Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑगस्ट २७, २०२०

जैरामपूर परिसरात कीडरोग निरीक्षणे, पिक व्यवस्थापन विषयक मार्गदर्शन

गडचिरोली ता. 26 : जैरामपूर परिसरातील यादवपल्ली, पारडीदेव, बाम्हणीदेव, मुधोली चक नं एक, मुधोली तुकुम, मुधोली रिठ आदी गावांत कृषि विभागातर्फे कृषि सहाय्यक विजय पत्रे यांनी खरिपातील भात, सोयाबीन, कापूस पिकांचे नियमितपणे कीडरोग निरीक्षणे नोंदवून  शेतक-यांच्या समस्या, पिकांचें सर्वेक्षण व निदानानुसार पिक व्यवस्थापन विषयक मार्गदर्शन केले.
सद्स्थितीत भात पिकावर खोडकीडा व करपा रोगाचा तर सोयाबीन पिकावर पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा), उंट अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतक-यांनी सजग होऊन नियमितपणे बारकाईने निरीक्षण करून पिकावरील कीडरोग प्रादुर्भावानुसार कृषि सहायकांचा सल्ला घेऊन किडनाशकाची फवारणी करणे गरजेचे आहे.  भातपिकात प्रती चौरस मीटरला 5 टक्के कीडग्रस्त फुटवे किंवा पोंगेमर दिसून आल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव  असल्याने खोडकीडा नियंत्रणाकरिता क्विनालफॉस 25 ई. सी. 26 मिली,  क्लोरपायरीफॉस 20 ई. सी. 25 मिली, लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 5 ई. सी. 5 मिली, क्लोरअन्ट्रीनोप्रोल 18.5 एस. एल.3 मिली, ट्रायझोफास 40 ई. सी.13 मिली, कारटॅप हायड्रोक्लोराईड 50 ई. सी.10 ग्रॅम यापैकी कोणत्याही एका किडनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करपा रोगाचे नियंत्रणाकरिता प्रोपिकोनॅझोल 5 ई. सी.10 मिली, ट्रायसायक्लाझोल 75 एस. पी.7 ग्रॅम, हेक्साकोनॅझोल 5 ई. सी.20 मिली, व्हॅलीडामायसिन 3 एस एल. 25 मिली, हेक्साकोनॅझोल 5ई. सी.+व्हॅलीडामायसिन 2.5 एस. सी.20 मिली यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकावर स्पोडोप्टेरा व उंट अळीचा प्रादुर्भाव  दिसून येताच स्पोडोप्टेरा व उंट अळीचे नियंत्रणाकरिता प्रोफेनोफॉस 50 ई. सी. 20 मिली, क्लोरअंट्रीनोप्रोल 18.5 एस. एल. 3 मिली, इंडोक्झिकाब 15.8 ईइ. सी.7 मिली, डायक्लोरोव्हास 76  ई. सी. 5 मिली, स्पिनोसॅड 5एस जी 4 ग्रॅम यापैकी कोणत्याही एका किडनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा सल्ला कृषि सहाय्यक विजय पत्रे यांनी दिला आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.