Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

कोरपना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कोरपना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, मे ०८, २०१८

वादळाने केला कहर;८० घरांचे उडाले छप्पर

वादळाने केला कहर;८० घरांचे उडाले छप्पर

चंद्रपूर/प्रतिनिधी:
गेल्या ३ दिवसापासून चंद्रपुर जिल्ह्यातील काही भागात वादळ वाऱ्याने चांगलाच कहर केला आहे.याचाच फटका चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील मांडवा गावाला बसला, सोमवारी संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जवळपास कोरपना तालुक्या तील मांडवा गावातील जवळपास ८० घरांचे  छप्परे उडाल्याने नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आलेल्या या वादळ वाऱ्यामुळे सुदैवाने  कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र या वादळ वाऱ्याने विद्युत पुरवठा बराच वेळ खंडीत झाला होता.
मांडवात आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. विठ्ठल राऊत, शत्रुघ्न सिडाम,गोसाई न्याहारे,  महादू डावरे, श्यामराव मरस्कोल्हे घनश्याम कोराम, बंडू मरसकोल्हे, दिलीप टेकाम, या ८ जणांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  घटनेची माहिती मिळताच कोरपनाचे तहसीलदार हरीश गाडे यांनी घटनास्थळाची पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या मदतीबद्दल सूचना केल्या. 
 यावेळी मंडळ अधिकारी चव्हाण, तलाठी कमलवार, सरपंच, पोलीस पाटील उपस्थित होते. संबंधित नुकसानग्रस्त घरांचा पंचनामा तलाठी यांच्यामार्फत करण्यात आला.

जाहिरातीसाठी राखीव 
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध) 

मंगळवार, जानेवारी १६, २०१८

 शेतकऱ्याची विषप्राशन करून आत्महत्या

शेतकऱ्याची विषप्राशन करून आत्महत्या

कोरपना/प्रतिनिधी:
कोरपना तालुक्यातील रूपापेठ  येथील एका युवा शेतकऱ्यांने आत्महत्या  केल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. अमोल मेश्राम वय (35) असे या मृतक शेतकऱ्यांचे नाव असून शेतातील फवारणीचे विषयी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.
अमोलच्या जाण्याने परिसरात चांगलीच हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत अमोल हा क्रिकेटचा उत्तम फलांदाज होता.त्यामुळे त्याच्या जाण्याने त्याच्या मित्र वर्गात चांगलीच शोककळा पसरली आहे.मृत्युचे कारण अद्यापही कळू शकले नसून पूढील तपास ठानेदार परघने करीत आहेत.



शुक्रवार, नोव्हेंबर १७, २०१७

जनतेच्या समस्या तात्काल निकाली काढा:-आ.संजय धोटे

जनतेच्या समस्या तात्काल निकाली काढा:-आ.संजय धोटे

कोरपना /प्रतिनिधी:
कोरपना तालुक्याची आढावा बैठक नुकतीच राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय धोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

आरोग्य,कृषी,वीज वितरन,पाणीपुरवठा, दक्षता समिती संदर्भात शिधापत्रिका  व कोरपना तालुक़्यातील रस्ते बांधकाम याविषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.  विविध विभागाच्या पदाधिकारी तसेच कर्मचारी यांच्याकडून माहिती तसेच योग्य सूचना देण्यात आल्या आहेत.व प्रलंबित कामे त्वरित करण्याच्या आदेश आमदार संजयभाऊ धोटे यांनी यावेळी दिल्या.

कार्यक्रमाला अध्यक्ष आमदार संजय धोटे होते तर संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संजय मुसळे,पंचायत समिती सभापती श्याम रणदिवे,रमेश पाटिल मालेकार,किशोर  बावणे,अरुण मडावी,विनोद नवले,अबिद अली,भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने तसेच बीडीओ घोंसिकर,तहसीलदार गाडे,साळवे सर, इतर पदाधिकारी तसेच प्रदीप पिंपळशेंडे,कवडू जरीले,कोल्हे,,युवा नेते सचिन गुरनुले,तन्वीर शेख,किशोर देवतळे ग्रा.प.सदस्य पुरुषोत्तम भोंगळें,प्रल्हाद पवार,शशिकांत आडकीने,हेटीच्या सरपंच सौ.बालभारती जरिले,येरगव्हान सरपंच सत्यवान आत्राम,अनिल कौरासे,गजानन भोंगले,सत्यवान चामाटे व कोरपना तालुक़्यातील सरपंच,उपसरपंच,ग्राम पंचायत सद्यस्य व नगरिकांची मोठ्या प्रामानात उपस्थित होती.

गुरुवार, नोव्हेंबर ०९, २०१७

शेतकरी संघटनेचे रास्ता रोको

शेतकरी संघटनेचे रास्ता रोको

कोरपना : विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी शेतकरी संघटनेच्या वतीने  कोरपना येथे माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी कोरपना-आदिलाबाद महामार्गावर ठिय्या मांडल्याने सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली होती.
शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्या सोडविण्याकरिता ८ नोव्हेंबरला रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आंदोलनात सहभाग घेतला होता. भाऊराव पा. चटप आश्रमशाळा येथे सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन कोरपना-आदिलाबाद महामार्गावर ठिय्या दिला. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून वाहतुकीचा मार्ग मोकळा करून दिला व कार्यकर्त्यांचीही काही वेळानंतर सुटका करण्यात आली.

यावेळी आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार वामनराव चटप यांनी केले असून प्रभाकर दिवे, अरुण नवले, निळकंठ कोरांगे ,किसन अवताडे, अनिल ठाकूरवार, रवी गोखरे, रमाकांत मालेकर, मदन सातपुते ,इंदूताई काकडे, प्रवीण गुंडावार अनंता घोडे, अविनाश मुसळे, रत्नाकर चटप पौर्णिमा निरंजने, संध्या सोयाम, बंडू राजूरकर भास्कर मुसळे, सुभाष तुराणकर, पद्माकर मोहितकर, गजानन पगीवार, चंदू उईके, भास्कर मते मारुती काकडे आधी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती