चंद्रपूर दि.१३(प्रतिनिधी):
चंद्रपूर मनपातर्फे शहरातील विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. पण प्रशासकीय अधिका-यांच्या दप्तर दिरंगाईमुळे ही कामे कासवगतीने सुरू आहेत. त्यामुळे चंद्रपुरकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही कामे तातडीने व्हावीत, या मागणीसाठी आज दिनाक १३ रोजी महानगरपालिकेसमोर तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग समोर शिमगा आदोलन करून शहराच्या समस्यावर वाचा फोडली आहे.
आंदोलनाचे नेतृत्व प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केले. महानगर पालिकेच्या वतीने शहरातील विकासकामांना सुरुवात करण्यात आली आहे. ही कामे करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग, मनपा, म. रा. वीज वितरण कंपनीची आहे. मात्र या चारही विभागातील अधिका-यांच्या दप्तर दिरंगाईमुळे विकास कामांना कासवगती प्राप्त झाली आहे. सदर विभागामध्ये परस्पर समन्वयाचा अभावामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रहारने २०१२ मध्ये आयोजित केलेल्या महाचर्चेत मनपा उपायुक्त रविंद्र देवतळे यांनी तीन महिन्यात रस्त्यांची कामे करण्याचे आश्वासन दिले होती. मात्र अद्यापही रस्त्यांची कामे पूर्णत्वास आली नाहीत. प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात प्रहारतर्फे आज शिमगा आंदोलन करण्यात आले.