Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
गुरुवार, ऑक्टोबर ०५, २०२३
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा #Goverment #School
रविवार, ऑक्टोबर ०१, २०२३
हरीषभाऊ बन्सोड यांनी घेतली कोल्हे कुटुंबीयांची भेट. आर्थिक मदत करून दिली मानवतेचा संदेश.
मंगळवार, सप्टेंबर १९, २०२३
आमदार किशोर जोरगेवारांच्या घरी बाप्पांचे आगमन
शुक्रवार, सप्टेंबर १५, २०२३
सावरटोला येथे मारबत मिरवणूक प्रचंड उत्साहात. ढेकुण, मोंग्सा, खासी, खोकला, डेंगू, चिकनगुनिया, रोग-राई, ईडापीडा घेऊन जा---- गे----- मारबत!_
संजीव बडोले
नवेगावबांध दि१५ सप्टेंबर:
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सावरटोला या गावात बैलपोळ्याच्या दुसऱ्या व तान्हा पोळ्याच्या दिवशी मारबतीची मिरवणूक काढण्याची जुनी परंपरा आहे. आज पहाटेला मारबतीची मिरवणूक गावातून मुख्य मार्गावरून काढण्यात आली.
यामध्ये आबाल-वृद्धासह सर्व गावकरी मोठ्या आनंदाने उत्साहाने सहभागी झाले होते.
आजच्या दिवशी ओळख असलेल्या औषधी जंगली वनस्पतीचे पूजन करून,आवश्यक तेवढा साठा वैद्यराज जंगलातून घेऊन येतात. वनस्पती जतन करून ठेवली जाते.
या निमित्ताने समाजातील वाईट चालीरीती आणि रोगराई दूर करण्याचे साकडे मारबतीला घालण्यात येते. या उत्सवात राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय मुद्यांसह स्थानिक समस्यांवरही भाष्य करणारे फलक आणि सूचक ओळींनी जनतेच्या मनातला प्रशासनाच्या विरोधात राग आणि संताप व्यक्त होतो.
. समाजातील अनिष्ट प्रथा नष्ट करण्याच्या उद्देशाने बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत मिरवणूक काढण्यात येते.मारबत म्हणजे वाईट परंपरा, अंधश्रद्धा जाळणे. चांगल्या परंपरा आणि विचारांचे स्वागत करणे.हा यामागचा एक उद्देश आहे.तान्ह्या पोळ्याच्या दिवशी लहान मुले गल्लीबोळांतून “घेऊन जा रे मारबत ,घेऊन जा रे मारबत” असे ओरडत फिरत असतात. काठ्या, बांबू, तरट ह्यापासून मोठे पुतळे बनवले जातात, त्यावर फाटके कपडे, चिंध्या गुंडाळतात व विविध रंगांनी रंगवतात. मारबतबरोबर जो बडग्या असतो त्याच्या गळ्यात मोडके झाडू, फाटके कपडे, फुटके डबे, टायरचे तुकडे ह्यांच्या माळा घालतात.या निमित्ताने समाजातील वाईट चालीरीती आणि रोगराई दूर करण्याचे साकडे मारबतीला घालण्यात येते.
मराठी शब्दकोशात मारबत-द—स्त्री. १ (व. ना) धिंड; मिरवणूक. २ पोळ्याच्या दुसऱ्या दिवशीं गांवांतील इडापिडा, रोगराई बाहेर नेऊन घालविण्या- साठीं सोंगें वगैरे काढून मिरवणूक काढतात ती; बरसातींत रोगराई उत्पन्न करणारी मारबत नांवाची देवता; हिच्या प्रीत्यर्थ वरील मिरवणूक काढतात .त्यावेळीं गांवाबाहेर जाळण्यांत येणारी बांबू व कागद यांची केलेली आक्राळविक्राळ, प्रचंड स्त्रीरूपी प्रतिमा. ॰खेदणें-(ना.) (एखाद्यास) हांकून लावणें; (एखाद्याची) हुर्यो उडविणें.
अशी व्याख्या व अर्थ दिला आहे.
काही का असेना,पण जीवनातील दुःख हारून,सुखाची आशा बाळगणे जगण्याला नवे बळ व ऊर्जा याची आशा करणे या मानवी स्वभावाची प्रचिती येते.
बुधवार, सप्टेंबर १३, २०२३
वन नेशन वन इलेक्शन : चर्चेतून झाले श्रोत्यांच्या शंकांचे निरसन
सोमवार, सप्टेंबर ११, २०२३
गणेश विसर्जननिमित्त मुस्लिम समाजाने घेतला 'असा' निर्णय | Muslim Eid-e-Milad Ganesh Utsav 2023
आठवड्यातील टॉप बातम्या
रविवार, सप्टेंबर १०, २०२३
इमारतीची लिफ्ट कोसळली; सहा कामगार ठार | Breaking News
40 मजली इमारतीची लिफ्ट
कोसळली; सहा कामगार ठार
महाराष्ट्र: ठाणे में बड़ा हादसा, 40 मंजिला इमारत की लिफ्ट गिरी; 6 लोगों की मौत
#maharashtra #majoraccidentinthane #peoplediedthane #mumbaiaccident #thanenews #maharashtrapoice #crimenews
ठाणे, 10 सप्टेंबर 2023: (#Maharashtra #Thane) ठाण्यातील बाळकुम परिसरात 40 मजली इमारतीची लिफ्ट कोसळून सहा कामगार ठार झाले आहेत. या दुर्घटनेत आणखी काही कामगार जखमी झाले आहेत. इमारतीच्या छतावर वॉटरप्रूफिंगचे काम सुरू होते. हे काम संपवून कामगार खाली येत असताना हा अपघात घडला. लिफ्ट थेट इमारतीच्या तळाशी कोसळली.
या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, पोलीस, स्थानिक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटनास्थळी ०७ - कामगारांना अपघात ग्रस्त लिफ्ट मधून बाहेर काढण्यात आले असून त्यातील ०६ - कामगार मृत व ०१- कामगार जखमी अवस्थेत होता. जखमीला उपचाराकारिता निपुण रुग्णालय, ठाणे याठिकाणी पाठविण्यात आले आहे व मृतांना जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे येथे पुढील कार्यवाही करिता पाठविण्यात आले आहे.
मृत कामगारांची नावे
जखमींची नावे खालीलप्रमाणे :-*
श्री. सुनिल कुमार दास (पु / वय २१ वर्षे )
*मृतांची नावे खालील प्रमाणे :-*
*१)* महेंद्र चौपाल (पु / वय ३२ वर्षे )
*२)* रुपेश कुमार दास (पु / वय २१ वर्षे )
*३* हारून शेख (पु / ४७ वर्षे )
*४* मिथलेश (पु / ३५ वर्षे )
*५)* कारिदास (पु / ३८ वर्षे )
*६)* अज्ञात (पु)
या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
आज दिनांक १०/०९/२०२३ रोजी १७:३५ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार (घटनेची माहिती देणारे:- बाळकुम अग्निशमन केंद्र) रुणवाल कॉम्प्लेक्स, बाळकूम, ठाणे (प.) याठिकाणी आयरीन बिल्डिंगच्या (तळ + ४० मजली बांधकाम सुरु असलेली इमारत + भूमिगत ०३ मजली पार्किंग) चाळीसव्या मजल्यावर लिफ्टचा रोप तुटल्याने अपघात होऊन सदर लिफ्ट भूमिगत पार्किंगच्या बेसमेन्ट मध्ये कोसळली असून ०७ कामगार अडकले होते. *सदर घटनास्थळी मा. उपायुक्त सो., मा. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान ०१ - इमर्जन्सी टेंडर व ०७ - रुग्णावाहिकांसह उपस्थित होते.
G20 summit 2023 | पुढल्या जी 20 अध्यक्ष पदाची धुरा या देशाकडे!
पुढल्या जी 20 अध्यक्ष पदाची धुरा या देशाकडे!
G20 summit 2023 | जी २० शिखर परिषदेची आज नवी दिल्लीत यशस्वी सांगता झाली जी 20 अध्यक्ष पद भारताने ब्राझील कडे सुपूर्द केलं. सांगता समारंभात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष पदाचा प्रतीक असलेला हातोडा ब्राझीलचे राष्ट्रपती लुईस इन लुलाड डिझेल यांच्याकडे औपचारिकपणे सोपवला ब्राझीलचा अध्यक्ष पदाच्या काळात जी 20 ची सामायिक उद्दिष्ट साध्य होतील असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. भारताकडे नोव्हेंबर पर्यंत जी 20 अध्यक्ष तेची जबाबदारी आहे त्यामुळे अजून अडीच महिने शिल्लक आहेत दरम्यान दिल्लीत दोन दिवसांमध्ये सर्वांनी आपली मतं मांडली सूचना केल्या बरेच प्रस्ताव मांडले आहेत ज्या सूचना आल्या आहेत त्या पुन्हा एकदा तपासून त्यांच्या प्रगती बाबत गती कशी आणता येईल यासाठी प्रयत्न करणे ही आता आमची जबाबदारी आहे असं सांगत या शिखर परिषदेत निर्णय झालेल्या मुद्द्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी येत्या नोव्हेंबर अखेरीला आभासी 17 आयोजित करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला सध्याच्या जगात संपत्तीचे केंद्रीकरण झाले तर लाखो माणसं अजूनही भुकेच्या समस्येने त्रस्त आहेत असा ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी हातोडा स्वीकारल्यानंतर बोलताना सांगितलं दरम्यान आज दुपारी पंतप्रधान मोदी यांची फ्रान्सचे राष्ट्रपती इ-मेन्युअल मॅक्रोन यांच्यासोबत द्वीपक्षीय बैठक झाली यावेळी उभे नेत्यांनी भारत फ्रान्स यांच्यातील मजबूत नागरिक सहकार्याची कबुली देत आण्विक संबंध जयतापुर आणि प्रकल्पाची चांगली प्रगती यावर चर्चा केली सी आय आय चे अध्यक्ष आर दिनेश यांनी जी 20 शिखर परिषदेच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अभिनंदन केलं भारताच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात जागतिक अर्थव्यवस्थेची दिशा ग्लोबल साउथ ची गरज असलेल्या सर्व समावेशक आणि शाश्वत विकासाकडे वळवण्याचं महत्त्वपूर्ण काम झालंय असं त्यांनी सांगितलं
पर्यावरण स्नेही गणेशोत्सव असा होणार
Environment friendly Ganeshotsav । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला पर्यावरण स्नेही गणेशोत्सव साजरा करायच्या केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पर्यावरण विघ्नहर्ता 2023 या राज्यस्तरीय पर्यावरण स्नेही श्री गणेश मूर्ती आणि सजावट स्पर्धेच्या प्रकाशन मंत्रालयात झालं या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन पर्यावरण रक्षणाच्या कार्यात करात्मक सहभाग नोंदवावा असा आवाहन फडणवीस यांनी यावेळी गणेश भक्तांना केला.
यांनी केले दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्याचा अनावरण
the statue । जळगाव शहरातील पिंपराळा परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला असून, महापालिकेच्या आवारात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा साकारण्यात आला आहे या दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्याचा अनावरण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आलं.
शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते पदाचा दिला राजीनामा
Resignation। माजी समाज कल्याण मंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप यांनी आपल्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे घोलप हे नाशिक रोड देवळाली मतदारसंघाचे 25 वर्ष आमदार होते.
या जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी उद्योगस्नेही धोरण
Industry friendly policy । भंडारा जिल्ह्यामध्ये स्थानिक उद्योग वाढीसाठी शासनाचे उद्योगस्नेही धोरण असून या उद्योगांमधूनच रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे हे लक्षात घेता सध्या जिल्ह्यात असलेल्या औद्योगिक विकास क्षेत्राचे अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र निर्मितीसाठी शासन लवकरात सकारात्मक निर्णय घेईल त्यासाठी एमआयडीसी ना पाठवलेल्या प्रस्तावांची उच्चस्तरीय समितीद्वारे पाहणी करून जलद निर्णय घेण्यात येईल अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील उद्योग आणि रोजगार क्षेत्राचा आढावा त्यांनी घेतला तसेच औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींची संवाद साधला.
या जिल्ह्यात येणार पाऊस
rain weather forecast । पुढच्या काही तसाच नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शहरात काल रात्रीपासून सुरू आहे सततच्या पावसामुळे आज पहाटे साडेतीनशे सुमारास खामगाव शहरात जलंब नाका परिसरात एका घराचे नुकसान झालं. येत्या काही तासात नागपूर वर्धा यवतमाळ भंडारा चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शहरात काल रात्रीपासून पावसाची सतत धार सुरू असून अनेक दिवसांपासून गायब असलेला पाऊस सुरू झाल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येतोय सततच्या पावसामुळे आज पहाटे साडेतीनच्या सुमाराला खामगाव शहरात जलंब नाका परिसरात एका घराची भिंत कोसळून त्याच्यात असा उद्वस्त झालं मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
Aditya-L1 ने केला हा टप्पा पूर्ण
Aditya-L1 Launch: देशाची पहिली सौर मोहीम आदित्य एल वन आज पहाटे नियंत्रित हालचालींचा तिसरा टप्पा पूर्ण केला बंगळूरूच्या केंद्रावरून पाठवण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन यानाने केलं. बंगळूर बरोबरच पोट ब्लेअर आणि मॉरिशस मधल्या निरीक्षण केंद्रांमधून या हालचालि आल्यात या पुढचा टप्पा येत्या 15 सप्टेंबरच्या पहाटे दोन वाजता नियोजित आहे अशी माहिती दिली पृथ्वीभोवतालच्या 16 दिवसांच्या प्रवासात हे यात पाच टप्पे पूर्ण करेल.
या रुग्णांना 112 कोटी 12 लाख रुपयांची आर्थिक मदत
Chief Minister's Relief Fund । मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षा मार्फत गोर गरीब आणि गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी अर्थसहाय्य केले जात आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत्या कक्षाने अवघ्या 14 महिन्यात 13000 पेक्षा अधिक गोरगरीब आणि गरजू रुग्णांना एकूण 112 कोटी 12 लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अनेक विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश दिवटे यांनी दिली.
ही समिती करणार भूगर्भातील बदलांचा अभ्यास
Committee for Establishment of Landslide Monitoring and Study Institute । पहिल्या राज्यस्तरीय भूस्खलन देखरेख आणि अभ्यास संस्थेच्या स्थापनेसाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. राज्यात पावसाळ्यात भूस्खलनाच्या घटना दरवर्षी घडत असून माळीण आणि तळी नंतर यावर्षी पावसाळ्यात खालापूर इथल्या इरसाळवाडी येथे भूस्खलन होऊन अनेक बळी गेले पश्चिम घाट आणि सह्याद्री प्रदेशासह शहरी आणि ग्रामीण डोंगराळ प्रदेशातील भूस्खलनाचा अभ्यास आणि निरीक्षण करण्यासाठी भूगर्भात होत असलेल्या बदलांचा अभ्यास करण्याची गरज आहे त्यासाठी भूस्खलन देखरेख आणि अभ्यास करणारी राज्याची स्वतंत्र संस्था असावी अशी मागणी विविध विषयांवर संशोधन आणि अभ्यास करणाऱ्या ब्रह्मा संशोधन प्रतिष्ठान या संस्थेचे संचालक आणि निवृत्त आयएएस अधिकारी डॉक्टर विजय पागे यांनी केली होती.
नुकसान भरपाई रक्कम दोन कोटी 96 लाख
National Lok Adalati । चंद्रपूरच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा समृद्धी भीष्म यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्हा न्यायालय आणि सर्व तालुक्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालती चे आयोजन करण्यात आलं होतं चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक अदालतींमध्ये 2336 प्रकरण यशस्वीपणे निकाली काढण्यात आली. या प्रलंबित प्रकरणांमध्ये मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरण 20 प्रकरण निकाली काढण्यात आली असून नुकसान भरपाई रक्कम दोन कोटी 96 लाख 82 हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत.
येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या
Kopardi gangrape and murder । अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे यांनी आज पहाटे येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली गेल्या पाच वर्षांपासून तो येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत होता कोपर्डीतील शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी त्याच्यासह तीन आरोपींना न्यायालयांना वर्ष 2017 मध्ये दोषी ठरवलं होतं.
मोडेलर ऑपरेशन थिएटर्स उद्घाटन
Government Medical College and Hospital । यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रुग्णांसाठी चांगल्या सुविधा निर्माण करा त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असा प्रतिपादन राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री तसेच यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चार मोडेलर ऑपरेशन थिएटर्स उद्घाटन राठोड यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते या अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटरमध्ये संपूर्ण डिजिटल यंत्र बसविण्यात आली असून शल्य क्रिया दरम्यान संसर्गाचा धोका टाळणं शक्य होणार असून डॉक्टरांना देखील योग्य वातावरणात शस्त्रक्रिया करता येणार आहेत या चार मॉडेलर ऑपरेशन थिएटर साठी संजय राठोड यांनी 15 कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजनातून उपलब्ध करून दिला आहे.
पावसाच्या स्थितीवरच सामन्याचं भविष्य
asia cup tournament 2023 । सध्या श्रीलंकेतील कोलंबो इथे सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेवर आजही पावसाचा चावट आहे भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये आज दुपारी हा सामना सुरू झाला पाकिस्तान संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला भारताच्या सलामी वीरांनी मजबूत सुरुवात करीत 24 षटकात दोन गडी बाद 147 धावा केल्यात सलामी वीर शुभमंगल यांनी 58 धावा तर कर्णधार रोहित शर्मा याने 56 धावा काढल्या शुभम किल्ला शहंशाह आफ्रिदीनेच रोहित शर्माला शादाब ने बाद केलं 24 व्या शतकानंतर के एल राहुल 17 धावांवर तर विराट कोहली आठ धावांवर खेळत होते सध्या सामन्यात पाऊस सुरू झाल्याने खेळ थांबला असून पावसाच्या स्थितीवरच सामन्याचं भविष्य अवलंबून आहे
या जिल्ह्यात येणार पाऊस | Nagpur, Chandrapur, Gondia, Bhandara, Gadchiroli
या जिल्ह्यात येणार पाऊस
rain weather forecast । पुढच्या काही तसाच नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शहरात काल रात्रीपासून सुरू आहे सततच्या पावसामुळे आज पहाटे साडेतीनशे सुमारास खामगाव शहरात जलंब नाका परिसरात एका घराचे नुकसान झालं. येत्या काही तासात नागपूर वर्धा यवतमाळ भंडारा चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शहरात काल रात्रीपासून पावसाची सतत धार सुरू असून अनेक दिवसांपासून गायब असलेला पाऊस सुरू झाल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येतोय सततच्या पावसामुळे आज पहाटे साडेतीनच्या सुमाराला खामगाव शहरात जलंब नाका परिसरात एका घराची भिंत कोसळून त्याच्यात असा उद्वस्त झालं मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
नागपूर, 10 सप्टेंबर 2023: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत (10 आणि 11 सप्टेंबर) पूर्वविदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नागपुर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली (Nagpur, Chandrapur, Gondia, Bhandara, Gadchiroli) या पाच जिल्ह्यांत पुढील पाच दिवस (6 ते 10 सप्टेंबर) आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
11 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. 7 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. 10 आणि 11 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
गडचिरोली जिल्ह्यात पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ ते पूर्णता ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 11 ते 12 सप्टेंबर रोजी सर्वत्र ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. 9 आणि 10 सप्टेंबर रोजी बहुदा सर्वत्र ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान विभागाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदी, नाले, धरणांच्या काठावरून सुरक्षित अंतर ठेवावे. तसेच, घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडावे.
अतिवृष्टीमुळे होणारे संभाव्य नुकसान
- पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता
- रस्ते, पुल, इमारतींचे नुकसान
- शेतीचे नुकसान
- जीवितहानी
अतिवृष्टीपासून बचाव
- नदी, नाले, धरणांच्या काठावरून सुरक्षित अंतर ठेवा
- घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडा
- मुसळधार पावसाच्या वेळी घरातच रहा
- आवश्यक असल्यास, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या
- पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती त्वरित द्या
- Heavy rain
- Eastern Vidarbha
- Nagpur, Chandrapur, Gondia, Bhandara, Gadchiroli
- Cloudy sky
- Light to moderate rain
- Thunderstorm with lightning
- Possibility of flooding
- Safety measures to be taken during heavy rain