सोमवारी केंद्र सरकारच्या विरोधात कॉंग्रेसने देशभर एक दिवसाचा उपवास कार्यक्रम ठेवल्यानंतर आता सत्तेत असणारे मोदी सरकार विरोधकांसाठी एकदिवसीय उपवास कार्यक्रम ठेवणार आहे.
संसदेत विरोधक गदारोळ घालून सातत्याने कोंडी करत असल्याचा निषेध करण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे सह भाजपचे सर्व खासदार १२ एप्रिल रोजी काॅंग्रेसच्या राष्ट्रविरोधी भुमिकेचा निषेध नोंदविण्यासाठी उपवास उपोषण करणार आहे. हाच कार्यक्रम चंद्रपूर येथे केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या नेतृत्वात चंद्रपुरात एकदिवसीय ‘‘सामुहिक उपवास’’ उपोषण करणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा अध्यक्ष अमित शाह नवी दिल्लीत एक दिवस उपोषण करणार आहेत.विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाजाचे बहुतांश दिवस वाया गेले. ही बाब देशातील जनतेपुढे नेण्यासाठी तसेच कॉंग्रेस व अन्य विरोधी पक्षांकडून घातल्या जाणाऱ्या गदारोळाचा विरोध करण्यासाठीच हे उपोषण असल्याचे संगीतल्या जात आहे.
12 एप्रिल 2018 रोजी गांधी चौक चंद्रपूर येथे सकाळी 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत हा सामुहिक उपवास कार्यक्रम होत असून या कार्यक्रमास राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा पालकमंत्राी चंद्रपूर जिल्हा
ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार, राज्य वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, चंद्रपूर विधानसभेचे आमदार नानाभाऊ शामकुळे, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, राजुरा विधानसभेचे आमदार अॅड. संजय धोटे, वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आर्णी विधासभा क्षेत्राचे आमदार राजू तोडसाम, भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत, महापौर सौ. अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होत असलेल्या या एकदिवसीय उपवास कार्यक्रमास भाजपाचे जिल्हा
परिषद, पं.स. सभापती, मनपा सभापती, नगरपरिषद सभापती, जि.प. सदस्य, चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील नगराध्यक्ष, नगरसेवक, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व बहुसंख्य नागरिक या उपवास कार्यक्रमात सहभागी होत आहेत. या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.