Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, नोव्हेंबर ०८, २०१७

17 नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी 10 आणि 13 डिसेंबरला मतदान

मुंबई – राज्यातील विविध 17 नगरपरिषदा/ नगरपंचायतींचे सदस्य व अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी; तसेच जेजुरी नगरपरिषदेचे अध्यक्ष व इतर विविध ठिकाणच्या 10 सदस्यांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी दोन टप्प्यांत 10 डिसेंबर व 13 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली. सर्व संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबक नगरपरिषदेचे सदस्य व अध्यक्षपदांसाठी 10 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचा कालावधी 16 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर 2017 पर्यंत असेल. नामनिर्देशनपत्रांची छाननी 23 नोव्हेंबर 2017 रोजी होईल. न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी 28 नोव्हेंबर 2017; तर अपील असलेल्या ठिकाणी अपिलाचा निर्णय आल्यानंतर तिसऱ्या दिवसांपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. 10 डिसेंबर 2017 रोजी मतदान होईल. 11 डिसेंबर 2017 रोजी मतमोजणी होईल, असे सहारिया यांनी सांगितले.
डहाणू, जव्हार, हुपरी, जत, नंदुरबार, नवापूर, तळोदा, किनवट, चिखलदरा, पांढरकवडा व आमगांव या 11 नगरपरिषदांचे सदस्य व अध्यक्षपदांसाठी; तसेच वाडा, फुलंब्री, सिंदखेडा व सालेकसा या चार नगरपंचायतींचे सदस्य आणि अध्यक्षपदांसाठी 13 डिसेंबर 2017 रोजी मतदान होईल. नामनिर्देशनपत्रे 18 ते 24 नोव्हेंबर 2017 या कालावधीत स्वीकारली जातील. 25 नोव्हेंबर 2017 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर तिसऱ्या दिवसांपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. मतदान 13 डिसेंबर 2017 रोजी होईल. मतमोजणी 14 डिसेंबर 2017 रोजी होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.