Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मतदान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मतदान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, मे २१, २०१८

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली विधानपरिषदेसाठी  99.72 टक्के मतदान

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली विधानपरिषदेसाठी 99.72 टक्के मतदान

चंद्रपूर/प्रतिनिधी:

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी २१ मे रोजी मतदान पार पडले.या निवडणुकीत दुपारी 4 वाजेपरियंत 99.72 टक्के मतदान झाले.यात १०५९ मतदारांपैकी १०५६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या मतदार संघात चार उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये रामदास भगवानजी आंबटकर-भाजपा,इंदकुमार सराफ-भाराकॉ,सौरभ राजू तिमांडे-अपक्ष,जगदीश अचलदास टावरी-अपक्ष, यांचा समावेश आहे.आज २१ मे रोजी या मतदारांचे भविष्य मतपेटीत बंद झाले असून मतदान झाले असून २४ मे गुरुवारी मतमोजणी होणार आहे.
सकाळी आठ वाजता मतदानाला सुरवात झाली होती.त्यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात ४५ टक्के मतदान पार पडले.त्या नंतर सायंकाळी 4 परियंत मतदान झाले.तर या 1059 मतदारांपैकी 1056 मतदारांनी मतदान केले असून हिंगणघाट,आर्वी, चामोर्शी या मतदार केंद्रावर प्रत्येकी एक मतदाराने आपला हक्क बजावला नाही. 
या स्थानिक प्राधिकारी मतदार संघासाठी चंद्रपूर येथील ४६९ वर्धा जिल्हयातील ३०८ ,व गडचिरोली जिल्हयातील २८२ असे एकूण 1059 मतदार होते. या मतदानासाठी १७ मतदान केंद्र तयार करण्यात आले होते.१७ पैकी १४ मतदान केंद्रावर 100 टक्के मतदान झाले. वर्धा जिल्हयात तहसिल कार्यालय आर्वी-(९८.७५ टक्के), वर्धा-(१०० हिंगणघाट-(९८.७० टक्के), चंद्रपूर जिल्हयात तहसिल कार्यालय गोंडपिपरी, राजूरा चिमूर, ब्रम्हपूरी, वरोरा, मूल, चंद्रपूर, बल्लारपूर, या सर्व ठिकाणी १०० टक्के व गडचिरोली जिल्हयात तहसिल कार्यालय कुरखेडा-(१०० देसाईगंज-(१०० टक्के), गडचिरोली-(१०० टक्के), चार्मोशी-(९८.०८ टक्के), एटापल्ली-(१०० टक्के) व अहेरी -(१०० टक्के) मतदान झाले. 
या निवडणुकीची मतमोजणी दिनांक २४ मे गुरवार रोजी चंद्रपूर येथे होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी दिली आहे.

-----------------------------------------------------------------------             
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 

कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

शुक्रवार, नोव्हेंबर १०, २०१७

नॅशनल मीडिया अवार्ड’साठी करा अर्ज

नॅशनल मीडिया अवार्ड’साठी करा अर्ज

 १७ नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे निवडणूक आयोगाचे आवाहन

मुंबई, प्रतिनिधी: मतदारांमध्ये उत्कृष्टरित्या जनजागृती मोहीम राबविणाऱ्या प्रसिद्धी माध्यमांनी‘नॅशनल मीडिया अवार्ड’ पुरस्कारासाठी दि. १७ नोव्हेंबर पूर्वी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.

मतदारांमध्ये निवडणूक, मतदार नोंदणी आदी विषयक उत्कृष्टरित्या जनजागृती ‍‍‍‍‍‍‍‌‌‌‌‌मोहीम राबविणाऱ्या प्रिंट मीडीया, दूरचित्रवाणी (टि.व्ही.) माध्यम, रेडियो आणि ऑनलाईन (इंटरनेट) किंवा सोशल मीडिया या चार माध्यमांना भारत निवडणूक आयोगाच्यावतीने‘नॅशनल मीडिया ॲवार्ड’ प्रदान करण्यात येणार आहे. यासाठी प्रस्ताव पाठविण्याची मुदत ३० ऑक्टोबरपर्यंत होती. त्यामध्ये वाढ करण्यात आली असून १७ नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

२५ जानेवारी २०१८ रोजी होणाऱ्या ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. जनजागृती मोहिमेचा दर्जा,व्यापकता, जनतेवर पडलेल्या सकारात्मक प्रभावाचा पुरावा यासह अन्य बाबींचा विचार पुरस्कारांसाठी केला जाईल.

२०१७ या वर्षात केलेल्या जनजागृतीच्या माहितीसह प्रसिद्धी माध्यमांनी आपला प्रस्ताव पवन दिवाण, अवर सचिव (संज्ञापन), भारत निर्वाचन आयोग, निर्वाचन सदन, अशोक रोड, नवी दिल्ली ११०००१, ई-मेल- diwaneci@yahoo.co.in,दूरध्वनी क्र. ०११-२३०५२१५३ या नावाने तयार करावा. हा प्रस्ताव विहीत मुदतीच्या आत मुख्य निवडणूक अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग,मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय,मुंबई-३२ यांच्याकडे सादर करावा.

पुरस्कारासाठी पात्रता, आवश्यक बाबी

मुद्रित माध्यमांसाठी - संबंधित कालखंडात केलेल्या कामांचा सारांश, बातम्यांची तसेच लेखांची संख्या, प्रसिद्ध केलेल्या मजकुराचे एकूण स्वे.सें.मी. क्षेत्रफळ, एक पीडीएफ सॉफ्ट कॉपी किंवा संबंधित वेब पत्त्यावरील वृत्त, वर्तमानपत्र, लेखांची संपूर्ण आकारातील छायाचित्रीत, प्रिंट प्रत, प्रत्यक्ष सहभागासारख्या इतर कोणत्याही कामाचा तपशील,कोणतीही इतर माहिती.

दूरचित्रवाणी (टि.व्ही.) आणि रेडिओ माध्यमांसाठी - संबंधित कालावधीत चालविण्यात येणाऱ्या मोहिमेदरम्यान प्रसारित कार्यक्रमांचा कालावधी, वेळ, प्रत्येक स्पॉटच्या प्रसारणासह एकूण साहित्य (सीडी किंवा डीव्हीडी किंवा पेन ड्राइव्हमध्ये) आवश्यक आहे, एकूण प्रसारण वेळेची बेरीज,मतदाराची जागरुकता यावर बातम्या किंवा कार्यक्रम. तसेच याचसारख्या वृत्तविशेष, कार्यक्रमांच्या प्रसारणाचा दिनांक, वेळ याबाबत वरील माध्यमांमध्ये एकूण साहित्य. प्रत्यक्ष सहभागासारख्या इतर कोणत्याही कामाचा तपशील, कोणतीही इतर माहिती.

ऑनलाईन माध्यमांसाठी - संबंधित कालावधीत केलेल्या पोस्ट, ट्वीट, ब्लॉग, कॅम्पेन, लेख यांचा सारांश. संबंधित लेखाची पीडीएफ कॉपी किंवा वेब ॲड्रेसची लिंक. प्रत्यक्ष सहभाग असल्यास त्याचा पुरावा, मतदारांवर झालेला परिणाम याबाबत आदी माहिती.

नियम व अटी

 हिंदी व इंग्रजी भाषेव्यतिरिक्त असणाऱ्या प्रवेशिकांचे इंग्रजीमध्ये भाषांतर केलेले असणे बंधनकारक आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रवेशिकामधील साहित्यातील पहिल्या १० मिनीट कालावधीतच या परिक्षकांना प्रवेशिकेचे मूल्यमापन करता येईल अशा प्रकारचे असावे. प्रवेशिकेवर नाव,पत्ता, दूरध्वनी, फॅक्स, इ-मेल पत्ता आणि माध्यमाचे नाव असणे आवश्यक आहे, असेही कळविण्यात आले आहे.

गुरुवार, नोव्हेंबर ०९, २०१७

सेना उतरणार गुजरातच्या आखाड्यात

सेना उतरणार गुजरातच्या आखाड्यात


मुंबई /प्रतिनिधी– मोदींना कोणताही अपशकून करायचा नाही असं घोषित करत गुजरात निवडणुकीपासून लांब राहिलेल्या शिवसेनेनं अचानक विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना खासदार अनिल देसाई, राजुल पटेल आणि हेमराज शहा हे आज गुजरातला रवाना होता आहेत. गुजरातमध्ये आज ते संध्याकाळी उशीरा पत्रकार परिषदही घेण्याची शक्यता आहे.
सुरत आणि बडोदा या मराठीबहुल भागात उमेदवार उभे करण्याचे संकेत शिवसेनेनं दिलेत. साधारणपणे 40 जागांवर शिवसेना उमेदवार देईल अशी शक्यता आहे. शिवसेनेच्या या खेळीमुळे हिंदुत्ववादी मतांमध्ये फाटाफूट होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका भाजपला बसू शकतो. तसंच हार्दिक पटेल यांनी काँगेससोबत हातमिळणी करण्याची तयारी दाखवली आहे. मात्र ज्या पाटीदारांना काँग्रेसचा पर्याय मान्य नाही. ते शिवसेनाला जवळ करु शकतात.
यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपसमोर कडवं आव्हान निर्माण झालं आहे. तेही मोदी पंतप्रधान झाल्यानंतर. त्यामुळे भाजपसाठी ही अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून या निवडणूकीकडं पाहिलं जातंय. यंदा पहिल्यांदाच हिंदुत्ववादाच्या ऐवजी जातीपातीच्या पातळीवर ही निवडणूक लढवली जात आहे. त्यामुळे भाजपची आधीच अडचण झाली आहे. त्यात आता शिवसेनेनं भाजपाल डिवचण्यासाठी अचानक निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

बुधवार, नोव्हेंबर ०८, २०१७

17 नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी 10 आणि 13 डिसेंबरला मतदान

17 नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी 10 आणि 13 डिसेंबरला मतदान

मुंबई – राज्यातील विविध 17 नगरपरिषदा/ नगरपंचायतींचे सदस्य व अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी; तसेच जेजुरी नगरपरिषदेचे अध्यक्ष व इतर विविध ठिकाणच्या 10 सदस्यांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी दोन टप्प्यांत 10 डिसेंबर व 13 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली. सर्व संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबक नगरपरिषदेचे सदस्य व अध्यक्षपदांसाठी 10 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचा कालावधी 16 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर 2017 पर्यंत असेल. नामनिर्देशनपत्रांची छाननी 23 नोव्हेंबर 2017 रोजी होईल. न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी 28 नोव्हेंबर 2017; तर अपील असलेल्या ठिकाणी अपिलाचा निर्णय आल्यानंतर तिसऱ्या दिवसांपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. 10 डिसेंबर 2017 रोजी मतदान होईल. 11 डिसेंबर 2017 रोजी मतमोजणी होईल, असे सहारिया यांनी सांगितले.
डहाणू, जव्हार, हुपरी, जत, नंदुरबार, नवापूर, तळोदा, किनवट, चिखलदरा, पांढरकवडा व आमगांव या 11 नगरपरिषदांचे सदस्य व अध्यक्षपदांसाठी; तसेच वाडा, फुलंब्री, सिंदखेडा व सालेकसा या चार नगरपंचायतींचे सदस्य आणि अध्यक्षपदांसाठी 13 डिसेंबर 2017 रोजी मतदान होईल. नामनिर्देशनपत्रे 18 ते 24 नोव्हेंबर 2017 या कालावधीत स्वीकारली जातील. 25 नोव्हेंबर 2017 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर तिसऱ्या दिवसांपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. मतदान 13 डिसेंबर 2017 रोजी होईल. मतमोजणी 14 डिसेंबर 2017 रोजी होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.