मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने गडचिरोलीत
मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे यांचे दुपारी ३.१५ वाजता नागपूर शहरात आगमन होत आहे. पूरग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी ते हेलिकॉप्टरने गडचिरोलीला जाणार आहेत. ते आधीच्या सरकारमध्ये पालकमंत्री होते. त्यामुळे कदाचित गडचिरोलीला भेट देत आहेत. यावेळी उप-मुख्यमंत्री श्री @dev_fadnavis जी हे सुद्धा या दौऱ्यात गडचिरोली ला भेट देणार आहेत. गडचिरोली विभागासह विदर्भात उत्पन्न झालेल्या पूर परिस्थितीबाबत राज्याचे मुख्यमंत्री श्री @mieknathshinde जी यांच्याशी खासदार अशोक नेते यांनी फोन वर चर्चा केली. आजच पूर परिस्थितीची पाहणी ते स्वतः गडचिरोलीला भेट देऊन करतील व राज्य शासनाच्या वतीने सर्व प्रकारची सहायता प्रदान करतील असे आश्वासन त्यांनी दिले. दुपारी चार वाजता एकनाथ शिंदे हे अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 6.30 वाजता पूर परिस्थितीबाबत गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन सोबत आढावा बैठक घेणार आहेत.
राज्यातील मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापुरात या भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच गडचिरोलीमध्ये देखील पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. तिथे अनेक नद्यांना पूर आला आहे. तसेच नागपूर, चंद्रपूर, वाशिम, वर्धा जिल्ह्यातही मोठा पाऊस कोसळताना दिसत आहे.#rain #nature #rainyday #photography #love #naturephotography #clouds #photooftheday #weather #sky #instagood #instagram #water #travel #storm #photo #art #raindrops #rainbow #beautiful #rainy #india #raining #picoftheday #landscape #summer #sunset #ig #flowers #monsoon