तर तालुकास्तरावर 18 मार्च रोजी
चंद्रपूर, दि.26 : माहे मार्च या महिण्याचा पहिला सोमवार हा दिनांक 4 मार्च 2013 रोजी येत असल्यामुळे या दिवशी लोकशाही दिनाचे आयोजन नेहमीप्रमाणे सकाळी 10.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे घेण्यात येणार आहे. त्याप्रमाणे तालुका स्तरावर तिसरा सोमवार 18 मार्च 2013 रोजी येत असल्याने तालुका स्तरावर 18 मार्च रोजी सकाळी 10.00 वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकशाही दिनाकरीता अर्जदाराने विहीत नमुन्यात अर्ज 15 दिवस आधी 2 प्रतीत पाठविणे आवश्यक आहे. तसेच लोकशाही दिनाचे दिवशी अर्जदाराने मुळ अर्जासह सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत उपस्थित राहावे. तालुका लोकशाही दिनात विहीत नमुन्यात अर्ज सादर केल्यानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी/महानगरपालीका लोकशाही दिनात अर्ज सादर करता येईल. तरी नागरिकांनी याबद्दलची नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.