येथे सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन कोरपना-आदिलाबाद महामार्गावर ठिय्या दिला. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून वाहतुकीचा मार्ग मोकळा करून दिला व कार्यकर्त्यांचीही काही वेळानंतर सुटका करण्यात आली.

यावेळी आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार वामनराव चटप यांनी केले असून प्रभाकर दिवे, अरुण नवले, निळकंठ कोरांगे ,किसन अवताडे, अनिल ठाकूरवार, रवी गोखरे, रमाकांत मालेकर, मदन सातपुते ,इंदूताई काकडे, प्रवीण गुंडावार अनंता घोडे, अविनाश मुसळे, रत्नाकर चटप पौर्णिमा निरंजने, संध्या सोयाम, बंडू राजूरकर भास्कर मुसळे, सुभाष तुराणकर, पद्माकर मोहितकर, गजानन पगीवार, चंदू उईके, भास्कर मते मारुती काकडे आधी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.