चंद्रपूर. दि.26- जिल्हयातील सर्व अनुसूचित जातीच्या नागरिकांकडे विद्युत कनेक्शन नाही अशा नागरीकाना विद्युत कनेक्शन देण्याकरीता महावितरण, चंद्रपूर विभागातर्फे विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. सदर विद्युत कनेक्शन जोडणे करीता अनुसुचित जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ज्या नागरीकांना विद्युत कनेक्शन घ्यावयाचे आहे त्यांनी जवळच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधुन अ-फॉर्म प्राप्त करावा. त्यासोबत जोडण्यात येणा-या कागदपत्राची यादी त्या फॉममध्येच देण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेवू इच्छिना-या लाभार्थ्यांना सगळे साहित्य, पोल, रोहीत्र हे महावितरण कंपनी मार्फत देण्यात येइल. याकरीता फक्त सुरक्षा ठेव भरावी लागेल तरी जिल्हयातील सर्व अनुसुचित जातीच्या नागरीकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरण विभागाच्या कार्यकारी अभियता अर्चना घोडेस्वार यांनी केले आहे.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
मंगळवार, फेब्रुवारी २६, २०१३
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments