चंद्रपूर/प्रतिनिधी: (ललीत लांजेवार)
प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वात वरोरा येथे वर्धा पॉवर कंपनी विरोधात साखळी उपोषणाला बसलेल्या सात कामगारांची प्रकृतीत चिंताजनक असल्याची बाब पुढे आली आहे
तीन महिन्यांपूर्वी दीडशे कामगारांना कुठलीही पूर्व सूचना न देता कामावरून कमी केल्याने कामगारांनी न्यायासाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा केला. मात्र, कुठलाही तोडगा निघाला नसल्याने मंगळवारपासून कामगारांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वात साखळी उपोषणाला सुरूवात केली आहे .
या उपोषणात ऐकून ४७ कामगार उपोषणाला बसले होते.त्यापैकी जवळपास ७ कामगारांची परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कामगार वर्गात अत्यंत रोष निर्माण झालेला आहे.
या सात कामगारांपैकी उपोषणात आणखीही बरेचशे कामगार उपोषणाला बसले असून हा प्रकृती गंभीर असलेल्या उपोषण कर्त्यांचा आकड़ा वाढण्याचे सांगण्यात येत आहे.
कुठलीही पूर्वसूचना न देता वर्धा पॉवर जनरेशन या वरोरा एमआयडीसी मधील कंपनीने १५० स्थानिक कामगारांना कामावरून कमी केले. कामगार आयुक्त यांनी ‘तारीख पे तारीख’ देत समेटाची कारवाई केलीच नाही आणि कंपनी प्रशासनही कामावर घेण्यास नकार देत आहे. त्यामुळे मंगळवारपासून या साखळी उपोषणाला सुरूवात केली होती
तीन दिवस उलटूनही यातून कोणताच मार्ग निघाला नसल्याने हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा विचार उपोषणकर्त्यांनी घेतला त्यात त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याचे सांगण्यात येत आहे.