Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, नोव्हेंबर ३०, २०१७

रोग निदान शिबिराचा तेरावा सप्ताह

पारशिवणी ::
 पं. दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स रिसर्ज अँड ह्यूमन रिसोर्सेस नागपूर व दणका युवा संघटन,कांद्री,कन्हान यांच्या सयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या रोग निदान शिबिराचे पदार्पण तेराव्या आठवड्यात पोचले आहे.या शिबिराने तालुक्यासह कन्हान उपशहरा लगत असलेल्या साटक जिल्हा परिषद व टेकाडी जिल्हा परिषद क्षेत्रा लगत तालुक्या बाहेर सुद्धा ग्रामीण व शहरी भागात गर्जुना मोफत रोग निदान तपासनी,मोफत चष्मे वितरण शिबिराच्या या आयोजना ला सातत्याने जोपासण्याची धुरा माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश वाडीभस्मे यांनी आपल्या खांद्यावर घेतलेली होती.आणी यशस्वी रित्या या रोग निदान शिबिराचा लाभ ग्रामस्थांन पर्यंत पोचत असल्याने क्षेत्रात दणका युवा संघटनेच्या शिरावर यशाचा तुरा क्षेत्रातील लोकांनी रोवून दिलेला आहे.

          याच उपक्रमात मंगळवार २८ नोव्हेंबर रोजी निशुल्क रोग निदान शिबिराचा तेरावा सप्ताह शिव नगर कान्द्री- कन्हान येथे आयोजित करण्यात आलेला होता.या शिबिरात विविध प्रकार च्या रोगांची तपासणी करण्यात आली ज्यात ब्लड प्रेशर, शुगर, नेत्र रोग, मोतीया बिंद अश्या इतरत्र रोगांच्या निदानाचा लाभ कांद्री वासीयांनी घेतला,नेत्र रोग्यांना   मोफत चष्मे वितरित करण्यात आले.प्रसंगी शिबिराचे मुख्य आयोजक दणका युवा संघटन,युवा चेतना मंच कान्द्री आणि नेहरू युवा केंद्र पारशिवणी,माजी.जील्हा परिषद सदस्य योगेश वाडीभस्मे,दिनेश नानवटकर, रिंकेश चवरे, सुरेश तिवाडे, शैलेश शेळके, विनोद कोहळे, गौरव माहोर, राहुल चामट, सौरभ पोटभरे, यांची उपस्थित होती तर मंगळवार ५ डिसेंम्बर रोजी सालवा येथे चौदाव्या शिबिराचे लाभ घेण्या करिता जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहण्याचे आयोजकांकडून करण्यात आले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.