Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

crime लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
crime लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, जुलै २४, २०२३

अंधाधुंध फायरिंग में भाजयुमोर्चा के जिल्हा उपाध्यक्ष की पत्नी की मौत

अंधाधुंध फायरिंग में भाजयुमोर्चा के जिल्हा उपाध्यक्ष की पत्नी की मौत


चंद्रपुर/राजुरा:
महाराष्ट्र के चंद्रपूर जिल्हे के राजुरा कस्बे का सोमनाथपुर इलाका रविवार के शाम फिल्मी स्टाइल फायरिंग से दहल गया. इसी क्षेत्र में रहने वाले चंद्रपुर जिले के भाजपा युवा मोर्चा के जिला उपाध्यक्ष सचिन डोहे के घर पर अज्ञात व्यक्ति ने सचिन डोहे की पत्नी पूर्वाषा सचिन डोहे, उम्र 27 वर्ष की गोली मारकर हत्या कर दी।

प्राप्त जानकारी के मुताबिक, हत्यारों का निशाना लल्ली शेरगिल था, हमलावर लल्ली को मारने के लिए गये थे लेकिन लल्ली जान बचाने के लिए वाह से भागते हुए सचिन के घर पोहचा.

हत्यारे उसके पीछे भाग रहे थे, उन्होंने दो राउंड फायरिंग की। चीख सुनकर सचिन की पत्नी बाहर आई और हत्यारो ने अंदाधुंद फायरींग की। वो दो राऊंड सचिन की पत्नी के सिने मे लगीं और वो वहीं गिर गईं.

गोलीबारी में लल्ली शेरगिल घायल हो गया, बताया जा रहा है कि यह गोलीबारी कोयला तस्करी के कारण हुई है. दोनों को गंभीर हालत में अस्पताल में भर्ती कराया गया। जांच के बाद डॉक्टरों ने पूवर्शा डोहे को मृत घोषित कर दिया। इस घटना से पूरा जिला हिल गया है और राजुरा कस्बे में तनावपूर्ण स्थिति पैदा हो गई है.

पूर्वशा भायुमो जिला उपाध्यक्ष सचिन डोहे की पत्नी हैं। सचिन उस वक्त अपने चाचा के साथ काम से बाहर गये थे।घटना में पूर्वाशा की अकारण मौत हो जाने पर दुख व्यक्त किया जा रहा है।सुधीर मुनगंटीवार ने सुझाव दिया है कि पुलिस को जल्द से जल्द कार्यवाही की रिपोर्ट सौंपनी चाहिए.

शुक्रवार, मे १९, २०२३

 धक्कादायक! सातवीच्या विद्यार्थ्याने केले आठवीच्या विद्यार्थिनीला गर्भवती

धक्कादायक! सातवीच्या विद्यार्थ्याने केले आठवीच्या विद्यार्थिनीला गर्भवती

बंटीवर बलात्काराचा गुन्हा दाखल
नागपूर:
प्रेम आंधळ असते आणि प्रेमात काहीही होऊ शकते. असाच आंधळ्या प्रेमाचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. हि घटना आहे नागपूर जिल्ह्यातील मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील,आठव्या वर्गात शिकणाऱ्या बहिणीच्या वर्ग मैत्रीणीवर सातव्या वर्गात शिकणाऱ्या मुलाची मैत्री झाली. 
हळूहळू प्रेम बहरू लागले, मुलाची बहीण हि गर्भवती झालेल्या मुलीची मैत्रीण असल्याने एकमेकांचे घरी येणे जाणे सुरु झाले .बहीण घरी नसतांनाही एकमेकांच्या घरी दोघेही जाणे येणे करत होते.कधी पुस्तक नेऊन देण्याच्या बहाण्याने तर कधी पुस्तक आनण्याच्या बहाण्याने ते ये जा करत होते. २५ जानेवारीला बबली (बदललेले नाव) ही मैत्रिणीला भेटायला घरी आली.
 मात्र, मैत्रिण शेतात गेली होती. त्यावेळी बंटी एकटाच घरी होता. बंटीने तिला प्रेमाची मागणी घातली. तिनेही होकार दिला. बबलीचे आईवडिल शेतात गेल्यानंतर त्यांनी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. एप्रिल महिन्यात बबलीच्या पोटात दुखायला लागले. त्यामुळे तिला खासगी रुग्णालयात दाखविण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याची धक्का दायक माहिती पुढे आली.

 सर्वांना हे ऐकून धक्का बसला. दोघांना हि बसवून विचारपूस करण्यात आली . प्रियकर बंटीचे नाव समोर आले.बंटीला  विचारपूस करण्यात आली. त्याने माझे तिच्यावर प्रेम असून आम्ही लग्न करणार आहे अशी कबुली दिली. नंतर प्रकरण मौदा पोलीस ठाण्यात पोहचले. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सातवीत असलेल्या बंटीला ताब्यात घेऊन बालनिरीक्षणगृहात रवानगी केली.




सोमवार, जुलै १८, २०२२

चंद्रपूर:कुत्र्याच्या पायाला भलामोठा दगड बांधून फेकले नदीच्या प्रवाहात:व्हिडीओ व्हायरल

चंद्रपूर:कुत्र्याच्या पायाला भलामोठा दगड बांधून फेकले नदीच्या प्रवाहात:व्हिडीओ व्हायरल

ललित लांजेवार/खबरबात:                                                                                              चंद्रपुरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.चंद्रपूरच्या बल्लारपूर मधल्या दहेली मध्ये एका पाळीव कुत्र्याच्या पायाला दगड बांधून आणि तोंड तारेने आवरून त्याला वाहत असलेल्या नदीच्या पाण्यात फेकण्याचा प्रयत्न आले. हा प्रकार गावातील एक कुटुंबीयांनी मिळून केल्याचे समोर आले आहे. 

या घटनेमध्ये कुत्र्याचा मृत्यू झाला आहे असे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे कृत्य करत असताना तरुणांनी व्हिडिओ बनवला आणि या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पहिल्यांदा हा प्रकार तरुणांनी केला  तो पाळीव कुत्रा असल्याने तो परत तरुणांकडे परत आला.


त्याच परिस्थितीत कुत्र्याला नदीच्या प्रवाहात दुसऱ्यांदा फेकण्याचा प्रयत्न केला.त्यात त्याचा मृत्यू झाला.अतिशय संतापजनक प्रकार बघायला मिळाल्याने प्यार फाउंडेशनकडून या घटनेची तक्रार पोलिसात केली आहे, आता या विरोधात आवाजही  उठायला सुरुवात झाली आहे.


मंगळवार, जानेवारी १८, २०२२

एकाच घरात चौघांचे आढळले मृतदेह | पत्नी, मुलांची हत्या करून कुटुंबप्रमुखाची आत्महत्या

एकाच घरात चौघांचे आढळले मृतदेह | पत्नी, मुलांची हत्या करून कुटुंबप्रमुखाची आत्महत्या



नागपूर : नागपुरातील दयानंद पार्क परिसरात एकाच घरातील चौघांचे मृतदेह, आढळल्याने परिसरात तसेच नागपूर शहरात खळबळ उडाली आहे.पत्नी,मुलांची हत्या करून कुटुंबप्रमुखानं आत्महत्या केल्याचा प्राथमिक तपासात समोर येत आहे.

आर्थिक विवंचनेतून पतीने पत्नी आणि दोन मुलांची हत्या करत स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहेत.

मदन अग्रवाल असे आत्महत्या करणाऱ्या पतीचे नाव असून मदन याने गळफास लावून आत्महत्या करण्यापूर्वी पत्नी किरण, मुलगा वृषभ आणि मुलगी तोषिता यांची चाकूने वार करत हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मदन हा चायनीजचा स्टॉल चालवत होता.मागील अनेक दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होते. त्यांच्यावर अनेकांची उसनवारी होती. त्याच तणावातून त्यांनी हे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज आहे. दयानंद पार्क परिसरात ज्या भाड्याच्या घरी मदन अग्रवाल यांचे कुटुंब राहत होते. तिथे आज सकाळपासून कुठलीही हालचाल

झाली नाही.त्यामुळे शेजाऱ्यांना शंका आल्याने अग्रवाल यांच्या ओळखीतल्या काही लोकांना घरात कुठलीही हालचाल नसल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आले. पोलिसांनी येऊन दार तोडून घरात प्रवेश केला तेव्हा मदन अग्रवाल हे गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आला. तर आतील खोलीत पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले.

The bodies of four were found in the same house  Suicide of the head of the family by killing his wife and children


शुक्रवार, जानेवारी १४, २०२२

  धक्कादायक: चंद्रपूर | पत्नीवर संशय घेत व्यसनी पतीने पत्नी आणि मुलीवर चाकूने केले सपासप वार,पत्नीचा मृत्यू

धक्कादायक: चंद्रपूर | पत्नीवर संशय घेत व्यसनी पतीने पत्नी आणि मुलीवर चाकूने केले सपासप वार,पत्नीचा मृत्यू



चंद्रपूर/प्रतिनिधी:
पत्नीवर संशय घेत व्यसनी पतीने पत्नी आणि मुलीला चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना चंद्रपुर माजरी-भद्रावती तालुक्यातील माजरी पोलीस ठाण्याअंतर्गत कुचना येथे घडली आहे. या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झाला. तर गंभीर जखमी मुलीवर चंद्रपूरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वीरेंद्र रामप्यारे साहनी (43) असे आरोपी पतीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

कुचना कॉलोनी वेकोलीच्या ए-टाइप वसाहत येथील ब्लॉक नंबर-10 क्वार्टर नंबर-77 मध्ये आरोपी वीरेंद्र साहनी हा पत्नी सुमन वीरेंद्र साहनी (36) आणि मुलगी सिमरन वीरेंद्र साहनी (17) यांच्यासोबत राहतो. आरोपी हा वेकोली माजरीच्या खुल्या कोळसा खाणीत सुरक्षा रक्षक या पदावर कार्यरत असून त्याला गांजाचे व्यसन आहे. तसेच वीरेंद्र आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. याच संशयातून त्याने हे हत्याकांड घडवून आणले..

वीरेंद्रने पत्नी सुमतीच्या पोटात व छातीत पाच धारदार चाकूने पाच वार केले. तर मुलगी सिमरनच्या पोटात एक घाव केला. या हल्ल्यात दोघी मायलेकी गंभीर जखमी झाल्या. दोघींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वेकोली माजरीच्या रुग्णालयात उपचारादरम्यान सुमनचा मृत्यू झाला. तर मुलगी सिमरनवर चंद्रपूर येथील कुबेर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हल्ल्यानंतर पळून जात असताना आरोपीला पाठलाग करुन पकडले.
पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनात माजरीचे ठाणेदार विनीत घागे व पथक करीत आहे.

बुधवार, डिसेंबर १५, २०२१

नागपूर मे बॉयफ्रेंड से शादी करने के लिए युवती ने रची गैंगरेप की झूठी कहानी

नागपूर मे बॉयफ्रेंड से शादी करने के लिए युवती ने रची गैंगरेप की झूठी कहानी

१००० से ज्यादा पुलिस जुटी काम मे
पुलिस ने किया ६ घंटे मे पर्दा फाश
नागपूर/
महाराष्ट्र के नागपुर में 19 वर्षीय युवती ने सोमवार को दोपहर १२ बजे अपने प्रेमी से शादी करने के लिये गैंगरेप की फर्जी शिकायत नागपूर पुलिस में दर्ज कराई, जिसके कारण नागपुर पुलिस ने मामले की तफ्तीश के लिए अपने १ हजार से ज्यादा कर्मियों की फौज लगा दी.

युवती ने सुबह करीब 11 बजे कलमणा पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई थी.इससे पहले महिला ने पुलिस को दी अपनी शिकायत में आरोप लगाया कि चिखाली इलाके के समीप एक सुनसान जगह पर दो लोगों ने उससे दुष्कर्म किया. उसने दावा किया कि जब वह सुबह रामदासपेठ इलाके में म्यूजिक क्लास के लिए जा रही थी तो ये दोनों लोग सफेद रंग की वैन में आए और उससे बूटीबोरी का रास्ता पूछा.

पुचकारी ने युवती की शिकायत के हवाले से बताया कि इसके बाद दोनों लोगों ने उसे जबरन वैन में खींच लिया और एक कपड़े से उसका मुंह ढक दिया. अपहरणकर्ता उसे एक सुनसान जगह पर ले गए और उससे कथित तौर पर दुष्कर्म किया.

मामले की गंभीरता को भांपते हुए शहर की पुलिस ने तत्काल इसकी जांच शुरू कर दी. कलमणा पुलिस ने भारतीय दंड संहिता की संबंधित धाराओं के तहत अज्ञात लोगों के खिलाफ मामला दर्ज कर लिया. पुलिस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त पुलिस आयुक्त सुनील फुलारी और अन्य वरिष्ठ अधिकारी मामले की जांच के लिए सीताबर्डी पुलिस थाने पहुंचे.

एक वरिष्ठ पुलिस अधिकारी ने बताया कि शहर भर के 250 से अधिक सीसीटीवी फुटेज को खंगाले

, शहर में वैन गाड़ियों की जांच की लेकीन हात मे कूच आया नही. कड़ी मशक्कत और 50 से अधिक लोगों से पूछताछ के बाद पुलिस इस नतीजे पर पहुंची कि महिला ने सामूहिक दुष्कर्म की कहानी रची है.

उन्होंने बताया कि ये जानकारियां मिलने के बाद पुलिस ने महिला ने पूछताछ की और उससे पूछा कि क्या उसने यह कहानी रची है. महिला ने पुलिस को बताया कि उसने अपने प्रेमी से शादी करने के लिए ऐसा किया.

मंगळवार, नोव्हेंबर २३, २०२१

 गंगा जमुनात देहव्यापार करायला जाणाऱ्या चंद्रपूरच्या त्या महिलेची नागपुरात सुटका

गंगा जमुनात देहव्यापार करायला जाणाऱ्या चंद्रपूरच्या त्या महिलेची नागपुरात सुटका

नागपूर : 
पतीने केलेल्या उपेक्षेमुळे हतबल झालेल्या चंद्रपूरच्या एका 30 वर्षीय महिलेने चंद्रपूर सोडून नागपुरात येऊन गंगा जमुना परिसरात वेश्‍याव्यवसाय करण्याचा अजब निर्णय घेतला. गुरूवारी दुपारी ३० वर्षे वयोगटातील महिला मनिषा (काल्पनिक नाव) गणेशपेठ बसस्थानकावर उतरली. नाकी-डोळी छान आणि कपड्यांवरून सधन घरची असल्याची दिसत होती.

पतीच्या कमाईवर जीवन जगत असल्याचे तिच्या डोक्यात बसले. त्यामुळे रागाच्या भरात तिने गंगाजमुनात जाऊन वेश्‍याव्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. ती चंद्रपुरातून थेट नागपुरात पोहचली आणि गंगाजमुनाची वाट धरली.

तिने ऑटोला हात दिला. आणि ऑटो वाल्याला म्हणाली मला गंगाजमुनात जायचं आहे तिथे सोडा, असे म्हणत ऑटो चालक गोंधळला. त्याला संशय आल्याने त्याने पाण्याची बाटल्या घेण्याचा बहाणा करीत थेट भरोसा सेलच्या प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक रेखा संकपाळ यांना फोन केला. संशयित महिला असून ती गंगाजमुनात घेऊन जाण्याबाबत म्हणत असल्याचे सांगितले.महिला पोलिस येत पर्यंत फोटो वाला बस स्टॅन्ड परिसरातच ऑटो गोल गोल फिरवत राहिला.

लगेच दामिनीचे पथक थेट ऑटोचालकाने सांगितलेल्या रस्त्यावर पाठवले. दामिनीचे वाहन दिसताच सुनील यांनी ऑटो थांबविला आणि महिलेला ताब्यात दिले. दामिनी पथकाने महिलेला वाहनात बसविले आणि भरोसा सेलमध्ये आणले आणि तिची समज घालण्यात आली.

भरोसा सेलने दिलेल्या माहितीनुसार मनिषाच्या आईने दुसरे लग्न केले तर वडिलानेही दुसरा ठाव धरला. दोन वर्षांची असताना मनिषा आणि तिची बहिणी आजीकडे राहू लागल्या. आजीचा मृत्यू झाल्यानंतर दोघ्याही बहिणींनी एकमेकींना आधार दिला. मनिषाचे लग्न झाले आणि पतीसह सुखी संसार सुरू झाला. परंतु, तिच्याच जीवलग मैत्रिणीने तिच्या पतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न केले. त्यामुळे पुन्हा एकाकी झालेल्या मनिषा नैराश्‍यात गेली. तिचा पुरूषांवरील पुरता विश्‍वास उडाला.

पुन्हा नव्यावे थाटला होता संसार
चंद्रपुरात राहणाऱ्या अविवाहित प्रमोदला मनिषाची हकीकत कळली. प्रमोद हा केंद्र शासनाच्या एका खात्यात नोकरीला आहे. त्याने तिला पुन्हा नव्याने संसार थाटण्याची विनंती केली. दोघांनी नव्याने संसार थाटला. लग्नाला दोन वर्षे झाले तरीही त्यांना मुलबाळ नव्हते. त्यामुळे मनिषाची चिडचिड व्हायची. कधी-कधी पतीसोबत वादही व्हायचे. परंतु, समजदार असलेल्या प्रमोदमुळे संसार सुरू सुरळित होता.

प्रमोद आणि मनिषात असाच ११ नोव्हेंबरला वाद झाला. पतीच्या कमाईवर जीवन जगत असल्याचे तिच्या डोक्यात बसले. त्यामुळे रागाच्या भरात तिने गंगाजमुनात जाऊन वेश्‍याव्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. ती थेट नागपुरात पोहचली आणि गंगाजमुनाची वाट धरली. ऑटोचालक सुनील भोकरे हा देवाच्या रुपात मिळाला. त्याच्या आणि दामिनीच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला....आणि ती ढसाढसा रडायला लागली.

भरोसा सेल प्रभारी रेखा संकपाळ आणि दामिनी पथकातील ललिता उन्हाळे, अनिता वरकडे, गुंजन रामटेके यांनी तिची आस्थेने विचारपूस केली. तिच्या पती आणि बहिणीला बोलावून घेतले. भरोसा सेलमध्ये येताच त्यांना मनिषाने घेतलेला निर्णय सांगितला. शब्द कानी पडताच मनिषा, तिचा पती आणि बहिण तिघेही ढसाढसा रडायला लागले. त्यांनी दामिनी पथकाचे आभार मानले आणि परत चंद्रपूर गाठले...

सोमवार, नोव्हेंबर २२, २०२१

नागपुरच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेणार्‍या आरोपीला चंद्रपुरात अटक: मुलगी परिवाराच्या स्वाधीन

नागपुरच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेणार्‍या आरोपीला चंद्रपुरात अटक: मुलगी परिवाराच्या स्वाधीन

चंद्रपूर/ प्राजक्ता गटलेवार :
दिनांक ०१/११/२०२१ रोजी बुटीबोरी पोलीस स्टेशनला हजर होवून फिर्यादी यांनी आपली फिर्याद नोंदविली होती की, त्यांची 12 वर्षाची अल्पवयीन मुलगी ही दिनांक ३१ १०.२१ रोजी सकाळी १०.०० वा.च्या सुमारास किराणा दुकानात जाते असे आपल्या आजी यांना सांगुन घरूण निघुन गेली पण परत आली नाही.

त्यांनी तीचा आजुबाजुच्या परिसरात व नातेवाईकांकडे घेतला पण ती सापडली नाही.फिर्यादीचे रिपोर्ट वर बुटीबोरी पोलीस स्टेशनला पळवून येणारा अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करुन पळवून नेलेली मुलगी व आरोपीचा शोध सुरु करण्यात आला. सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा नागपूर यांचेकडून सुध्दा सुरु होता.समांतर तपास दरम्यान स्थानिक गुन्हे शाखाचे पथकास गोपनिय सुत्राकडुन माहिती प्राप्त झाली की, पळवून नेलेली मुलगी ही चंद्रपुर जिल्हयातील चंदनखेडा गावात राहत आहेत मिळालेल्या महितीच्या आधारे नमुद ठिकाणी पथक गेले असता तिथे पळवून नेलेली अल्पवयीन मुलगी व त्या सोबत पळवून नेणारा आरोपी नामे सागर कंठीराम परचाके वय २३ वर्ष रा.किनारमडकी ता नागपूर हे दोघे मिळून आले.

त्या दोघांना ताब्यात घेवून पळवून नेणार आरोपी सागर कंठीराम परचाके वय २३ रा.किनारमडकी ता नागपूर याची विचारपुस केली असता त्याने सदर मुलीला पळवून नेल्याची कबुली दिली.त्याला पुढील कार्यवाहीसाठी पोलीस स्टेशन बुटीबोरी यांचे स्वाधिन करण्यात आले.

सदरची कार्यवाही ग्रामीण पुलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अपर पुलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांचे मार्गदर्शनात करण्यात आली.ग्रामीण गुन्हे शाखा पुलिस विभाग चे निरीक्षक अनिल जिट्टावार, सहायक पुलिस निरीक्षक जितेन्द्र वैरागडे, उपनिरीक्षक जावेद शेख, हवलदार गजेन्द्र चौधरी, महेश जाधव, सिपाही अजीज शेख, बालाजी साखरे, चालक हवलदार भाऊराव खंडाते, साइबर सेल चे सिपाही सतीश राठोड, महिला पुलिस सिपाही रुपाली मेश्राम ने कार्रवाई केली.

बुधवार, ऑगस्ट ११, २०२१

धक्कादायक:मुलगा ऑनलाईन क्लासमध्ये लक्ष देत नाही म्हणून आईने केली मुलाची हत्या;आणि नंतर स्वतःलाही संपवले

धक्कादायक:मुलगा ऑनलाईन क्लासमध्ये लक्ष देत नाही म्हणून आईने केली मुलाची हत्या;आणि नंतर स्वतःलाही संपवले

नाशिक:
नाशिकात एका आईने क्रूरतेचा कळस गाठला. तिने आपल्याच साडे तीन वर्षांच्या मुलाचे तोंड उशीने दाबून त्याचा खून केला. यानंतर काही वेळाने तिने बेडरूममध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

कारण फक्त एवढेच होते, की तो चिमुकला ऑनलाइन क्लासमध्ये लक्ष देत नव्हता. याच रागाच्या भरात तिने टोकाचे पाऊल उचलले अशी प्राथमिक माहिती समोर आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पाथर्डी फाट्याजवळील साई सिद्धी अपार्टमेंटमध्ये घडली. याच अपार्टमेंटमध्ये सोमवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास शिखा सागर पाठक (30) हिचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडला. तिने एक सुसाईड नोट देखील सोडले होते. त्यामध्ये या दोन्ही मृत्यूंसाठी इतर कुणालाही जबाबदार धरू नये असे तिने सांगितले होते.
शिखा सागर पाठक आपल्या पती आणि तीन वर्षीय मुलगा रिधान सागर पाठक यांच्यासोबत राहत होती. प्राथमिक माहितीनुसार, संध्याकाळी ती बेडरुममध्ये आपल्या मुलाला ऑनलाइन क्लासमध्ये लक्ष देण्यास सांगत होती. मात्र मुलगा लक्ष देत नाही ह्याचा तिला राग आला आणि तिने हे पाऊल उचलले.

दोघांचे मृतदेह आतून बंद असलेल्या खोलीतच सापडले. तसेच मुलाच्या नाकातून रक्त आले होते. संबंधित महिलेच्या आई-वडिलांनी सुद्धा ही हत्या तिनेच केली असे पोलिसांना सांगितले आहे.महिलेवर मानसिक उपचार सुरु असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली.













बुधवार, मार्च ११, २०२०

चंद्रपूर: तो पाय गॅंग्रिन बाधित महिलेचा?

चंद्रपूर: तो पाय गॅंग्रिन बाधित महिलेचा?

 ऑर्थोपेडिक रुग्णालयाचा निष्काळजीपणा
 असू शकतो असा अंदाज  
चंद्रपूर/ललित लांजेवार:

सोमवारी तुकुम-दुर्गापूर रोडवरील लॉ-कॉलेज परिसरा जवळ झुडपातून महिलेचा गुडघ्यापासून खाली पायाचा भाग सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.या घटनेनंतर चंद्रपुरात भीतीचे वातावरण तर तपास यंत्रणेची चांगलीच धांदल उडाली होती.



अर्धा कापलेला व जळालेल्या अवस्थेत पाय मिळाल्यानंतर त्या पायांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ऑर्थोपेडिक रुग्णालयात मोडलेला पाय आणि त्यामध्ये रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष याबद्दलची माहिती रामनगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश हाके यांनी खबरबातला दिली.

पोलीस निरीक्षक हाके यांनी सांगितले की,ऑर्थोपेडिक रुग्णालयात गॅंग्रिन व इतर आजारांमुळे एखाद्या रुग्णाला पाय कापावा लागला असेल व तो पाय नष्ट न करता रुग्णालय प्रशासनाच्या अलगर्जीपणामुळे तसाच झुडपी जंगलात फुकून देण्यात आला असावा,असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. याच सोबत पाय नष्ट करतांना रुग्णालय प्रशासनाला या बाबतचे प्रमाणपत्र देखील तयार करावे लागते. या बाबत अधिक तपास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. 
अश्या आजाराचा पाय संपूर्णपणे नष्ट करावा लागतो मात्र या घटनेत तसे न करता त्या महिलेचा पाय झुडपात फेकून देण्याचा आला. यासंदर्भात त्या संबंधित रुग्णालयाचा शोध घेण्याचे काम रामनगर पोलिसांकडून करण्यात येत असून शहरातील संपूर्ण परिसरातील रुग्णालयांना या बाबतची माहिती पत्राद्वारे देण्यात येणार असून त्यांच्याकडून रीतसर माहिती मागविण्यात येणार असल्याची माहिती रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश हाके यांनी दिली.

या संदर्भात प्राथमिक तपासात हा निष्काळजीपणा कोणत्या रुग्णालयाकडून करण्यात आला याची खात्रीशीर माहिती न मिळाल्याने कोणत्याच रुग्णालयावर बोट उचलू शकत नसल्याचे हाके यांनी सांगितले. 

परिसरामध्ये अधिक तपासानंतर तो पाय कापण्यात येणाऱ्या अवजारासोबत मासाचे तुकडे देखील सापडले होते.या संपूर्ण घटनेचा पुढील तपास रामनगर पोलिसांकडून सुरु आहे. 

कोरडे आणि ओले गॅंग्रिनमधील महत्त्वाचा फरक म्हणजे कोरडा गॅंग्रिन हा थेरोस्क्लेरोसिस सारख्या परिस्थितीमुळे स्थानिक उतींना रक्तपुरवठा रोखण्याचा परिणाम आहे, तर ओले गॅंग्रिन संसर्गाचा परिणाम आहे.

रक्तपुरवठ्याअभावी शरीरातील एखादा भाग डेड होणे या सारख्या आजाराने होऊ शकते. ड्राय गॅंग्रिन आणि ओले गॅंग्रिन म्हणून गॅंग्रिनचे दोन प्रकार आहेत. ओला गॅंग्रिन तयार करणे किंवा ओले गॅंग्रिनमध्ये कोरड्या गॅंग्रिनचा विकास न केल्यास उपचार केले तर मृत्यू होऊ शकतो. म्हणूनच, वैद्यकीय डॉक्टर सहसा गॅंग्रिन बाधित भाग कापून शरीरापासून काढून टाकण्याचे सुचवितात .असाच हा प्रकार झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. 

सोमवार, मार्च ०९, २०२०

धक्कादायक:चंद्रपूर;महाविद्यालय परिसरात झुडपात आढळला महिलेचा जळालेला पाय

धक्कादायक:चंद्रपूर;महाविद्यालय परिसरात झुडपात आढळला महिलेचा जळालेला पाय

चंद्रपूर/ललित लांजेवार:
चंद्रपुरातील तुकूम-दुर्गापूर मार्गावरील विधी महाविद्यालयाच्या परिसरातील आढळला एका महिलेचा जळालेला पाय 

महिलेच्या कमरेखालील जळालेला पाय कापून वेगळा फेकलेल्या अवस्थेत आढळला 

परिसरात झुडपी जंगला लगत आढळला जळालेला पाय 

महिलेचा जळालेला अर्धवट पाय आढळल्याने खळबळ

प्रभागाचे नगरसेवक सुरेश पचारे व माजी नगरसेवक बंडू हजारे यांनी पोलिसांना दिली माहिती 

फारेन्सिक पथक घटनास्थळी दाखल

परिसरात आढळल्या कपडे व संशयित वस्तू 

पोलीस तपास सूरु


रविवार, मार्च ०८, २०२०

चंद्रपूर:अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड;14 तरुण अटकेत

चंद्रपूर:अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड;14 तरुण अटकेत

चंद्रपूर/ललित लांजेवार:
अवैधपणे चालू असलेल्या हुक्का पार्लर अड्ड्यावर रामनगर पोलिसांनी शनिवारी संध्याकाळच्या दरम्यान धाड टाकली ,यात १४  युवकांना अटक करण्यात आली.

शहरातील गोल्डन रेस्टॉरंटमध्ये हा हुक्का पार्लर चालत असल्याची गुप्त माहिती रामनगर पोलीसांना मिळाली होती.रामनगर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाला या बाबतची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापडा रचत गोल्डन गोल्डन रेस्टॉरंट वर धाड टाकली.

                                                       
यात शहरातील अनेक जानी-मानी हस्ती ट्रान्सपोर्ट,राजकारणी,बिझनेस मॅन,यांची मुलं अडकली असल्याची माहिती  सूत्रांकडून सांगण्यात येते  .यात ४ अल्पवयीन आरोपींचा  देखील समावेश असल्याची माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली.

सोबत हूक्का संदर्भात वस्तू व वोडका दारूचा बंपर,डझनभर हुक्का पॉट, प्रतिबंधित तंबाखू, फ्लेवर्स आदी मोठी सामुग्री जप्त,केले. व त्यांना अटक करून रामनगर पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले.दाताला रोड वरील गोल्डन रेस्टॉरंट हे जयस्वाल नामक व्यक्तीचे असून या रेस्टॉरंटमध्ये नेहमीच या ठिकाणी येत एन्जॉयमेंट करत असल्याची माहिती समोर आलेली आहे.पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवन्त्त नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रकाश हाके व PSI कापडे करीत आहे.

नागपुरातील दिघोरी चौकात अंदाधुंद गोळीबार

नागपुरातील दिघोरी चौकात अंदाधुंद गोळीबार


नागपूर /खबरबात:

दुचाकीवरून आलेल्या दोन आरोपींनी झाडल्या गोळ्या

इम्रान सिद्दिकीवर आरोपींनी झाडल्या बंदुकीच्या गोळ्या

इम्रान हे दिघोरी चौकात रस्त्यावर होते उभे


पोलिसांनी घटनास्थळावरून बुलेटचे शेल केले जप्त


जुन्या वैमनस्यातून गोळीबार झाल्याची चर्चा

पोलिसांनी दोन आरोपींना केली अटक

व त्यांच्याकडून आठ गोळ्या केल्या जप्त
नागपुरात एअर होस्टेस कडून केला जात होता देहव्यापार;पोलिसांनी मारली होटेलवर धाड

नागपुरात एअर होस्टेस कडून केला जात होता देहव्यापार;पोलिसांनी मारली होटेलवर धाड


नागपूर/खबरबात:
नागपुरात एका आलीशान हॉटेलमध्ये देहव्यापार करणाऱ्या हवाई सुंदर यांना छापेमारीत अटक करण्यात आली,गुन्हे शाखेच्या सुरक्षा विभागाने ही कारवाई केली

पोलिसांनी सेंट्रल एव्हेन्यूवरील ओयो टाऊन हाऊस हॉटेलमध्ये छापा टाकून २५ वर्षीय दोन तरुणींची सुटका करुन दोन दलालांसह तिघांना अटक केली.

तुषार ऊर्फ सुल्तान कन्हैय्या पारसवानी (वय २६, रा. न्यू मनीषनगर),नीलेश दिनदयाल नागपुरे (वय १९ रा. कावरापेठ ) व रजत राजेश डोंगरे ( वय २४ रा. वर्मा ले-आऊट), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तुषार हा या व्यवसायाचा मुख्य सूत्रधार असून यापूर्वी २०१८ मध्येही पोलिसांनी त्याला अटक केली होती.

कोलकत्ता बँगलोर मधून दलालांच्या माध्यमातून हा व्यापार चालायचा यासाठी दलाल 15 हजार रुपयाची ग्राहकांना मागणी करायचे व त्यातील 4 हजार रुपये तरुणींना देण्याचे काम दलाल करत होते व वरील 11 हजार रुपये स्वतः ठेवत होते

यासाठी दलाल ही ग्राहकांची संपूर्ण सोय करून ठेवण्यासाठी हॉटेल देखील बुक करून ठेवत होते.सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस निरीक्षक किशोर पर्वते, महिला पोलिस उपनिरीक्षक स्मिता सोनवणे, सहाय्यक उपनिरीक्षक सुभाष खेडकर, महिला पोलिस छाया राऊत, सीमा बघेले, दीपिका दानोडे, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा पाटील, विजयाराणी रेड्डी यांना छापा टाकून तिघांना अटक केली. हवाई सुंदरीसह दोघींची सुटका केली. तुषार ,रजत व नागपुरेविरुद्ध गणेशपेठ पोलिस स्टेशनमध्ये अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवार, सप्टेंबर १७, २०१९

दीपक जयस्वाल यांना अवैध दारू तस्करीप्रकरणी अटक

दीपक जयस्वाल यांना अवैध दारू तस्करीप्रकरणी अटक


तडीपारीची कारवाई करा - पारोमिता गोस्वामी यांची मागणी 

चंद्रपूर/प्रतिनिधी -
 राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक जयस्वाल यांना अवैध दारू तस्करीप्रकरणी रामनगर पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. त्यांच्या चारचाकी वाहनातून 35 विदेशी दारूच्या पेट्या सापडल्या आहेत.

दीपक जयस्वाल हे सराईत दारू तस्कर आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होण्याच्या पूर्वीपासून अवैध दारु व्यवसायात असल्याने त्यांच्यावर अनेकदा गुन्हे दाखल झाले आहे. जैस्वाल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते असून, आपल्या राजकीय वाल्याचा वापर ते अवैध व्यवसायासाठी करीत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करावी, अशी मागणी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दारू मुक्ती अभियान च्या संयोजीका एडवोकेट पारोमिता गोस्वामी यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे ट्विटरद्वारे ही मागणी केली आहे.
दीपक जयस्वाल हे लीकर असोसिएशनचे अध्यक्ष असल्याने सुरुवातीपासून त्यांनी दारूबंदीच्या विरोधात भूमिका घेतली यानंतरही त्यांनी जिल्ह्यात अवैध दारू पुरवठा कसा करता येईल यासाठी प्रयत्न करित आहे. उल्लेखनीय म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असताना तिथे दारु तस्करी असताना करताना गोंडपिपरी पोलिसांनी त्यांना पकडले होते व अटक केली होती. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पक्षातूनही काढले होते.
एकीकडे स्वतः अवैध दारूचा पुरवठा करायचा आणि दुसरीकडे दारूबंदी फसली म्हणून सर्वत्र प्रचार करायचा अशी भूमिका जयस्वाल घेत आहे. जयस्वाल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहे त्यामुळे ते राजकीय दबाव टाकून अवैध दारू विक्रीला प्रोत्साहन देत आहेत आणि जिल्ह्यातील दारूबंदीला छेद देण्याचा प्रयत्न करीत असल्याने शासनाने त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करावी, अशी मागणी पारोमिता गोस्वामी यांनी मुख्यमंत्र्यांकडे ट्विटरद्वारे केली आहे.

सोमवार, जुलै २९, २०१९

चंद्रपुर:भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी व महामंडळाच्या बसचा भीषण अपघात

चंद्रपुर:भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी व महामंडळाच्या बसचा भीषण अपघात

 एक प्रवासी जखमी;चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील घटना
नागपूर/ललित लांजेवार:

भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने एसटी महामंडळाच्या बसला जोरदार धडक दिली.या अपघातात एक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.हि घटना चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर घडली. 



मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूरवरून चारचाकी वाहन MH.34.BB.1413 बल्लारपूरकडे    जात  होते.तर एसटी महामंडळाची बसMH.40.M.9460 बल्लारपूरहून चंद्ररपूरकडे जात होती.मात्र चारचाकी वाहन हे अतिवेगाने होते.त्यामुळे वाहनाचे संतुलन बिघडले व समोरून येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला जोरदार धडक दिली.




यात चारचाकी वाहन संपूर्ण बसला घासत गेल्याने बस मध्ये बसून असलेल्या एका प्रवाश्याला दुखापत झाली.या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.यात चारचाकी वाहन समोरून पूर्णपणे चकनाचूर झाले, घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.