संतप्त नागरिकांनी ट्रॅव्हल्स पेटविली
नागभीड : तालुक्यातील पांजरेपार ङ्काट्याजवळ बुधवारी (ता. ३) सायंकाळी साडेसातच्या सुमारास एका दुचाकीला ट्रॅव्हलसने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवर बसलेला एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीररीत्या जखमी आहे. या घटनेनंतर पांजरेपार येथील संतप्त नागरिकांनी ट्रॅव्हल्स पेटविली.
मृतामध्ये संजय कृष्णा उरकुडे (वय ४८) तर जखमीचे सुनील हरिभाऊ उरकुडे (वय ३२) असे नाव आहे. ब्रह्मपुरी मार्गावरील कोरबा गावाजवळ पांजरेपार ङ्काटा आहे. या मार्गाने नागपूरहून वडसाकडे जाणारी ट्रॅव्हल्स येत होती. याच वेळी ब्रह्मपुरीहून पांजरेपारकडे येणाèया दुचाकीला ट्रॅव्हल्सने धडक दिली. यात संजय उरकुडे हा जागीच ठार झाला. तर सुनील उरकुडे जखमी आहे.
या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी ट्रॅव्हल्सला रोखले आणि आग लावली. या घटनेनंतर आजूबाजूच्या गावच्या नागरिकांनी बराचवेळ रस्ता रोखून धरला. नागभिड पोलिसांनी पोलिस कुमक पाठवून रस्ता मोकळा केला.