Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

gadchiroli लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
gadchiroli लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, जुलै ११, २०२२

 मुख्यमंत्री तातडीने गडचिरोलीत |  दुपारी चार वाजता अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार

मुख्यमंत्री तातडीने गडचिरोलीत | दुपारी चार वाजता अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार

 मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे तातडीने गडचिरोलीत 


मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे यांचे दुपारी ३.१५ वाजता नागपूर शहरात आगमन होत आहे. पूरग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी ते हेलिकॉप्टरने गडचिरोलीला जाणार आहेत. ते आधीच्या सरकारमध्ये पालकमंत्री होते.  त्यामुळे कदाचित गडचिरोलीला भेट देत आहेत. यावेळी उप-मुख्यमंत्री श्री @dev_fadnavis  जी हे सुद्धा या दौऱ्यात गडचिरोली ला भेट देणार आहेत. गडचिरोली विभागासह विदर्भात उत्पन्न झालेल्या पूर परिस्थितीबाबत राज्याचे मुख्यमंत्री श्री  @mieknathshinde  जी यांच्याशी खासदार अशोक नेते यांनी फोन वर चर्चा केली. आजच पूर परिस्थितीची पाहणी ते स्वतः गडचिरोलीला भेट देऊन करतील व राज्य शासनाच्या वतीने सर्व प्रकारची सहायता प्रदान करतील असे आश्वासन त्यांनी दिले. दुपारी चार वाजता एकनाथ शिंदे हे  अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 6.30 वाजता पूर परिस्थितीबाबत गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन सोबत आढावा बैठक घेणार आहेत. 

राज्यातील मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापुरात या भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच गडचिरोलीमध्ये देखील पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. तिथे अनेक नद्यांना पूर आला आहे. तसेच नागपूर, चंद्रपूर, वाशिम, वर्धा जिल्ह्यातही मोठा पाऊस कोसळताना दिसत आहे.



#rain #nature #rainyday #photography #love #naturephotography #clouds #photooftheday #weather #sky #instagood #instagram #water #travel #storm #photo #art #raindrops #rainbow #beautiful #rainy #india #raining #picoftheday #landscape #summer #sunset #ig #flowers #monsoon






#gadchiroli - 20%

#nagpur - 14%

#chandrapur - 12%

#marathi - 8%

#pune - 8%

#gadchiroli #nagpur #chandrapur #marathi #pune #mumbai #wardha #vidarbha #maharashtra #ig #marathijokes #bhandara #gondia #akola #amravati #marathimeme #marathimulgi #zeemarathi #mimarathi #buldhana #india #marathistatus #instamarathi #marathisamrajya #marathimulga #aurangabad #yavatmal #memes #washim #marathipremgeet

Eknath Shinde


शनिवार, जानेवारी १६, २०२१

#GADCHIROLI : परिचारिका सारिका दुधे यांना लस

#GADCHIROLI : परिचारिका सारिका दुधे यांना लस

गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झालेली असून यावेळी पहिल्यांदा गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिका सारिका दुधे यांना लस देण्यात आली.आज लसीकरणाच्या शुभारंभप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, प्रभारी जिल्हाधिकारी अनंत वालस्कर उपस्थित होते.


#गडचिरोली जिल्ह्यात आज चार केंद्रांवर #कोरोना_प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, आरमोरी व अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालय आणि चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले.


#गडचिरोली गडचिरोली मध्ये पहिल्या कोरोना योध्दयाने लस घेतल्यावर इतरांना केलेले आवाहन...#CovishieldVaccine #LargestVaccineDrive @MahaDGIPR #Gadchiroli pic.twitter.com/OLt7IeJqU6— DISTRICT INFORMATION OFFICE, GADCHIROLI (@InfoGadchiroli) January 16, 2021


महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या #गडचिरोली जिल्ह्यात कोरोना लसीच्या १२ हजार मात्रा आज पोहचल्या. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत शंभरकर यांनी लस घेऊन आलेल्या कर्मचाऱ्यांचे स्वागत केले.

गुरुवार, सप्टेंबर २४, २०२०

शॉर्टसर्किटमुळे दुकान जळून खाक

शॉर्टसर्किटमुळे दुकान जळून खाक

टेकडा, ता. २४ : सिरोंचा तालुक्यातील टेकडा (ताला) येथे लागलेल्या आगीत एका व्यक्तीचे किराणा दुकान जळून खाक झाले. राजना तोगरी याने जाफ्राबाद आठवडी बाजारजवळ किराणा दुकान थाटले होते. शॉर्टसर्किटने या दुकानास बुधवारच्या मध्यरात्री आग लागल्याने संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे. यात हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

शुक्रवार, ऑगस्ट २८, २०२०

कोसफुंडी गाव संघटनेने साखरेचा सडवा केला नष्ट

कोसफुंडी गाव संघटनेने साखरेचा सडवा केला नष्ट

साखरेचा सडवा नष्ट करताना गाव संघटना
भामरागड, २८ : तालुक्यातील कोसफुंडी गावापासून ४ किमी अंतरावर असलेल्या शेतशिवारात दारूविक्री होत असल्याची माहिती मिळताच गाव संघटनेने धाड टाकून जवळपास तीन मडक्यांत असलेला साखरेचा सडवा नष्ट केला. तसेच दारूविक्रेत्याला पुन्हा दारूविक्री न करण्याची तंबी व समज देण्यात आली.
कोसफुंडी हे गाव दारूमुक्त आहे. मात्र गावापासून दूर वास्त्यव्यास असलेल्या एका इसमाने छुप्या मार्गाने शेतशिवारात दारूभट्टी सुरु केली होती . सदर रस्त्यावरील दारूभट्टीवर ये-जा करणा-यांना दारू पिण्याची सोय होत होती. याबाबतची माहिती गाव संघटनेला मिळताच सदर दारूभट्टीवर धाड टाकून तीन मडक्यांत असलेला साखरेचा सडवा व दारू नष्ट करण्यात आली. यापुढे पुन्हा दारू विक्री न करण्याची समज देखील दारूविक्रेत्यास देण्यात आली. यावेळी मुक्तीपथ तालुका चमू उपस्थित होते.
गाव तंबाखूमुक्त करण्यासाठी गावक-यांचा पुढाकार

गाव तंबाखूमुक्त करण्यासाठी गावक-यांचा पुढाकार

चंदनवेली, येनगाव येथे तंबाखूबंदीचा घेतला ठराव
गडचिरोली, ता. २८ : एटापल्ली तालुक्यातील चंदनवेली तर धानोरा तालुक्यातील येनगाव येथील गाव संघटनेतर्फे तंबाखू विक्री बंदीचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही गावांमध्ये पार पडलेल्या बैठकींत 'कोरोनामुक्तीसाठी तंबाखूविक्री बंदीअसा गावाने ठराव घेतला असून तंबाखूमुक्त गाव करण्याचा निश्चय केला आहे. थुंकीमार्फत कोरोना विषाणूचा गावात शिरकाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनामुक्त गाव ठेवण्यासाठी दोन्ही गावांतील नागरिकांनी पुढाकार घेतला आहे.
कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतले आहे. या विषाणूचे वाढते संक्रमण टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. थुंकीमार्फत कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी वर्षभरासाठी पानठेले व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. या आदेशाची अंमलबजावणी होण्यासाठी चंदनवेली,येनगाव येथे गाव संघटनेतर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी कोरोना विषाणूचा शिरकाव ग्रामीण भागात सुद्धा झाला असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळले पाहिजे. थुंकीमार्फत कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्यामुळे गावामध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी आणणे आवश्यक आहे. यासंदर्भात दोन्ही गावातील बैठकींमध्ये चर्चा करण्यात आली.
'साथरोग नियंत्रण कायदा १८९७व 'सुगंधित तंबाखूविक्री बंदी कायदायानुसार संपूर्ण राज्यात तंबाखू व सुगंधित तंबाखू विक्रीवर बंदी असणे गरजेचे आहे. मात्रकायद्यांचे उल्लंघन करीत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरुच आहे. थुंकीमार्फत कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता असल्यामुळे तंबाखू विक्रीवर बंदी घालणे महत्वाचे आहे. सदर बाब गावक-यांच्या लक्षात येताच दोन्ही गावांतील नागरिकांनी ठरावावर स्वाक्ष-या करून तंबाखूमुक्त गावकोरोनामुक्त गाव करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

गुरुवार, ऑगस्ट २७, २०२०

महामार्गावरील अपूर्ण नाला बांधकामामुळे शेतीचे नुकसान

महामार्गावरील अपूर्ण नाला बांधकामामुळे शेतीचे नुकसान


गडचिरोली, ता. २७ : गडचिरोली-चामोर्शी या राष्ट्रीय महामार्गावरील कुनघाडा फाटाजवळील अपूर्ण नाला बांधकाम व पुरामुळे लगतच्या शेतीचे मोठे नुकसान झाले दरम्यान खा. अशोक नेते यांनी बुधवार, 26 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. अपु-या नाल्याच्या बांधकामामुळे पुराचे पाणी शेतात गेल्याने पिकांची नासधूस झाल्याचे यावेळी निर्दशनास आले.
अपूर्ण नाला बांधकामामुळे पुराचे पाणी लगतच्या शेतामध्ये घुसल्याने या परिसरातील शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली. पुराचे पाणी शेतात साचून राहिल्याने पेरणी केलेले पूर्ण पीक सडून गेल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. याची वेळीच दखल घेत खा.अशोक नेते यांनी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, कंत्राटदार व जिल्हा प्रशासन यांना संबंधित शेतक-यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याच्या सूचना केल्या. यावेळी दिशा समितीचे सदस्य प्रकाश गेडाम, भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, स्वीय सहाय्यक रविंद्र भांडेकर उपस्थित होते.
जिल्हा वर्धापनदिनी पथविक्रेत्यांना कर्ज वाटप

जिल्हा वर्धापनदिनी पथविक्रेत्यांना कर्ज वाटप


गडचिरोली. कोरोनाच्या संकट काळात मोडकळीस आलेल्या शहरातील पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 10 हजार रुपयांपर्यंत भांडवली कर्ज देण्याची तरतूद आहे. या योजनेअंतर्गत शहरातील 3 लाभार्थ्यांना जिल्हा वर्धापन दिनानिमित्त कर्ज वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या संकटातून नागरिकांचा बचाव करण्यासाठी शासनाने टाळेबंदी जाहीर केली होती. यात अनेकांचा व्यवसाय मोडकळीस आला. याचा सर्वात जास्त फटका अल्प भांडवलीवर व्यवसाय करणा-या पथविक्रेत्यांना बसला. बंदच्या काळात जवळ असलेली जमापुंजी उदरनिर्वाहात खर्ची घातली असल्याने व्यवसाय पुन्हा उभारणीसाठी पथविक्रेत्यांना व फेरीवाल्यांना मदतीचा हात देण्याकरीता केंद्र शासनाने पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजनेची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यात सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत 24 मार्च 2020 पूर्वीपासून शहरामध्ये विक्री करणा-या पथविक्रेत्यांना 10 हजार रुपयांचे खेळते भांडवल कर्ज स्वरुपात बॅंकेच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
.....
योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
गडचिरोली जिल्ह्याच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते मुख्याधिकारी संजीव ओहोळ, युनियन बॅंक शाखेचे शाखा व्यवस्थापक सदानंद चालीगांजेवार, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक राजेंद्र चौधरी यांच्या उपस्थितीत शहरातील 3 लाभार्थी रेखा होमराज खरवडे, शारिक शेख, मधू किसन हजारे यांना धनादेश वितरित करण्यात आले. या योजनेचा जास्तीत जास्त पथविक्रेत्यांनी लाभ घ्यावा, वेळेवर नियमित कर्जाची परतफेड करावी, यासंदर्भात स्थानिक नगर परिषद, नगरपंचायतशी संपर्क करावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले.
,..
73 प्रकरणे मंजूर
गडचिरोली जिल्ह्यातील 3 नगर परिषद व 9 नगरपंचायती मार्फत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना कार्यान्वित केली जात आहे. जिल्ह्यात आजवर 356 कर्जाची प्रकरणे ऑनलाईन भरण्यात आलेली आहे. त्यापैकी जिल्ह्यातील विविध बॅंकांनी प्राप्त झालेल्यापैकी 73 प्रकरणे मंजूर केलेली असून 33 लाभार्थ्यांना कर्ज वितरित केले आहे.
कोरोना योद्ध्यांचा सत्कार

कोरोना योद्ध्यांचा सत्कार


गडचिरोली, ता 27 : मागील सहा महिन्यांपासून देशात सर्वत्र कोरोना विषाणुने हाहाकार माजविला आहे. त्याचा दूरवर परिणाम दिसून येत आहे. शासनाने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ब-याच उपाययोजना करुन टाळेंबदीची घोषणा केली. या कठीण परिस्थितीत नगरपालिकेची भूमिका अत्यंत महत्वाची होती. या कामात विशेष योगदान दिलेल्या नपच्या मुख्य 4 कर्मचा-यांचा जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे प्रशस्तीपत्र देवून मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कोरोनाच्या कठीण परिस्थितीत बाहेरुन आलेल्या व्यक्तींना विलगीकरण करणे, शहरात व कोविड सेंटरची स्वच्छता, निर्जंतुकीकरण, कोरोनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे आदी महत्वाची कामे नगर पालिकेच्या कर्मचा-यांनी केले. या कामात विशेष योगदान देणा-या 4 कर्मचा-यांचा जिल्हा वर्धापन दिनानिमित्ताने जिल्हाधिका-यांचे प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. यामध्ये पाणी पुरवठा विभागाचे शरद सोनटक्के, अग्निशमन विभागाचे फायरमन केशव सातपुते, आरोग्य विभागाचे सीटी कॉर्डीनेटर तृप्ती मल, राजेश मधुमटके यांचा सहभाग आहे. कार्यक्रमाला उपमुख्याधिकारी रवींद्र भांडारवार, गणेश नाईक व इतर कर्मचारी उपस्थित होते.
आली गौराई …सोनियाच्या पाऊली…

आली गौराई …सोनियाच्या पाऊली…


गडचिरोली : आली गौराई …सोनियाच्या पाऊली…मंगलमय वातावरणात गौराई माहेरी आल्याने तिच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात येते. हर्षोल्लीत मने गौरीच्या माहेरपणात कुठलीच उणीव ठेवत नाही. सजावट, भरजारी, साड्या असो वा अलंकार…मग गौरीच्या आवडीचे पदार्थ….गौराईची हौस भागविण्यासाठी प्रत्येकजण तत्पर असतो. मनोभावे सेवा केली तर ईश्वर प्राप्ती होते, असे म्हटले जाते. अशीच प्रथा गडचिरोली येथील अमोल बायस्कर परिवाराने १८० वर्षांपासून जोपासत आहे.
जैरामपूर परिसरात कीडरोग निरीक्षणे, पिक व्यवस्थापन विषयक मार्गदर्शन

जैरामपूर परिसरात कीडरोग निरीक्षणे, पिक व्यवस्थापन विषयक मार्गदर्शन

गडचिरोली ता. 26 : जैरामपूर परिसरातील यादवपल्ली, पारडीदेव, बाम्हणीदेव, मुधोली चक नं एक, मुधोली तुकुम, मुधोली रिठ आदी गावांत कृषि विभागातर्फे कृषि सहाय्यक विजय पत्रे यांनी खरिपातील भात, सोयाबीन, कापूस पिकांचे नियमितपणे कीडरोग निरीक्षणे नोंदवून  शेतक-यांच्या समस्या, पिकांचें सर्वेक्षण व निदानानुसार पिक व्यवस्थापन विषयक मार्गदर्शन केले.
सद्स्थितीत भात पिकावर खोडकीडा व करपा रोगाचा तर सोयाबीन पिकावर पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा), उंट अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतक-यांनी सजग होऊन नियमितपणे बारकाईने निरीक्षण करून पिकावरील कीडरोग प्रादुर्भावानुसार कृषि सहायकांचा सल्ला घेऊन किडनाशकाची फवारणी करणे गरजेचे आहे.  भातपिकात प्रती चौरस मीटरला 5 टक्के कीडग्रस्त फुटवे किंवा पोंगेमर दिसून आल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव  असल्याने खोडकीडा नियंत्रणाकरिता क्विनालफॉस 25 ई. सी. 26 मिली,  क्लोरपायरीफॉस 20 ई. सी. 25 मिली, लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 5 ई. सी. 5 मिली, क्लोरअन्ट्रीनोप्रोल 18.5 एस. एल.3 मिली, ट्रायझोफास 40 ई. सी.13 मिली, कारटॅप हायड्रोक्लोराईड 50 ई. सी.10 ग्रॅम यापैकी कोणत्याही एका किडनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करपा रोगाचे नियंत्रणाकरिता प्रोपिकोनॅझोल 5 ई. सी.10 मिली, ट्रायसायक्लाझोल 75 एस. पी.7 ग्रॅम, हेक्साकोनॅझोल 5 ई. सी.20 मिली, व्हॅलीडामायसिन 3 एस एल. 25 मिली, हेक्साकोनॅझोल 5ई. सी.+व्हॅलीडामायसिन 2.5 एस. सी.20 मिली यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकावर स्पोडोप्टेरा व उंट अळीचा प्रादुर्भाव  दिसून येताच स्पोडोप्टेरा व उंट अळीचे नियंत्रणाकरिता प्रोफेनोफॉस 50 ई. सी. 20 मिली, क्लोरअंट्रीनोप्रोल 18.5 एस. एल. 3 मिली, इंडोक्झिकाब 15.8 ईइ. सी.7 मिली, डायक्लोरोव्हास 76  ई. सी. 5 मिली, स्पिनोसॅड 5एस जी 4 ग्रॅम यापैकी कोणत्याही एका किडनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा सल्ला कृषि सहाय्यक विजय पत्रे यांनी दिला आहे.